विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 29 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 41

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 41

एकमहानसरसेनापती.सं ता जी घो र प डे.-------------10


संताजिच्या खूनास जबाबदार कोण? रियासतकार सरदेसाई ह्यांच्या मते नागोजी मानेच खरा जबाबदार, जादूनाथ सरकार म्हणतात नागोजी मानेने संताजिचा खून केला. डॉ. खोबरेकर सुद्धा नागोजी मानेलाच जबाबदार धरतात. जयसिंह पवार लिहितात की अमृतराव निम्बालकर हा नागोजी मानेचा मेहुणा. नागोजी मानेची बायको ही अमृतराव निम्बालकरची बहिण. याच अमृतारावंस संताजिने आयेवरकुट्टीच्या युद्धात मारले होते आणि त्याचा बदला म्हणुन नागोजी मानेन संताजिंस कपट नीतीने मारले. पण जेवढा नागोजी माने या खुनास जबाबदार तेवढेच खुद्द राजाराम राजे आणि धानाजी जाधव सुद्धा संताजिच्या मृत्युस कारणीभुत. संताजी हा खरा योद्धा होता आणि त्यांस राजनीतिची तितकीशी जाण नसावी. म्हणुनच जेव्हा जुल्फिकार खानाची जिंजिच्या युद्धात नाकाबंदी झाली होती, तेव्हा संताजीचा डाव मोग्लांचा पूर्ण बीमोड करण्याचा होता. पण राजारामने जुल्फिकार खानास वाट दिली आणि येथूनच दोघां मधे वादास सुरुवात झाली. धनाजी जाधव हे एक श्रेष्ट योद्धा होतेच पण त्याच वेळी ते एक उत्तम राजकारणी सुद्धा होते. हे नंतरच्या काळात प्रकर्षाने जाणवते. वास्तविक संताजी आणि धनाजी या दोघानी जिंजित जुल्फिकार खानाची कोंडी केली होती आणि खानास जेव्हा मोकळी वाट दिली गेली तेव्हा जेवढा राग संताजिंस आला होता तेवढाच धनाजिंस सुद्धा आला असणार पण त्याने राजारामच्या निर्णयाचा कुठेच विरोध केला नाही. संताजिचे युद्ध कौशल्य हे तर अद्वितीय आहे. संताजिने मोगलान विरोधात संगर्ष बुरहानपुर ते थेट जिंजी पर्यंत नेला. संताजिने गनिमी काव्याचा पुरेपुर उपयोग केला. जर का आपण संताजिचे काही युद्ध कौशल्य पाहिले तर एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे, संताजी आपल्या सैन्याचे दोन-तीन तुकडे करीत आणि अगदी अल्प शिबंदिनिशी शत्रु समोर जात. जेव्हा शत्रुस समजे की संताजी अगदी थोडक्या फौजेनिशी जात आहे. तेव्हा तो संताजिवर तुटून पड़े, युद्धास सुरुवात झाल्यावर संताजी पळ काडी आणि आड़ वाटेवर जाई. या ठिकाणी आधीच त्याने आपले बंदूकधारी पेरलेले असत. शत्रु संताजिचा पाठलाग करीत या जागी येई आणि मग बंदूकिच्या गोल्यांच्या आहारी जाई. उरलेल्या शत्रु सैन्याचा पड़ाव करण्यासाठी संताजी आपली राखीव फौज त्यांवर धाडी. संताजिने अनेक युद्धात बंदुकधारयांचा उपयोग केलेला दिसते, हे बंदुकधारी कर्नाटकातले नायक समाजातले असत.

(संदर्भ - संताजी घोरपडे: जयसिंह पवार)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...