विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 16 March 2019

नागपुरकर भोसले


नागपुरकर भोसले यांचे मुळ गाव
देऊर
देऊर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा, हे संमत वाघोलीपैकी एक गाव होत. देऊर गाव रघुजी भोसलेना मोकासा व नंतर इनाम होते. देऊरचा भोसलेंचा राजवाडा असला तरी तो भोईटे घराण्याच्या ताब्यात मालकी हक्काने आहे. शिवाय, देऊरची राजवाडा संबंधीत जमीन भोईटेंकडे आहे. देऊर रेल्वे क्राँसिंगची जागा ही भोईटेंची गेली आहे. हे भोईटेे भाऊबंद परिवार व नागपुर संस्थानचे सरदार घराणे होय. माणकोजीराव, महादजी इ. भोईटे नागपूरचे लढवय्ये होते. पण, मुधाई देवस्थानचे मालक राजेभोसले नागपुरकर व मानकरी चव्हाण दहिगावकर आहेत. देऊर गावात कदम बहुसंख्य असलेतरी गाढवे देशमुख पण आहेत.
गिरवी, मालगाव, देऊर ही गावे कदमांच्या भावकीची आहेत. तिन्ही नातेवाईक. नागपुरकर भोसलेंच्या सोबत मोहिमेत आठ कदम देऊरकर होते.
मालगाव, देऊर आणि आराळे या तिन्ही गावचे कदम हे गिरवीकर कदमच आहेत
मुधी पौर्णिमेला देवी आली म्हणून मुधाई हे नाव पडले. एक दहिगावकर चव्हाण या घराण्यातील भक्तामुळे आली हे खरे आहे. पण, दहिगावकर चव्हाण पैकी सरदार भिवजी, सेट्याजी, मुधोजी ही नावे इनाम व मोकासदार होती.
देऊरची मुधाई देवी ही नागपुरकर राजेभोसलेंची आद्यदेवता .
नागपुरकरांच्या 'संस्थानी' आणी 'वैयक्तिक' दोन्ही राजचिन्हात सुद्धा "जय मुधाई" असा उल्लेख आहे.
कोरेगाव तालुक्यात छत्रपतींचे निष्ठावंत भोईटे,येवले, चव्हाण, धुमाळ, यादव सोळसकर, पवार, भोसले, जगताप, बर्गे, शिंदे, कदम, जगदाळे, फाळके,महाडिक काटकर, जाधव, बोधे, माने, पिसाळ, निकम, लेंभे, वीर, शिर्के, घोरपडे, नलवडे, क्षीरसागर, मोरे, इ.वतन दार वीरांची गावं आहेत.
नागपूरकर भोसले यांच्यावर भालचंद्र अंधारे यांची बरीच पुस्तकं आहेत.
http://brandhare.in/book.php
साभार राहुल भोइटे

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....