मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 9
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास --------6
तात्या या लाडांत वाढलेला अनूबाईचा एकुलता एक मुलगा. त्याचे वडील व्यंकटराव यांनीं त्यास लहापणींच देशमुखीच्या कामांत घालून राज्यकारभाराचा ओनामा पढविला होता. परंतु दुर्दैवानें तात्यांस एकविसावें वर्ष लागतें तोंच वडील मृत्यू पावून सर्व कारभार अनूबाईस पहाणें प्राप्त झालें. बाईची हिंमत, धोरण व महत्वाकांक्षा जबरदस्त होती. त्यांचे भाचे नानासाहेब पेशवे भाऊसाहेब दादासाहेब यांजवर त्यांची चांगली छाप होती. तात्यांस त्यांनीं स्वतंत्रपणें कधीं वागूं दिलें नाहीं. ‘हें लहान पोर याला काय समजतें!’ अशा भावनेंनें अनूबाई त्यास जन्मभर वागवीत गेल्या. तात्या हे सरदारीचे मालक नांवाचे मात्र होते. या सर्व गोष्टींचा परिणाम तात्यांच्या मनावर प्रतिकूल रीतीचा होऊन बाईच्या ओंजळीनें पाणी पिण्याचा त्यांस कंटाळा येंऊ लागला. संस्थानांतील लबाड लोकांनीं तात्यांस भर देऊन आई व तिचे कारभारी यांविषयीं त्यांच्या मनांत वितुष्ट उत्पन्न केलें.
सन १७५७ च्या प्रारंभीं नानासाहेब व भाऊसाहेब श्रीरंगपट्टणच्या स्वारीस आले. स्वारींत अनूबाई नव्हत्या. तात्या धारवाड प्रांतीं फौजेसह होते. त्यांस श्रीमंतांच्या स्वारींत हजर रहाण्याविषयीं अनूबाईनीं लिहून पाठविले. तेव्हां वर सांगितलेल्या वितुष्टाचा प्रकार प्रथम उघडकीस आला. तात्या श्रीमंतीबरोबर स्वारीस गेले नाहींत. अनूबाईंच्या हाती कांहीं सत्ता नसावी, सर्व कारभार आपल्या हातीं असावा, मन मानेल त्याप्रमाणें वागण्यास आपणास कोणाची आडकाठी नसावी ही त्यांची इच्छा आतां उघड रीतीनें दिसू लागली. स्वारी आटोपून श्रीमंत परत पुण्यास गेले तेव्हां अनूबाईचें ह्मणणें पडलें कीं, तात्यांनी आपणाबरोबर पुण्यास श्रीमंतांकडे जाऊन आपल्या सरदारीचे व दौलतीचे लढे उलगडून घ्यावे. परंतु तें त्यांच्या मर्जीस येईना. ते धारवाडाकडे परत आले. मग बाईंनीं धारवाडास जाऊन तात्यांची कांहींशी समजूत काढून त्यांस घेऊन त्या परत इचलकरंजीस आल्या.

No comments:
Post a Comment