विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 29 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 46

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 46
सेनापति कापशीकर नवन्याळकर घोरपडे-----------------5


नवलिहाळकर घोरपडे म्हणून चिफ ऑफ कापशी संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांचे पाचवे बंधु श्रीमंत जयरामराव राणोजीराजे घोरपडे यांना अधिकार दिले गेले
पांगिरकर घोरपडे म्हणून चिफ ऑफ कापशी संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांचे सहावे बंधु श्रीमंत सुब्बाराव राणोजीराजे घोरपडे यांना अधिकार दिले गेले
खडकेवाडकर घोरपडे म्हणून चिफ ऑफ कापशी संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांचे सातवे बंधु श्रीमंत नारायणराव राणोजीराजे घोरपडे यांना अधिकार दिले गेले अशा तर्हेने पहिले चिफ ऑफ कापशी सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या रक्ताच्या घराण्यातील तिसरे चिफ ऑफ कापशी यांच्या नऊ पुत्रांपैकी एक श्रीमंत जयरामराव घोरपडे हे नवलिहाळकर घोरपडे घराण्यातील पहिले पुरुष
श्रीमंत संभाजीराजे शिंदे सेनाखासकील , श्रीमंत नारायणराव घोरपडे इचलकरंजीकर , श्रीमंत उदाजीराव चव्हाण हिंमतबहाद्दर , श्रीमंत सुलतानराव जाधव जप्तनमुलुख , श्रीमंत नारायणराव जाधव हवालदार , श्रीमंत सयाजीराव सरनौबत , श्रीमंत रामचंद्रराव घोरपडे अमीर उल उमराव , श्री जयरामराजे घोरपडे नवलिहाळकर वगैरे मानकरी …… ( हे श्रीमंत जयरामराजे घोरपडे नवलिहाळकर म्हणजे आत्ता कापशी मध्ये असणारे रामराव नवन्याळकर सरकारांचे पुर्वज ..) यांना त्यांच्या कोल्हापूर संस्थानातील फौजेच्या जबाबदारी प्रमाणे दरबारी सन्मान आणी आसन होते
त्याप्रमाणे पुढे श्रीमंत जयरामराव राणोजीराजे घोरपडे यांचा वंशविस्तार होत गेला आणी त्यापैकी काही घराणी ही आत्ताच्या कासारीकर , माद्याळकर घोरपडे घराण्याप्रमाणे छोट्या छोट्या जहागीरीत तबदिल झाली आज श्रीमंत जयरामराव घोरपडे हे नवलिहाळकर त्यांच्या नवलीहाळ या गावी असून त्या वंशातील त्यांचे पुतणे श्रीमंत रामराव बापुसाहेब घोरपडे हे पुन्हा वाटणीस्वरुपात कापशीमध्ये स्थाईक झाले आहेत

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 45

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 45
सेनापति कापशीकर नवन्याळकर घोरपडे-----------------4


पिराजीरावांचे एकमेव पुत्र राणोजीराजे हे सेनापती बनले हे कापशीकर घोरपडे घराण्याचे तिसरे चिफ ऑफ कापशी बनले सेनापती राणोजीराजे पिराजीराव घोरपडे यांना नऊ पुत्र होते
त्यापैकी पहिला पुत्र संताजीराव ( दुसरे ) हे सेनापतींच्या मुळ कापशीकर घोरपडे घराण्याचे चौथे चिफ ऑफ कापशी बनले संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांच्या उर्वरीत आठ भावांपैकी
श्रीमंत मालोजीराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत पिराजीराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत राघोजीराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत जयरामराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत सुब्बाराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत सखारामराव राणोजीराजे घोरपडे श्रीमंत नारायणराव राणोजीराजे घोरपडे आणी
श्रीमंत द्वारकोजीराव राणोजीराजे घोरपडे
इथे कापशीकर घोरपडे घराण्याचा वंशविस्तार प्रचंड वाढला आणी कापशीकर घोरपडे घराण्यातील संस्थानातील काही गावे वाटणीस्वरुपात विभागली गेली
हसूरकर घोरपडे म्हणून चिफ ऑफ कापशी संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांचे दुसरे बंधु श्रीमंत मालोजीराव राणोजीराजे घोरपडे यांना अधिकार दिले गेले
गलगलेकर घोरपडे म्हणून चिफ ऑफ कापशी संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांचे तिसरे बंधु श्रीमंत पिराजीराव राणोजीराजे घोरपडे यांना अधिकार दिले गेले

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...