शिवप्रताप ” 【 गाथा शौर्याची 】
” शिवप्रताप “【 गाथा शौर्याची 】
मार्गशीष शुद्ध सप्तमी , दि. १० नोव्हेंबर १६५९ , गुरुवारी मध्यानाला , छत्रपती शिवाजी महाराजांनी ,
विजापूर दरबारचा महाबली अफजलखान ह्याचा , दुर्ग ‘ प्रतापगड ‘ , येथे वध केला . अफजलवधामुळे सर्वत्र शिवरायांची दहशत पसरली , राजांनी ह्याच हुकमी संधीचा फायदा घायचा ठरविला ,आणि त्याच रात्री प्रतापगडावरून जलद वेगाने हिंदवी स्वराज्याच्या कमानीतून ३ बाण सुटले , प्रथम सरदार दोरोजीराव ( ह्यांनी कोकण मारले , दाभोळ मुलुख जिंकला ) , सरनौबत नेतोजी पालकर ( ह्यांनी टिकोटा लुटला , पार विजापूरपर्यंत मजल मारली , प्रचंड लूट केली ) , व दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूर प्रांतात स्वारी केली , देशावर चाकण मारलं , मिरजेला वेढा घातला . दि. २८ नोव्हेंबर १६५९ , अफजलवधानंतर नीव्वल १८ दिवसांत राजांनी पन्हाळा जिंकला , प्रचंड दहशत !!!! दुर्ग पन्हाळा हा आदिलशाहीची दक्षिणेतील उपराजधानी होता , पन्हाळा ताब्यात असणे म्हणजे कोकणात गोव्यापर्यंतचा व देशावर बेळगाव धारवाडपर्यंतचा प्रदेश जरबेत असणे , असे त्या शतकातले राजकीय गणित होते .
अफजलवधामुळे शिवरायांची दखल सर्वत्र घेतली जाऊ लागली , मुघल बादशहा औरंगजेब सुद्धा हबकला .
ह्याचा परिणाम असा झाला कि भविष्यामध्ये , ” भारतात कुठेही लढाई झाली , तर त्याचा शिल्पकार शिवाजीच असेल ” , असे धूर्त पोर्तुगीज म्हणत असत . महाराजांच्या ह्या अद्वितीय पराक्रमामुळे हिंदवी स्वराज्य खऱ्या अर्थाने साकारू लागले .
अफजलवधामुळे आदिलशाहीतील सरदार ,
अमीर – उमरावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची चांगलीच जरब बसली होती , असाच एकदा विजापूरात शाही दरबार भरला असता , बडी बेगम बोलती झाली , ” इस दरबार में कोई , मर्द बचा है कि नही ? ” , सर्व दरबार शांत होता . तेवढ्यात एका कोपऱ्यातून हळूवारपणे आवाज आला जौहर ! ! ! ! आदिलशहा म्हणाला , ” कर्नूल का सिंह , सिद्दी जौहर ” , बडी बेगमही विचारात पडली , तात्काळ रुस्तुम झुम्याला एक १२ हजाराची फौज देऊन स्वराज्यावर चाल करून जावयास सांगितले , वास्तविक त्याचा काही फायदा झाला नाही ; कारण राक्षसीवृत्ती असणारा क्रूर अफजलखान दस्तुरखुद्द शिवरायांपुढे अपयशी ठरला होता , आणि पुढे तसेच झाले , रुस्तुम झमान मार खाऊन परतला .
