विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 29 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 36

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 36

एकमहानसरसेनापती.सं ता जी घो र प डे.-------------5


पुढे हाच स्वातंत्र लढा संताजी-धनाजीने बेलगाव-धारवाड़ करत कर्नाटक प्रांतात नेला. नंतर ह्यांनी जिंजीकड़े आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शेहजादा काम्बक्ष वेढा घालून बसले होते. संताजी साधारण १५ हजाराचे घोड़दल घेउन तर धनाजी साधारण १० हजाराचे घोड़दल घेउन जिंजिंस थडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेउन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागुन येणार्या संताजिंस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजिंच्या मोगली फौजेला रसद पुरवित असे. त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले. (संदर्भ- जेधे शकावली) या लढाईची फ्रेंच गवरनर मार्टिन याने आपल्या डायरित नोंद केलि आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशा समोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली. जिंजीच्या मोगली सैन्याचीतर वाताहात झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते. त्यात किल्ल्यातुन मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावनित आला. जुल्फिकार खानने राजारामकड़े वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुक्माची वाट पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वतंत्रयुद्ध)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...