अफगाणी सैन्यासमोर एका बुलंद तोफे प्रमाणे लढणारा मराठा योद्धा
इतिहासातील आपल्या मराठा साम्राज्य बद्दल अथवा शूर सेनानी बद्दल बोलायचे झाल्यास अगदी शब्द कमी पडतील, शिवाजी महाराजांच्या नंतर म्हणजेच त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यात थोडी खळबळ माजली होती पण संभाजी महाराज तसेच दत्ताजी, येसाजी, धनाजी, संताजी, महादजी यांच्यासारख्या शुर सरदारांनी मराठ्यांचा भगवा एका वेगळ्याच उंचीवर नेला.
आज आपण मराठा साम्राज्यातील अशाच एका सरदाराची कर्तबगारी, शौर्य तसेच त्यानी लढाईदरम्यान गाजवलेली मैदाने यांची माहिती मिळवणार आहोत त्यांचे नाव आहे “महादजी शिंदे”.
महादजी शिंदे पेशवाईतील एक कुशल तसेच चतुर सरदार होते, त्यांचा जन्म 1730 मध्ये झाला होता. वयाच्या दहाव्या वर्षापासून रणांगण गाजवायला त्यांनी सुरुवात केली होती. 1745 ते 1761 या काळात मराठ्यांचा भगवा अटकेपार पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. दक्षिण पासून ते सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर, अटक व पेशावर पर्यंतचा भाग मराठ्यांच्या ताब्यात होता आणि या सुवर्णकाळात महाजी शिंदेंचे महत्त्वाचे योगदान होते, पण त्यानंतर 1761 मध्ये पानिपत युद्धात मराठ्यांची खूप हानी झाली, पण महादजी शिंदे यांनी नंतर पुन्हा मराठ्यांचे साम्राज्य उभे केले होते. पानिपत ऐवजी बुंदेलखंड, रोहीलखंड तसेच दिल्लीतील लढतीत महादजी शिंदेनी मराठ्यांचे नेतृत्व केले होते.
पानीपतचे युद्ध
14 जानेवारी 1761 ची सकाळ वार बुधवार मकर संक्रांतीचा तो दिवस, या दिवशी दिल्लीपासून जवळपास 80 किलोमीटर दूर पानिपत मध्ये भारताच्या इतिहासाला एक वेगळे वळण लागणार होते. पानिपत मधुन वाहणाऱ्या यमुना नदीच्या किनाऱ्यावर भारताच्या सगळ्यात महत्त्वाच्या लढाई पैकी एक होणार होती. ही लढाई होती मराठा विरुद्ध काबूलचा राजा अहमदशहा अब्दाली यांच्यात. तेव्हा लोकांचे म्हणणे होते की ही लढाई फक्त आण व शान राखण्यासाठी नसून ही लढाई भारताची सीमा ठरवणारी होती, ही लढाई भारतीय सभ्यतेची सीमा ठरवणारी होती.अठराव्या शतकातील हा तो काळ होता जेव्हा मुघल दिल्लीचे बादशहा तर होते पण त्यांची मजल फक्त लाल किल्ल्यापर्यंत होती. या काळात मुगल फौज एकदम शक्तिहीन होती, त्या काळात सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे “मराठा साम्राज्य”. त्याकाळी जवळपास संपूर्ण भारतात मराठ्यांची सत्ता होती, आंध्र व तमिळनाडूत निजाम शासक होते पण 1760 मध्ये मराठ्यांनी त्यांनाही नमवले. त्याआधी 1758 मध्ये मराठ्यांनी आपले वर्चस्व दिल्ली, रोहीलखंड, तसेच पंजाब पासून ते सिंधू नदीचा किनाऱ्यापर्यंत म्हणजेच अटक पर्यंत मराठा साम्राज्य होते आणि या संपूर्ण लढाईमध्ये महादजी शिंदे एक बुलंद तोफे प्रमाणे लढत होते. पंजाबवर विजय मिळवल्यानंतर मराठ्यांची टक्कर अफगाणिस्तानचा राजा अहमदशहा अब्दाली याच्याशी झाली.
मराठे जेव्हा उत्तर भारतात आले तेव्हा त्यांनी ओडीसा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार हे तमाम क्षेत्र सुद्धा आपल्या राज्याला जोडले व येथून मराठ्यांनी सारा म्हणजेच टॅक्स गोळा करायला सुरुवात केली. पण तेथील ज्या क्षत्रिय सत्ता होत्या जसे की अवध, रोहीलखंड या सर्व सत्ताधार्यांना मराठ्यांना सारा द्यावा लागू लागला. त्यांना आता मराठ्यांपासून धोका वाटू लागला. त्यातच मराठ्यांनी राजपुताना सत्ताधिकाऱ्यांकडूनही सारा गोळा करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे जयपूरचा राजा माधव सिंह खूप नाराज झाला आणि उत्तर भारतातील सगळ्या सत्ताधीशांना वाटू लागले की मराठ्यांना आता कोणीतरी आवरले पाहिजे, पण मराठ्यांना आता रोखणार कोण ? कारण उत्तर भारतातील सगळ्यात राजांना मराठ्यांनी पाणी पाजले होते तेव्हा या सगळ्यांनी मिळून अहमदशाह अब्दालीची मदत घेतली.
