postsaambhar:Udaykumar Jagtap
## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गावचे " कड" ##
दामाजी थोरात "रुस्तमराव" हा ताराबाई राणीच्या तर्फे पुण्यावर अंमल गाजवताना दिसतो .
दामाजी थोरात शाहू महाराजांच्या पक्षातून ताराराणीच्या पक्षात का गेला हे नीटसे समजत नाही .
१७०९ मध्ये तो शाहू राज्यांच्या बरोबर होता असा उल्लेख आढळतो आहे परंतु तो एक दोन वर्षातच ताराराणी साहेब यांच्याकडे गेलेला दिसतो .
कारण त्याला १७७२ मध्ये मौजे मोरगाव ,प्रांत पुणे येथील इनाम चालवण्या बद्दल आज्ञापत्र होते
. या दामाजी थोरातांजवळ "येसाजी गायकवाड" हा माळी समाजाचा साथीदार होता . हा ही शूर होता .
येसाजी गायकवाड व दामाजीला सासवड जवळील कोंडीत गावास लिहिलेली पत्रे इतिहासात मिळाली आहेत .
हा दामाजी थोरात" हाटकर" धनगर आहे .
धनगर समाजामध्ये हाटकर म्हणजे अत्यंत" शोशिक व टणक आणि धाडसी" अशी उप जात आहे
. दुसरी उपजात खुटेकर आहे .
या दोन प्रमुख उपजातीतील लोकांनी स्वराज्य स्थापने पूर्वी पासून लढवय्ये पणात नाव मिळवले आहे .
अभंगराव, आढळराव, धायगुडे ,कोकरे ,देवकाते ,थोरात, वाघ, काटकर वगैरे सरदार हटकर धनगरांपैकी आहेत .
होळकर ,फणसे ,बुळे हे खुटेकर धनगरांपैकी आहेत .
यांची बहुतेक वतनी गावे फलटण या ८४ गावात असून सुपे बारामती ह्या भागात आहेत
. मेंढ्यांचे कळप पाळून त्यांना सालोसाल देशावरून कोकणात उतरवून खारे पाणी दाखवणारे ते हाटकर.
घोंगड्या विणून राहणारे ते खुटेकर अशी या जातीची विभागणी शिवकालापासून झालेली दिसते .
मराठे व तत्सम जातींशी यांचा रोटी व्यवहार नि:शंक होतो
. पण बेटीव्यवहार हा पोटजातीतही परस्पर लग्नसंबंध शिवकाळात होत नसत .
धनगर हि जात इतकी शूर होती कि ती शत्रुत्वात ती कोणाला शरण जात नसे . व हार मनात नसे .
दामाजी थोरातांचा एक शूर साथीदार हा" येसाजी गायकवाड" होता . हा जातीने माळी होता
या वरून महाराष्ट्रातील कृषी-कुशल माळी समाजातही स्वराज्य काळी मर्दुमकी गाजवून पुढे आलेली कित्येक घराणी आहेत या बाबत शंका नाही .
नारायणराव पेशवे याना गारद्यांनी ३० ऑगस्ट १७७३ मध्ये हल्ला करून मारले .
त्यावेळेस आपल्या धन्याला वाचवताना मृत्यू पावलेला स्वामीभक्त" चाफजी टिळेकर" हा सासवड जवळील" एखतपूरचा" होता .
दामाजी थोरातांची धामधूम हि छत्रपती ताराराणी साठी असल्याने त्यांच्या उद्योगास पुंडावा ,बंड म्हणणे बरोबर नाही
. दामाजी थोरातास" रुस्तमराव "'किताब कोणी दिला हे ओळखणे आता तितकेसे अवघड राहिलेले नाही .
. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत मर्दुमकी गाजवणाऱ्या वीरांना निरनिराळे 'किताब देण्यात आले व त्यांना गौरवण्यात आले
. त्यामुळे हा 'किताब मराठ्यांनीच दिला असावा या बाबत दुमत नसावे .
थोराताने त्यांच्या या बिरुदाचा उपयोग आपल्या शिक्क्यातही केलेला दिसून येत आहे.
सेनापती,सरलष्कर ,सेनाकर्ते हिंदुराव ,सेनाखासखेल या लष्करी पदाप्रमाणेच रुस्तुमराव हेही लष्करी पद असावे
. पेशवाई मध्ये मौजे" नायगाव" येथील" कड "या उपनामक मराठा घराण्यातील पुरुषांना "रुस्तुमराव "हे लष्करी पद मिळाल्याचे आढळते आहे.
.दामाजी थोरातांना पाटस हि जहागिरी पुणे प्रांतात व तोच भाग शाहू महाराजांकडील पेशव्यांना दिला असल्यामुळे बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्यात खटके उडू लागले .
इतिहासात दामाजी थोरातांबद्दल बरेच वाद असल्याने त्याची पार्श्वभूमी समजण्यासाठी हा लेख लिहिला आहे
No comments:
Post a Comment