■ सिद्दी जौहर : –रुस्तुमझम्याच्या पराभवानंतर आदिलशहाच्या आणि बड्या बेगमेच्या पुढे सिद्दी जौहर हाच एकमात्र पर्याय उरला होता , बादशहाने सिद्दीस तातडीने , विजापुरास बोलावून घेतले . अलीआदिलशहाने सिद्दी जौहरास , ” सलाबतखान ” हा किताब दिला , मोठा नजराणा दिला , आणि स्वराज्यावर चालून जायला सांगितले , जौहरच्या दिमतीला २० हजार घोडदळ , ३५ हजार पायदळ , ४० तोफा अशी फौज , तसेच रुस्तुम झमान , फाजलखान , सिद्दी मसूद ( जौहरचा जावई ) , बाजी घोरपडे असे नामचीन सेनानी दिले . सिद्दी जौहर हा महाधूर्त आणि कसलेला सेनापती होता , ” कर्नूलचा सिंह ” , असा त्याचा नावलौकिक होता , तो हेरांकडून मिळालेल्या बातम्यांवर त्याच्या मोहिमांची रणनीती ठरवीत असे , आणि विशेष म्हणजे तो फारच शिस्तप्रिय होता , ठरलेल्या योजनेत त्यास काडीमात्र बदल तो जुमानत नसे आणि त्याच्याशी जो गद्दारी करायचा त्याची मान तो स्वतः धडावेगळी करायचा , हा अफजखानाप्रमानेच दैत्य होता .
■ सिद्दी जौहर स्वराज्य विघाताकडे : –जौहर आला , स्वराज्याच्या रोखाने , वाटेत कत्तल करत , लुटमार करत आला . त्यावेळेस राजे , मिरजेच्या आदिलशाही ठाण्यास वेढा घालून बसले होते , त्यांना जेव्हा बातमी मिळाली , जौहर जवळ आलाय , तेव्हा राजांनी वेढा उठवून , पन्हाळ्याकडे माघार घेतली .
सिद्दी जौहर हा स्वराज्यात शिरतच होता , तेव्हा त्यास खबर लागली कि , ” शिवाजी महाराज हे पन्हाळ्यात मात्र ३ ते ४ हजार फौझेनिशी आहेत ” . सिद्दी आणि त्याचे हशम , पन्हाळ्याच्या दिशेने चाल करू लागले , दि. २ मार्च १६६० , राजे दुर्ग पन्हाळ्यावर सिद्दीच्या वेढ्यात अडकले .
● शाहिस्तेखानाची स्वारी : –राजे सिद्दीविरुद्ध रणनीती , आखत होते ; परंतु शास्ताखान ७७ हजार फौझेनिशी , हिंदवी स्वराज्यावर चालून आला . शास्ताखान म्हणजे खुद्द औरंगजेबाचा उजवा हातच , एक मातब्बर सेनापती . ह्याचे मूळ नाव , ” अबू तालिब ” होते , तर ” शाईस्तेखान ” , हा किताब होता . उत्तरेकडून शास्ता आणि दक्षिणेतून जौहर असा दुहेरी लढा , शिवरायांच्या वाटेला आला होता , परंतु राजे निर्भयपणे आव्हान स्वीकारलं होतं .
■ सिद्दी जौहरचा चक्रव्यूह : –दुर्ग पन्हाळ्यावर शिवराय , जौहरच्या वेढ्यात अडकले होते , जौहर अतिशय तापट , कडक शिस्तीचा , त्याने वेढा अतिशय कडक केला , एवढंच काय , तर मुंगीलाही दुर्गात प्रवेश करायला वा दुर्गातून बाहेर जायला मार्ग दिला नाही .
सिद्दी जौहरने , वेढा हा चार विभागात विभागला होता , ते खालीलप्रमाणे : –◆ पूर्वेस = खुद्द जौहर , आणि फाजलखान ;
◆ पश्चिमेस = सिद्दी मसूद , आणि बाजी घोरपडे ;
◆ उत्तरेस = भाईखान , आणि सादातखान ;
◆ दक्षिणेस = रुस्तुमे झमान , आणि बडेखान .
तसेच जौहरने , पन्हाळ्याच्या सर्वत्र भागात त्याचे हेर पसरविले होते , जेणेकरून सर्वच बाबींवर नजर राहील .
■ शिवराय आणि मराठे : –राजे सिद्दीच्या प्रत्येक बारीक , हालचालींवर नजर ठेवत होते , सिद्दी खूप सावध आणि चाणाक्ष आहे , हे राजांनी पुरते ओळखले होते . राजे सुद्धा , वेढा खरच कडक आहे कि नुसता दिखावा आहे हेही तपासत होते , परंतु वेढा हा खूपच कडक होता . रात्री ८ – १० मावळे खाली उतरायचे , पण पहाऱ्यात दक्षता असल्यामुळे , हशमांकडून मारले जायचे . असा दोन ते तीनदा प्रयत्न झाला ; परंतु विफलचं झाला . त्यावेळी राजांबरोबर दुर्गावर , रणवीर बाजीप्रभु देशपांडे , महावीर कुडतोजी गुजर , तसेच बाजीप्रभूंचे बंधूही होते .
