विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 14 March 2019

चरीची_लढाई

चरीची_लढाई
१९ एप्रिल १७३६
इ.स.१७३५ रोजी सिद्दी सात ने मानाजी आंग्रेंकडून सागरगड जिंकून घेतला. पुढे सिद्दी सात रयतेस त्रास देऊ लागला .सिद्दी सातचा बंदोबस्त करावा अशी मानाजी आंग्रे यांनी साताऱ्यास शाहू महाराजांना विनंती केली.त्या नुसार शाहू महाराजांनी चिमाजी अप्पा यांना सिद्दी सात वर पाठवले त्यामुळे चिमाजी अप्पा१३एप्रिल १७३६रोजी साताऱ्या हुन निघून १८एप्रिल १७३६ रोजी रेवस येथून चरीस आले. दुसऱ्या दिवशी (१९ एप्रिल १७३६)सिद्दीसात १५०० फौजेनिशी कामार्ल्यावर चालून आला. चरी येथे लढाईस तोंड फुटले, तीन प्रहर (९ तास)लढाई चालली .या लाढाईत मराठ्यांचे ८०० सैनिक कामी आले.सिद्दीच्या १५००सैन्यांपैकी १३०० माणसे कामी आली २००लोक पळून गेले.यात उंदेरीचा किल्लेदार सिद्दी याकूब, कृष्णाजी घाडगे, सुभानजी घाडगे, कोंडनाईक परवारे, बालाजी शेणवी इत्यादी सिद्दीचे सरदार पडले. लढाईत चिमाजी आप्पांनी सिद्दीसातास पळून जाण्याचा सल्ला दिला .तरीही सिद्दी सात त्वेषाने लढू लागला . या लढाईत सिद्दीसातने नानाजी सुर्व्यास पकडून आपल्या मृत्यू नंतर मकानाच्या खर्चासाठी पेढांबे गावचा महसूल देण्याचे कबूल करून घेतले. सिद्दी सातास नानाजीराव सुर्वे याने शिरच्छेद करून ठार केले .या लढाईत नानाजी सुर्वे यास २७ जखमा झाल्या,त्याबद्दल त्यास कुसगाव इनाम मिळाले. या लढाई नंतर मानाजी आंगरे यांनी सागरगड थोड्याच दिवसात जिंकून घेतला.
संदर्भ:
१) मराठी रियासत मध्यविभाग पृ.क्र. २६४
२) वसईची मोहीम पृ. क्र. ६४
३) जंजिऱ्याच्या सिद्दीवर शाहूची मोहीम ,ले.१९२पृ .क्र. १५८
¡)जंजिऱ्याच्या सिद्दीवर शाहूची मोहीम ,ले.१९८ पृ.क्र१६२,
¡¡)जंजिऱ्याच्या सिद्दीवर शाहूची मोहीम ,ले. १७९पृ.क्र.१४६
४)मराठ्यांचा इतिहास खंड २रा ,संपा. अ. रा.कुलकर्णी, ग.ह.खरे : पृ. क्र.४५
५) कुलाबकर आंग्रे घराण्याचा इतिहास, ले. दा.गो. ढबु :पृ. क्र.१३५
६) मराठी रियासत भाग ५वा, पृ.क्र.२२९
© निमिष थळे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...