विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 29 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 45

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 45
सेनापति कापशीकर नवन्याळकर घोरपडे-----------------4


पिराजीरावांचे एकमेव पुत्र राणोजीराजे हे सेनापती बनले हे कापशीकर घोरपडे घराण्याचे तिसरे चिफ ऑफ कापशी बनले सेनापती राणोजीराजे पिराजीराव घोरपडे यांना नऊ पुत्र होते
त्यापैकी पहिला पुत्र संताजीराव ( दुसरे ) हे सेनापतींच्या मुळ कापशीकर घोरपडे घराण्याचे चौथे चिफ ऑफ कापशी बनले संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांच्या उर्वरीत आठ भावांपैकी
श्रीमंत मालोजीराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत पिराजीराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत राघोजीराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत जयरामराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत सुब्बाराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत सखारामराव राणोजीराजे घोरपडे श्रीमंत नारायणराव राणोजीराजे घोरपडे आणी
श्रीमंत द्वारकोजीराव राणोजीराजे घोरपडे
इथे कापशीकर घोरपडे घराण्याचा वंशविस्तार प्रचंड वाढला आणी कापशीकर घोरपडे घराण्यातील संस्थानातील काही गावे वाटणीस्वरुपात विभागली गेली
हसूरकर घोरपडे म्हणून चिफ ऑफ कापशी संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांचे दुसरे बंधु श्रीमंत मालोजीराव राणोजीराजे घोरपडे यांना अधिकार दिले गेले
गलगलेकर घोरपडे म्हणून चिफ ऑफ कापशी संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांचे तिसरे बंधु श्रीमंत पिराजीराव राणोजीराजे घोरपडे यांना अधिकार दिले गेले

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...