अब्दालीची भारतावर स्वारी
ऑक्टोबर 1759 मध्ये अब्दाली आपले सैन्य घेऊन भारतावर स्वारी करण्यास निघाला, तेव्हा त्याला पुरते माहीत होते की आपल्याला मराठ्यांना हरवावेच लागेल. भारतात आल्यानंतर 27 ऑक्टोबर 1760 मध्ये पंजाब जिंकून तो दिल्लीपर्यंत आला. पंजाब ते दिल्ली या प्रवासादरम्यान त्याचा छोट्या-छोट्या मराठ्यांच्या तुकड्याबरोबर सामना झाला, पण या तुकड्या त्याला रोखू शकल्या नाहीत.या काळात मराठा सैन्य दक्षिण भारतात उदगीर येथे होते, तिथे मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. यात सदाशिवराव भाऊ व महादजी शिंदे हे दोन प्रमुख सरदार होते. 7 मार्च रोजी उदगीर हुन दिल्लीला जाण्यासाठी मराठ्यांची सेना रवाना झाली यात 40 ते 50 हजार सैनिक होते. ही सेना दररोज सात ते आठ मैलाचे अंतर चालत जाई, उदगीर दिल्लीचे अंतर जवळपास 1000 मैलाचे होते. पुढे हळू-हळू ही फौज नर्मदापार करत चंबलच्या भागात पोहोचली, नंतर धोलपूर, भरतपूर येथे गेली. हा भाग सुरजमल जाट या जाट राजाचा होता. मराठा सैन्य 2 जुन 1760 मध्ये ग्वालियर येथे पोहोचले या काळात अब्दालीचा डेरा सध्याच्या उत्तर प्रदेशातील अनुप शहरात होता म्हणजेच मराठा सैनिकांपासून 300 किलोमीटर दूर.
इकडे मराठा सैनिकांनी ज्या पानिपतमध्ये डेरा टाकला होता तिथे कॉलराची साथ पसरली, यात हजारो जनावरे तसेच सैनिक मृत्युमुखी पडले. या काळात काही मराठा सरदार सदाशिवराव भाऊंना भेटले व म्हणाले आता पुढे काय करायचं ? त्यावर भाऊहूंनी महादजींची कल्पना घेतली महादजी म्हणाले, आपण उद्या सकाळी इथून निघायचे आणि दिल्लीला पोहोचायचं. पण यात प्रश्न असा होता की वाटेत अब्दालीचे सैन्य आडवे झाले तर ? त्यावर महादजी शिंदे म्हणाले त्यांना कापत कापत जाऊ, ही कल्पना सगळ्यांना आवडली.
दिवस होता 14 जानेवारी 1761, सेना निघाली सकाळचे जवळपास 8 वाजले असतील, आदल्या रात्री जायचे कसे ही योजना आखण्यात आली. ठरले असे होते की, सैनिकांच्या तुकडीचे घुमट तयार केले जाईल म्हणजेच “फ्रेंच स्क्वेअर” अशी ही लढाईची पद्धत होती. पुढे 9 ते 10 च्या सुमारास अब्दालीचे सैन्य मराठ्यांना येउन भिडली, मराठा सैन्य आपल्या योजनेप्रमाणे काम करत होते. अब्दालीचे सैन्य टप्प्यात आल्यानंतर या तुकडीचा जो तोफ प्रमुख होता त्याने अफगानी सैन्यावर तोफा डागण्यास सुरुवात केली. अफगाणी सैन्य पुरते घाबरले, ते माघारी पळू लागले. ते जसे माघारी पळू लागले तसे एक मराठा तुकडी समोर यायची व त्यांना कापायला सुरुवात करायची, असे करत करत दुपारी 1 पर्यंत मराठे युद्धात आघाडीवर होते. 4500 रोहिले अब्दालीची साथ देत होते. ते माघारी झाले आणि त्याचबरोबर अब्दालीचे 10000 सैन्य माघारी झाले. हे बघता अब्दालीने एक फर्मान जारी केला, जो सैनिक युद्धातून माघार येईल त्याला एक तर तिथेच कापा नाही तर वापस लढायला जाण्यास सांगा.
एकीकडे भाऊ, महादजी व विश्वासरावांनी आपले घोडे पुढे घेतले व अफगाणी सैन्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. सगळे सुरळीत चालू होते पण विठ्ठलराव शिंदे यांची तुकडी समोर आली व त्यांनी वेळेआधीच हल्ला करण्यास सुरुवात केली. ही तुकडी इब्राहीमखान गार्दीच्या तोफखान्या समोर होती. आता तोफ डगण्याचे बंद झाले कारण इब्राहिमच्या पुढे एक मराठा तुकडी होती व मागे एक मराठा तुकडी होती, आता तो पुढेही जाऊ शकत नव्हता व मागेही जाऊ शकत नव्हता व याच संधीचा अब्दालीने फायदा घेतला.
याच वेळी विश्वासरावांना गोळी लागली व ते मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे मराठ्यांचे मनोबल कमी झाले व सायंकाळी चारपर्यंत मराठ्यांचा पराभव झाला. यात होळकरांनी गनिमी कावा पद्धतीने युद्ध लढविण्याचे सांगितले होते पण हे डोंगरी भागात लढले जाऊ शकते आणि पाणीपतची परिस्थिती वेगळी होती. यात सदाशिवराव भाऊ, पेशवा नानासाहेब, विश्वासराव सहित हजारो सैन्य मृत्युमुखी पडले तर महादजी शिंदे गंभीर जखमी झाले होते. दुर्दैव म्हणजे मराठ्यांसाठी सुरजमल जाट वगळता एकही हिंदू राजा मैदानात उतरला नव्हता.
No comments:
Post a Comment