आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे...
भाग 3
व्हिएतनाम....
व्हिएतनाम या देशाला आपण ओळखतो ते एक कम्युनिस्ट राष्ट्र, ज्याने सत्तर च्या दशकात अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला नमविले. मात्र हे व्हिएतनाम, कोणे एके काळी पूर्ण हिंदू राष्ट्र होतं. या देशाचं नाव तेंव्हा ‘चंपा’ होतं आणि याचे पाच प्रमुख विभाग होते –
1. इंद्रपुर
2. अमरावती (चंपा)
3. विजय (चंपा)
4. कौठर
5. पांडुरंग (चंपा)
इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून पुढे जवळपास एक हजार वर्ष हा देश हिंदू आचार, विचार वागवत समृध्द होत होता. श्री भद्रवर्मन, गंगाराज, विजयवर्मन, रुद्रवर्मन, ईशानवर्मन सारख्या महापराक्रमी राजांनी हा देश भरभराटीला आणला. इसवी सनाच्या पाचव्या शतकात सुरुवातीला भद्रवर्मनचा मुलगा गंगाराज याने सिहांसनाचा त्याग करून जीवनाची शेवटची वर्षे भारतात येऊन #गंगा किनारी व्यतीत केली. पुढे पांडुरंग वंशाने बरीच वर्षे राज्य केले.या संपूर्ण कालावधीत, ‘चंपा’ च्या इतिहासात, भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने राबविली गेली. भारतीय पध्दती प्रमाणे सेनापती, पुरोहित, पंडित वगैरे रचना होती. महसूल व्यवस्था ही भारताप्रमाणेच ठेवण्यात आली होती. मंदिरं भव्य नव्हती, पण कलात्मक होती. यज्ञ, याग, अनुष्ठानं मोठ्या प्रमाणात व्हायची. भारतीय ग्रंथ, पुराण यांना विशेष महत्त्व होतं. या ‘चाम’ संस्कृतीचे काही अवशेष आजही शिल्लक आहेत, जे ‘चम’ या नावाने ओळखले जातात. मुळात ही ‘चम’ म्हणजे हिंदू रीतीरिवाज पाळणारी माणसं आहेत. कंबोडिया आणि व्हिएतनाम या दोन देशात ह्या ‘चम’ लोकांना अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळालेला आहे.
No comments:
Post a Comment