श्रीशैलम, कर्नूल,आंध्र प्रदेश.
मल्लिकार्जुन मंदिर(बार ज्योतिर्लिंग)
छत्रपती शिवाजी स्मृती मंदिर
शिवाजी गोपूर
मल्लिकार्जुन मंदिर(बार ज्योतिर्लिंग)
छत्रपती शिवाजी स्मृती मंदिर
शिवाजी गोपूर
श्रीशैलम हे कर्नूल जिल्ह्याच्या एका टोकाला आहे. कृष्णा नदीच्या
दक्षिणेकडील पहाडी वर बारा ज्योतिर्लिंगातिल हे मंदिर आहे.छ. शिवाजी
महाराजांनी दक्षिण स्वारीच्या वेळी या मंदिराला भेट दिली होती.या मंदिराचे
एक गोपुर (प्रवेशद्वार) महाराजांनी बांधले आहे. हे गोपुर शिवाजी गोपुर
म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या रक्षणासाठी महाराजांनी ३०० सैनिकांची
तुकडी ठेवली होती. पुढे ती तुकडी मंदिराच्या रक्षणासाठी झालेल्या युद्धात
मारली गेली. महाराजांच्या या महत्वपूर्ण कार्याची दखल घेवुन आंध्रवासीय
मराठी बांधवांनी हे छत्रपती शिवाजी स्मृतीमंदिर उभारलेले आहे.मंदिरात
महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा व चार अश्व पुढील पाय उंचावलेल्या
अवस्थेत उभे आहेत.
हैद्राबाद पासून अंदाजे २३२कि.मी अंतर आहे.जाताना जंगल लागते. नंतर कृष्णा नदीवर एक मोठे धरण पास केल्या नंतर ठिकाण लागते.
#मंदिरवीरगळ
Shivaji Nimbalkar यांच्या फेसबुक वाॅलवरुन साभार...
हैद्राबाद पासून अंदाजे २३२कि.मी अंतर आहे.जाताना जंगल लागते. नंतर कृष्णा नदीवर एक मोठे धरण पास केल्या नंतर ठिकाण लागते.
#मंदिरवीरगळ
Shivaji Nimbalkar यांच्या फेसबुक वाॅलवरुन साभार...
No comments:
Post a Comment