● शिवराय आणि शिवा : –शिवा काशिद , हा व्यक्ती पन्हाळगडावर राजांबरोबर होता , शिवा हा नाभिक समाजातील असून , हा मूळचा नेबापूर गावचा होता .
शिवा हा चतुर , बहुश्रुत , तसेच बातम्या काढण्यात पटाईत होता , आणि शस्त्राचे उत्तम ज्ञान होते . राजांनी पन्हाळा जिंकल्यानंतर , शिवा न्हावी त्यांच्या नजरेत आला , व त्यांनी त्यास ठेवून घेतला , ह्याचे प्रभावी कारण म्हणजे , ” शिवा हा हुबेहब राजांसारखा दिसत होता ” . राजांनी शिवा काशीदचे हे गुण पाहून त्याची हेरखात्यात नेमणूक केली होती .
■ सिद्दीची रणनीती : –आदिलशाही फौझेने किल्ल्याला , वेढा उत्तम घातलेला , आता सिद्दीने पन्हाळगडाच्या भोवतीचा फास आवळायची सुरुवात केली , किल्ल्यावर तोफांचा हमला सुरू केला , वास्तविक आदिलशाही तोफांची मर्यादा कमी होती , त्यामुळे किल्ल्याचे नुकसान कमी होत होते . मराठे वरून काहीही प्रतिकार करत नव्हते , राजे बिनघोर होते कारण किल्ला बेलाख होता , सिद्दी जौहरने आपल्या विश्वासू सरदारांना बोलवून घेतले , आणि पुढची रणनीती ठरविली . दुसरा दिवस उजाडला
तोफांचा किल्ल्यावर सुरु झाला , पहिलाच तोफगोळा प्रभावीरित्या दुर्गावर पडला , राजे बुरुजांवर येऊन बघतात तर काय टोपीकरांनी घात केला , त्यांनी सिद्दीस लांब पल्ल्याच्या तोफा व दारूगोळा दिला होता , ह्या तोफांमुळे मराठ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या , इकडे राजे पाहत होते ते , ” सरनौबत नेतोजींची ” !!!! सिद्दी कडवा हमला करत होता .
पन्हाळगडावरून खबर देखील बाहेर पडणे ,
देखील कठीण झाले होते , एकदे जिजाऊमांसाहेबांच्या चिंता वाढल्या होत्या , त्यांनी सरनौबतांना खलिते सुद्धा पाठविले होते , परंतु नेतोजींनी त्याचा काहीही तात्काळ जबाब पाठविला नव्हता …..
● नेतोजींचा गनिमी कावा : –सरनौबत नेतोजींनी , एक विलक्षण रणनीती आखली होती , विजापूरात फौज कमी प्रमाणात होती , त्यामुळे विजापूरात जोरदार हमला करायचा ; परिणामी राजधानीच्या रक्षणाकरीता , जौहरला मागे फिरायला लागेल , आणि राजांची वेढ्यातून सुटका होईल , योजनाही अप्रतिम होती , ठरल्याप्रमाणे सर्वकाही होत होते , नेतोजींनी आक्रमण जोरदार केले , खुद्द अली – आदिलशहा आणि बड्या बेगमेस घाम फुटला ; परंतु ऐनवेळेस बादशहाला , हेरांकडून खबर मिळाली नेतोजीकडे फौज कमी आहे , ह्याचाच फायदा घेऊन , गोवळकोंड्याच्या ताज्या दमाच्या फौझेनिशी , खवासखान हा सेनापती , नेतोजींवर चालून आला , परिणामी नेतोजींना माघार घ्यावी लागली , डाव फसला …..
