विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 April 2019

#छत्रपती #राजर्षी #शाहू #महाराज

#छत्रपती #राजर्षी #शाहू #महाराज
१०० वर्षांपूर्वी कोल्हापुरात आणि पर्यायाने भारतात एक #ऐतिहासिक_घटना घडली होती.
१८९४ साली #कोल्हापूरचा_कारभार हाती घेतलेल्या छत्रपती शाहू महाराजांना आजपासून १०० वर्षांपूर्वी म्हणजेच २१ एप्रिल १९१९ रोजी कानपूरमध्ये #राजर्षी ही #पदवी बहाल करण्यात आली होती.
राजर्षी या पदवीच्या नावावरूनच महाराजांचे जीवन कसे व्यतीत झाले याचा अंदाज येऊ शकतो.
#राजा + #ऋषी असा तयार झालेला #राजर्षी हा शब्द खास महाराजांसाठीच असावा असा विचार मनात येतो.
इंग्रजांच्या काळात जेव्हा इतर संस्थानचे राजे ऐश आरामात जगत होते तेव्हा #कोल्हापूर नावाच्या आई अंबाबाईच्या नगरीत छत्रपती शाहू महाराज हे मात्र आपण #छत्रपती_शिवाजी महाराज आणि #छत्रपती_संभाजी महाराजांचे वंशज असल्याची जाणीव ठेवून जनतेसाठी झटत होते.
कोल्हापूरात असे एखादेच क्षेत्र असावे ज्यात महाराजांनी आपले #योगदान दिले नाही.
आजही साऱ्या महाराष्ट्रात #दुष्काळ पडला तरी कोल्हापूर #सुजलाम_सुफलाम असते, याला कारण म्हणजे महाराजांच्या कार्याचे पोवाडे गात उभी असणारी राधानगरी आणि काळम्मावाडीची #धरणे!
ज्या काळात फक्त मुंबई येथे औद्योगिक वसाहती होत्या त्या काळी कोल्हापूर येथे #औद्योगिक_वसाहत वसवून कोल्हापूरच्या कित्येक पिढ्यांना रोजगार देऊन आणि त्यांच्या घरच्या चुली विझू न देण्याचे पुण्यकर्म करणारे महाराज साक्षात द्रौपदीला न संपणाऱ्या अन्नाची थाळी देणाऱ्या #श्रीकृष्णाची_आठवण करून देतात.
तत्कालीन गावकुसाबाहेर शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी वसवून महाराजांनी #दूरदृष्टी कशी असावी याचा आदर्शच घालून दिला.
आजही #महाराष्ट्रात_एकमेव असणारे #कुस्तीचे_मैदान म्हणजेच #खासबाग मैदान हे अतुल्य स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून आपले पाय घट्टपणे रोवून शहराच्या मधोमध उभे आहे.
स्वतः #उत्तम_मल्ल असणाऱ्या महाराजांनी निव्वळ कोरड्या पाषाणासारखे उपदेश न देता हे मैदान बांधून कोल्हापूरसह देशभरातील कुस्तीगीरांसाठी या शहराला #कुस्तीचे_माहेरघर बनवले.
अगदी कळंबा तलावापासून शहरात पाणी पुरवठा करताना पाणी अशुद्ध होऊ नये म्हणून पाईपलाईन कमान बांधून वरून घेण्याची कल्पना लक्षात घेता आजच्या काही राजकारण्यांच्या बुद्धीची कीवही आल्याशिवाय राहत नाही.
महाराजांचे #शिक्षणावरील_प्रेम तर विख्यातच!
आजही महाराजांचे या क्षेत्रातील योगदान एखाद्यास बघायचे असल्यास #दसरा_चौकात जाऊन उभे राहावे. समाजातील जातपात लक्षात घेता प्रत्येक समाजासाठी वेगळे #बोर्डिंग उभे करणारे शाहू महाराज हे एकमेव!
त्याचसोबत शाहू महाराज हे #सक्तीचे_शिक्षण सुरू करणारे संपूर्ण देशातील #पहिले_राज्यकर्ते! त्याकाळी मुलांना शिक्षण घेऊ न देणाऱ्या पालकांना काही प्रमाणात दंडही होत, यावरून त्यांचा शिक्षणाचा आग्रह दिसून येतो.
महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज तसेच महाराणी ताराबाई यांच्यावर असणाऱ्या श्रद्धेपोटी महालक्ष्मी रथोत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवराय आणि करवीर संस्थान संस्थापिका महाराणी ताराबाई यांचा #रथोत्सव सुरू केला.
आज योगायोग म्हणजे महाराजांना राजर्षी ही पदवी मिळून ज्यादिवशी १०० वर्षे पूर्ण होत आहेत, त्याच दिवशी हा रथोत्सवाचा मुहूर्त आला आहे.
महाराजांची कार्ये किती आणि काय काय सांगावी?
कोल्हापूर अर्थात करवीर नगरी ही दक्षिण काशी! इथं मरणाऱ्याला #स्वर्ग प्राप्त होतो अशी आम्हा कोल्हापूरकरांची श्रद्धा! पण इथं जगणाराही स्वर्गात जगल्याप्रमाणे जगतो, याचे श्रेय मात्र महाराजांना!
- #प्रतिराज_मांगोलीकर
🅿®
(टीप - पोस्ट शेअर करायची असल्यास कृपया नावासह शेअर करावी.)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...