आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे...
भाग 6
सिंगापुर...
सिंगापुरचं मूळ नावच मुळी ‘सिंहपुर’ आहे. स्वतः सिंगापुरकरांनाही याचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्या अधिकृत गाईड मधे तसा स्पष्ट उल्लेख आहे. पूर्वीच्या सिंहपुरात संस्कृतचा वापर कसा व्हायचा हे ही सिंगापुर सरकार अभिमानाने सांगते. सिंहपुर हे नाव असल्यानेच सिंगापुर ने "सिंह" ही स्वतःच्या देशाची खुण म्हणून स्वीकारली आहे.
_________________
एकुणात काय, तर हा संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया सुमारे हजार – बाराशे वर्ष हिंदुत्वाची सूक्तं गात होता. हिंदू पद्धतीनं जीवन यापन करत होता. भव्य आणि कलात्मक मंदिरं उभारत होता. यज्ञ-याग करत होता. देवाला आळवत होता. वेद, उपनिषद, पुराण यांच्या ऋचांनी आसमंत भारून टाकत होता. जगाला शांततेचे संस्कार देणारी हिंदू आणि बौध्द संस्कृती, त्या सर्व देशांना सुख समाधानाने, शांतीने जगायला शिकवत होती..!
या सर्व प्रवासात भारताने आपली वर्णव्यवस्था तिथे नेली नाही. आपली खाद्यसंस्कृती त्या देशांवर लादली नाही. त्या देशांना आपल्या #वसाहती समजल्या नाही. व्यापारासाठी त्या देशांना वेठीला धरलं नाही. तिथल्या लोकांना तुच्छ लेखलं नाही. तिथे कुठेही युध्द करून त्यांना जिंकलं नाही..!
हे सर्व फार महत्वाचं आहे, कारण पुढे सहाशे – सातशे वर्षानंतर इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, स्पेनिश या लोकांनी आशिया खंडात ज्या वसाहती उभारल्या, त्यांत वरील पैकी एकही गोष्ट त्यांनी पाळली नाही..!
आपलं दुर्दैव इतकंच, की ह्या वैभवशाली, उदात्त आणि अभिमानास्पद इतिहासाविषयी आम्हाला काहीही माहिती नाही आणि आजवर आपल्या राज्यकर्त्यांनी हा हिंदू इतिहास जनतेला माहिती करून देण्याची इच्छाही दाखवली नाही..!!
(Source : शोध दैवी शक्तींचा)
No comments:
Post a Comment