अभेद्य शितोळे-देशमुख वाडा
पोस्त सांभार लेखक :डॉ. सदाशिव शिवदे
शितोळे-देशमुख यांच्या वाडय़ाचे बांधकाम इ. स. १७३० ते १७६० या दरम्यान म्हणजे सरदार महादजी शिंद्यांच्या कारकीर्दीत झाल्याचे सांगितले जाते. वाडय़ाच्या बाहेरून चौफेर प्रदक्षिणा घातली तर हा बुलंद वाडा इतकी वर्षे अभेद्य कसा राहिला असेल, याचेच आश्चर्य वाटते. altपुणे-सोलापूर महामार्गावर पुण्यापासून ३५ कि.मी. अंतरावर पाटस या गावी शितोळे-देशमुख यांचा वाडा आहे. गावच्या भव्य वेशीतून आत प्रवेश केल्यावर साधारणपणे ५०० मीटरवर शितोळे-देशमुखांचा पूर्वाभिमुख भव्य वाडा पाहावयास मिळतो. वाडय़ासमोर आपण उभे राहिल्यावर वाडय़ाचा साधारणपणे १० फूट उंचीचा व ५ फूट रुंदीचा दरवाजा दोहो बाजूस भक्कम घडीव दगडांचे सुबक बांधकाम असलेल्या भव्य भिंती धरून उभा आहे. दरवाजाच्या वर पाच कमानी असलेला देखणा सज्जा आपले मन वेधून घेतो. वाडय़ास बुरूज नाहीत; परंतु वाडय़ाच्या चोहो बाजूंच्या भिंती अर्धा भाग घडीव दगड व अर्धा भाग भाजक्या विटांमध्ये बांधलेल्या दिसतात. भिंतीची उंची ३० फुटांची असून जाडी साधारणपणे ४ फूट दिसते. वाडय़ात प्रवेश केल्यावर बाजूच्या देवडय़ा अतिशय कलात्मक घडणीच्या जोत्यावर सुबक सागवानी खांबावर उभ्या आहेत. पहिल्या चौकातील चारही सोपे वर एक मजला घेऊन तुळया आणि ब्रॅकेटवरील रेखीव नक्षीकामासह देशमुखांच्या कारकीर्दीचा पसारा दर्शवितात. हे नक्षीकाम जर जपले, तर ते निश्चितपणे आणखी काही शतके टिकून राहील.
पहिल्या चौकातून आपण बाजूचा दुसरा चौक पाहतो. तिसऱ्या चौकात प्रवेश केल्यावर एक गोलाकार असा अतिशय मजबूत बांधकाम असलेला आड पाहावयास मिळतो. या चौकाला ‘आडाचा चौक’ असे म्हणतात. बाजूचे दोन सोपे चांगल्या स्थितीत आहेत. आडात एका बाजूच्या भिंतीत पिंपळाचे झाड असून, त्याच्या मुळ्या भिंतीच्या बाहेर कुठेही दिसत नाहीत. हा वृक्ष जुना आणि जाड असला, तरी भिंत कोठेही दुभंगली गेलेली नाही, हे याचे वैशिष्टय़. यास ‘मुंजाबा दैवत’ मानले जाते. शितोळे-देशमुखांचा त्यावर श्रद्धाभाव आहे. चौथ्या चौकातील पश्चिमेकडील भिंतीत दरवाजा असून तोही सुस्थितीत आहे. एका चौकात जुने वृंदावन दिसते तर एका सोप्यात मुदपाकखाना असून, त्याखाली भुयार आहे. त्या चौकातील सोपे फक्त महिलांसाठीच ठेवले आहेत. त्यास सज्जा म्हणतात. भिंतीत एक जिना आहे. माजघरात स्त्रियांचा वावर असे.
वाडय़ाचे बांधकाम इ. स. १७३० ते १७६० या दरम्यान म्हणजे सरदार महादजी शिंद्यांच्या कारकीर्दीत झाल्याचे सांगितले जाते. वाडय़ाच्या बाहेरून चौफेर प्रदक्षिणा घातली, तर हा बुलंद वाडा इतकी वर्षे अभेद्य कसा राहिला असेल, याचे आश्चर्य वाटते. पश्चिमेस असलेल्या दोन बुरूजयुक्त वेशीसमोर एक बारव आहे. गावातील नागेश्वराचे शिवमंदिर अतिशय जुने व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराला ११०० एकर जमीन इनाम असून, पूजाअर्चा व नैवेद्यासाठी ब्राह्मणास वर्षांसनही आहे. पाहताक्षणीच या वाडय़ाचे अभेद्यपण जाणवते.

No comments:
Post a Comment