विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 June 2019

फोंड्याचा संग्राम



फोंड्याचा संग्राम
२७-१०-१६८३ रोजी फोंड्याला वेढा देण्यासाठी वीजरई सैन्यानिशी आगाशीस पोहचला त्याचा मार्ग जुने गोवे,आगाशी, दुर्भाट, कवळे व फोंडा असा होता विजरईबरोबर ३२०० लढाऊ लोक,२५ घोडेस्वार आणि ४ तोफा होत्या 
मुघलांनी कोकण घेण्यापूर्वी दक्षिण कोकणवर कब्जा करण्याचा बेत असल्याने त्याने फोंड्यास वेढा दिला २८-१०-१६८३ रोजी विजरई सैन्यासह संभाजीच्या फोंडे महालातील दूर्भाट बंदरात उतरला तेथे ३०० मराठ्यांच्या तुकडीबरोबर चकमक उडाली ०१-११-१६८३ रोजी या तुकडीबरोबर प्रतिकार करून विजरईचे सैन्य दुर्भाट हुन फोंड्यास गेले फोंड्याचा देसाई दुलबा नायक हा फितुर होऊन पोर्तुगीजाना दुर्भाट येथे ७० शिपायासह विजरईस मिळाला त्यानी फोंडा किल्ल्याजवळ दारूगोळ्याची व्यवस्था केली.
या गडावर सरनोबत येसाजी कंक आणि मुलगा कृष्णांजी हा पदाती नायक होता किल्ल्यात मराठ्यांचे ६०० मावळे शिवाय २०० शिपाई रानात योग्य संधीची वाट पाहात लपून बसले होते मराठयांनी तोफांचा भडिमार सुरू केला पोर्तुगीजानी गडाच्या तोंडाशी असलेल्या रस्त्यावर तोफा डागुण दारूगोळ्याचा मारा करून गडाच्या बाहेरील तटबंदीला भगदाड पाडले या वेळी मराठ्याकडून फारसा प्रतिकार झाला नाही त्यामुळे आपण सहज गड घेऊ असे पोर्तुगीजांना वाटले 
तटाला पडलेल्या भगदाडातुन पोर्तुगीजानी प्रवेश केला व तटाच्या आतील खंदक ओलांडला 
मराठयांनी त्यानां दरवाजापर्यत येऊ दिले व त्यांच्यावर तुटुन पडले गडावरून गोळ्यांचा वर्षाव करत संधीची वाट पाहत बसलेल्या मराठयांनी हर हर महादेव म्हणत पोर्तुगीजांना दे माय धरणी ठाय करून सोडले हे हल्ले इतके निकराचे होते की पोर्तुगीजांना माघार घेण्यावाचून गत्यतरच उरले नाही
संभाजी महाराजांचे या वेढ्याकडे विशेष लक्ष होते पोर्तुगीजाचा मारा पहाताच ०४-११-१६८३ ला संभाजी महाराजांनी घोड्याच्या ४ तुकड्या आणि २०० पायदळाची कुमक पाठवण्यात आली पाच दिवस वेढ्याचे काम चालून त्यांची काहीच प्रगती झाली नव्हती
०९-११-१६८३ पडलेल्या भगदाडातुन किल्ल्यात शिरण्याचा दिवस पोर्तुगीजानी मुक्रर केला हा अखेरचा हल्ला करण्याची तयारी होत असतानाच लढाईचा रंग पालटला 
स्वराज्याविषयीची कळकळ आणि प्रेम संभाजीराजेना राजापूरला स्वस्थ बसू देईना फोंड्याच्या आघाडीवर जातीने जाण्याचा त्यानी निश्चय केला राजे तातडीने राजापूरहुन फोंड्याला पोहोचले 
पोर्तुगीजांच्या नजरेसमोर त्यानी सुमारे ८०० स्वारांच्या सरक्षणाखाली आपले ६०० मावळे किल्ल्यात घातले राजे स्वतः जातीने या वेढ्यास असल्याने विजरईला छत्रपती समोर लढण्याची हिम्मत झाली नाही जे ६०० सैनिक फिरंगीयाच्या नजरेसमोरन किल्ल्यात गेले त्यानां अडवण्याची ताकद एकाही फिरंग्याला झाली नाही
सरनोबत येसाजी व कृष्णांजी शौर्याने धैर्याने लढताना शत्रूला मारून काढला शत्रूचा पराभव झाला पण यात दोघे पितापुत्र गंभीर जखमी झाले रणांगणावर जखमी झालेल्या पितापुत्राच्या जखमा शंभुराजांनी पाहिल्या दोघांना घरी जावयास सांगून महाराज गड लढून लागले
सुरवातीला पोर्तुगीजांच्या दारूगोळ्यासमोर आपला निभाव लागणार नाही असे वाटले होतें हा गड मराठ्यांच्या ताब्यात रहावा तो शत्रूच्या हाती पडू नये स्वामींची फत्ते व्हावी म्हणून तेथील हवालदार, सरनोबत, सबनीस, नाइकवडी हे फोंड्याच्या पिरास नवस बोलले होते स्वामींची फत्ते झाल्यावर 
०२-०१-१६८४ रोजी कवी कलश यांनी नागनाथाला लिहून पिरास दरवर्षी ५० होन उदफुल, दिवा इ.साठी दिले

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...