विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 February 2019

रविराव शिंदे घराणे , लोणीकंद


 रविराव शिंदे घराणे ,लोणीकंद 
लेखक :











-शेखर शिंदे सरकार

शिंदे घराणे महाराष्ट्राच्या इतिहासात फार प्रसिद्ध व पुरातन आहे,शिव पूर्वकाळात मुसलमानी अमदनीत हे घराणे उदय पावले, रविराव,रुस्तमराव,झुंजारराव असे बहुमानदर्शक किताब या घराण्याकडे होते,रविराव या शब्दाचा वेध कोकणातील रवीमंडळ किल्ल्याच्या इतिहासा पर्यंत जातो,बहामनीच्या काळात कुडाळकर शिंदे वारराव कोळ्याचा पाडाव करण्यासाठी कोकणात उतरले या ठिकाणी रविमंडळ या किल्ल्यावर लढाई होऊन किल्ला रामाजीराव शिंदे यांच्या हाती आला,तेव्हा या घरण्यास रवि राऊ म्हणल्याचा उल्लेख आढळतो.
रविराव घराणे लोणीकंद या ठिकाणी वास्तव्यास आहे,ते आपला मूळ पुरुष राजस्थानहुन आल्याचे सांगतात,त्याच प्रमाणे बाभूळसर, राळेगण,व ग्वाल्हेर या ठिकाणी रविराव वास्तव्यास आहेत,
पुणे नगर महामार्गावर हे लोणीकंद हे गाव लागते,या गावाला खूप मोठ्ठा ऐतिहासिक वारसा लाभला असून,मराठेशाहीत श्रीमंत शाहू छत्रपतींच्या काळात हे घराणं नावा रुपास आले,रविराव मंडळी अनेक सरदार यांच्या सोबत खांदयाला खांदा लावून लढले,मल्हार होळकर,पेशवे,यांच्या सोबत हे घराणं होते.
या लोणीकंद गावात रविराव शिंदे घराण्याचे अनेक वाडे पहावयास मिळतात,सोबत या ठिकाणी प्राचीन विठ्ठल रुकमाई मंदिर आहे,सागवानी आणि दगडी बांधकामात हे मंदिर उभे आहे,गावातील एक वाडा शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या हायस्कूलसाठी श्रीमान हनुमंतराव शिंदे रविराव यांनी बक्षीस दिला,
हा वाडा दुमजली असून भर भक्कम बांधकामात आज ही शेवटची घटका मोजत मोठ्या दिमाखात उभा आहे,या ठिकाणी काही सती शिळा पहायला मिळते तर रांजणगाव येथील गणपती मंदिरातील काही ओवऱ्या याच रविराव यांनी बांधल्या आहेत, तर गावातील प्राचीन मंदिरा लगत असणारी स्मशानभूमी ही आज ही फक्त या रविराव घरण्यास व त्यांच्या पै पाहुण्यांच्या अंत्यविधीसाठी असून त्या ठिकाणी इतरांस मज्जाव आहे,
या वास्तुरंगाचे दर्शन फार वर्षापूर्वी झाले होते नुकत्याच श्री शंभुराज्याभिषेक दिनी अजितकुमार शिंदे सरकार सांगलीकर यांनी या गावास भेट दिली या ठिकाणचे बंधू नवनाथ शिंदे रविराव यांनी गावातील सर्व वस्तू रंग दाखवून माहिती दिली..


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...