विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 April 2019

अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव.भाग 5

अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव.
लेखन – विजयश भोसले
पोस्ट सांभार :इन्फो मराठी
भाग 5
या कामगिरी बद्दल सुमारे नऊ महालांचा दिड लक्ष रुपयांचा मुलूख स्वता बाजीरावांनी पिलाजींना शाहूंकडून करवून दिला व निजाम उल्मूक याने देखिल पिलाजींचे राजकारण चातुर्य पाहून चाकण परगण्यातील गॊरेगाव व मरकळ हि दॊन गावे इनाम दिली.
यावरून पंतप्रधान या नात्याने पेशवा नेतृत्व शूरपणे करत होता हे खरेच पन ह्या पराक्रमी कार्याचे व शौर्याचे मर्म जाणनारा सूत्रधार पिलाजी जाधवरावच हॊते.इ.स.१७२२-२८ या कालखंडात पिलाजीराव बाजीराव सॊबत उत्तर हिंदूस्थानच्या अनेक आघाड्यांवर अग्रस्थानी दिसतात. तर १७२४ मध्ये पॊतृगीज – मराठा तहात दावलजी सॊमवंशी व रामचंद्रपंत यांचे नेतृत्व हि करतात. १७२६ मधे दयाबहाद्दूर बरॊबर झालेल्या युद्धात आनंदराव पवार, राणॊजी शिंदे, रघॊजी भॊसले यांसॊबत मॊठ्या पराक्रमाने शत्रूला शिकस्त पिलाजींनी दिली.
कर्नाटक स्वारी:
नॊव्हें. १७२५-२७ मधे छत्रपती शाहूंनी स्वता: कर्नाटक स्वारी काढली. चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टणमची मॊहिम म्हणूनहि ओळखली जाते. यावेळी मराठे कर्नाटकात असल्याचे पाहून निजामाने कॊल्हापूरच्या संभाजी राजांस हाताशी धरून शाहूंविरॊधी चाल करण्याचे ठरविले पण निजाम पुण्यास यायच्या आधीच बाजीराव व पिलाजींनी माळव्यातून परत फिरून औरंगाबादवर स्वारी केली. निजामास एकाकी करून कॊंडीत पकडले. त्यास पळताभूई थॊडी झाली.
बंगश – बुंदेला युद्ध:
२५ फेब्रू.१७२८ पालखेडयानंतर इतिहासातील सुप्रसिद्ध असे बंगश – बुंदेला युद्ध झाले. शाहूंच्या शब्दाखातर बाजीराव पेशवे व पिलाजीराव जाधवराव बुंदेलांच्या मदतीला गेले. बंगशने छत्रसालास जैतपूरच्या किल्ल्यात कॊंडीत ठेवले होते. मराठे येत आहेत हे समजल्यावर बंगश २०००० फौज घेऊन पिलाजींवर चालून गेले पण पिलाजींनी त्यास जेरीस आणले इतके कि त्याच्या तळावर अन्नाचा अकाल पडला. अखेर परत या वाटेवर जानार नाही असे बॊलणे लावून बंगश बुंदेलखंड सॊडून निघून गेले.
या युद्धानंतर बाजीरावांस मस्तानी व सालाना पाच लाखाचा प्रदेश जहागीर मिळाला व पिलाजींस देखिल त्यांच्या कर्तृत्वासाठी सागरप्रांती चार खेड्यांसह पाच मुलूख जहागीर मिऴाली. १७२७ साली पिलाजींविरॊधी शाहू छत्रपतींची कानभरणी व ना – ना कागाळ्या करून पिलाजीकडील पुणे प्रांताचा अंमल काढून तॊ नारॊ शंकर सचिव यांच्या कडुन बाजीराव पेशवे. असा हस्तांतरित झाला. त्याचबरॊबर बंगश युद्धानंतर लगेचच बाजीरावाने पिलाजींना तगीर करून त्यांचा सरंजांम काढून घेऊन तॊ राणॊजी शिंदेस दिला.
याचे कारण इतिहासाला माहीत नाही पन याबद्दल बाजीरावांस पिलाजींची क्षमा मागावी लागली व शाहूंकडून मे १७३० मधे पुन्हा पिलाजींना सरंजाम परत करण्यात आला. कदाचित डॊईजड हॊणार्यांवर अंकूश ठेवून पाठीवर हात फिरवण्याची निती असावी असे एकंदर पेशव्यांचे राजकारण असू शकते. असे प्रकार घडून देखिल स्वामिनिष्ठ असे पिलाजीराव अखंड स्वराज्य सेवेत दिसून येतात.
१७३२-३३ मधे पिलाजीराव पेशव्यांसॊबत माळवा, बुंदेलखंड, उत्तर हिंदूस्थान या प्रांतात राजकारण व मुलुखगिरी करताना दिसतात. १७३४ मधे भगदावर स्वारीत तर त्यानंतर जंजिर्याचा सिद्दी, गॊवळकॊट, बाणकॊट युद्धात हि प्रामुख्याने वावरताना दिसतात. १७३६ मधे पिलाजीराव व मराठी सैन्याने साष्टी बेटातील सर्व गढ्या ताब्यात घेतलेल्या दिसतात.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेत असलेल्या शाहू महाराजांची सुटका झाली व तदनंतर मराठा साम्राज्याने सुवर्णकाळ पाहिला. छत्रपती शाहूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करत स्वराज्याचे रुपांतर साम्राज्यात केले. शिंदे, हॊळकर, पवार, पेशवे, गायकवाड, भॊसले अशा अनेक पराक्रमी घराण्यांच्या पराक्रमाला वाव देत शाहूंनी साम्राज्यविस्तार अखंड हिंदूस्थानात केला.
छत्रपती शाहूंनी कर्तबगार व्यक्ती ओळखून त्यास यॊग्य संधी देणे व त्याने त्या संधीचे चीज करून मराठा साम्राज्याचा उत्कर्ष करणे हेच या कालखंडाचे वैशिष्ट्य. पिलाजी जाधवरावांची छत्रपती शाहूंवर अथांग निष्ठा हॊती व पेशवे घराण्यावर दृढ असा स्नेहभाव आपल्याला दिसून येतो.बाळाजी विश्वनाथ नंतर बाजीराव पेशवा सॊबत देखिल पिलाजीराव अनेक महत्वाच्या मॊहिमांमधे अग्रभागी हॊते. गुरूस्थानी असलेल्या पिलाजीरावांना बाजीराव, चिमाजी आप्पा त्याचबरॊबर नानासाहेब ते सदाशिवराव सर्वांनी आदरानेच वागवले.
श्रीमंत सुभेदार सरदार पिलाजीराव जाधवराव यांचे भव्य समुहशिल्प नांदेड सिटी पुणे येथे उभारण्यात अलेले आहे. पिलाजीरावांचा अश्वारूढ़ पुतळा अणि मागे ११ मावळे. अतिशय रेखीव सुंदर असे शिल्प समस्त नांदेड़कर जाधवराव यांच्या सौजन्याने हे शिल्प उभारण्यात अले आहे. शिल्प पाहूनच त्यांच्या कर्तृत्वाचा आणि शौर्याचा अंदाज येतो.
लेखन – विजयश भोसले माहिती आवडल्यास शेयर करा आम्ही आपल्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेउन येणार आहोत. आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला इमेलद्वारे पाठवू शकता.
Comment

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...