मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 2
घो र प डे इ च ल क रं जी क र ------------1
इचलकरंजी संस्थानचा मूळ संस्थापक नारो महादेव हा होय. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात जी कित्येक कोंकणस्थांची घराणी, आपले नशीब काढण्याकरितां घाटांवर आली,त्यांतच रत्नागिरी जिल्ह्यांतील वरवडेकर जोशांच्या घराण्याचा समावेश होता. नारो महादेवांचे वडील महादेवपंत हें सावंतवाडी संस्थानांतील म्हापण गांवच्या कुलकर्णीपणाचें काम करीत होते. नारोपंत हे अवघे चार पांच वर्षाचे असतांना, महादजीपंत निर्वतले. त्यामुळे महादजीपंतांची बायको गंगाबाई ही आपल्या मुलाला घेऊन उदरनिर्वाह करण्याकरितां घाटावर बहिरेवाडी येथे आली. प्रसिध्द मराठा सेनापती संताजी घोरपडे याचें हें रहाण्याचें ठिकाण होते. या ठिकाणी असतांना नारोपंतांच्या अंगचे विलक्षण गुण संताजीच्या नजरेस पडल्यामुळे संताजीने त्यास आपल्या दिमतीस ठेवले व लिहिणे वाचणे, घोडयावर बसणे, निशाण मारणे इत्यादि त्या काळची सर्व विद्या शिकविण्याची व्यवस्था लावून दिली.
राजारामाच्या कारकीर्दीत संताजीरांव हे सेनापती असल्याने त्यांना नेहमी स्वारीवर असणे भाग पडे. संताजीरावांनी राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचे स्वातंत्र्य राखण्यासाठी जे असाधारण पराक्रम केले, ज्या अचाट मसलती केल्या त्यांत नारोपंतांनी बहुमोल मदत केली. नारोपंतांवर संताजीची बहाल मर्जी होती व नारोपंताचीहि संताजीवर अतिशय भक्ति असे; ती इतकी की, नारोपंतांनी आपले मूळचें जोशी हें आडनाव बदललें व आपल्या धन्याचे-संताजीचें –घोरपडे हें आडनांव धारण केले. अद्यापिहि, नारोपंताचे वंशज 'घोरपडे' हेंच आडनाव अभिमानपूर्वक आपल्या पुढे लावतात.

No comments:
Post a Comment