● माँसाहेब आणि सरनौबत : –सरनौबत विजापूरहून , माघार घेऊन लगोलग , राजधानी राजगडावर आले . सरनौबत नेतोजी पालकर येत आहेत अशी वर्दी माँसाहेबांना मिळाली , नेतोजी जिजाऊसाहेबांपुढे आले , जिजाऊ नेतोजींस म्हणाले , सरनौबत कुठं मुलुखगिरी करून आलेत , नेतोजी खालच्या आवाजात हळूवारपणे म्हटले , ‘ विजापूर ‘ ; पुन्हा जिजाऊ म्हणाल्या , ” सरनौबत , आपला राजा चक्रव्यूहात अडकलाय आणि तुम्ही मुलुखगिरी करता , सरनौबतांचे प्रथम कर्तव्य काय ? तुम्हांस जर हे कर्तव्य पार पाडता येत नसेल तर आम्ही पन्हाळगडावर चालून जाऊ , आणि शिवबांना वेढ्यातून मुक्त करू ” , ह्यावर नेतोजी बोलते झाले , माँसाहेब थोडं एकूण घ्या , आणि नेतोजींनी वरील सर्व योजना [ विजापूर स्वारी संदर्भात ] जिजाऊंना संगीतिली , व शेवटी हळूवार म्हटले , माँसाहेब पन्हाळ्यावर चालून जाण्याआधी आमची गर्दन मारा , आणि मग जा , आम्ही असताना जर आपणांस मोहिमेवर जावयास लागले तर आमचा उपयोग तरी काय ? नेतोजींचं बोलणं ऐकून , जिजाऊंचं मन भरून आलं , आणि जिजाऊमाँसाहेबांनी नेतोजींच्या खांद्यावर हात ठेऊन म्हटल्या , ” जा नेतोजीराव आपल्या धन्याला
सुखरूप घेऊन या ” , नेतोजी मुजरा करून तडख दुर्ग पन्हाळादिशेने गेले .
■ सरनौबतांचे आक्रमण : –सरनौबत नेतोजी पालकर , जोरदार वेगाने , राजगडावरून पन्हाळगडाच्या रोखाने गेले , नेतोजी दुर्गाच्या जवळ आले होते , मराठ्यांनी आदिलशाही हशमांवर जोरदार आक्रमण केले , सिद्दी जौहरही हबकला ; परंतु जौहरच्या योग्य योजनाबद्ध हमल्यामुळे नेतोजींस मागे फिरावे लागले . राजांस , या घटनेचे खूप दुःख झाले , इकडे सिद्दीच्या छावणीत आनंदाचे वातावरण होते , कारणच असे होते , ” मराठ्यांच्या सरसेनापतीस माघार घ्यावी लागली होती ” .
आता शिवरायांपुढे अडचणी वाढल्या होत्या , परंतु ह्यावर राजांनी मार्ग काढला , राजांनी विलक्षण योजना आखली होती , ती अशी कि जौहरच्या सैन्यावर दुहेरी हल्ला करायचा , एका बाजूने नेतोजीराव आणि दुसऱ्या बाजूने गडातून खुद्द शिवरायांच्या नेतृत्वाखाली मावळे सिद्दीवर तुटून पडतील . ठरल्याप्रमाणे सरनौबत नेतोजींनी हल्ला केला ; परंतु सिद्दी मसूदने पराक्रम दाखवीत मराठ्यांची कत्तल सुरू केली , मराठेही तीव्र प्रतिकार करत होते , घनघोर युद्ध सुरू होते , पण सरशी आदिलशाही हशमांची होत होती , मराठ्यांनी पळ काढला , अचानक शूरवीर मराठा सरदार सिद्दी हलाल ह्यांचा पुत्र सिद्दी वाहवाह , हा मागे राहिला , आणि आदिलशाही फौझेच्या ताब्यात सापडला , मराठ्यांना सिद्दी वाहवाह ह्यांचा देह सुद्धा मिळाला नाही , नेतोजींनी सिद्दी हिलालचे सांत्वन केले , त्यावर सिद्दी हिलाल नेतोजींस म्हटले , ” राव मुलगा गेला ह्याचे खूप दुःख झाले ; परंतू राजांची सुटका नाही झाली ह्याची सल आयुष्यभर राहील ” . शिवरायही दुखी होते .
■ शिवरायांचा गनिमीकावा : –” शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ” , हे तत्वचं खरे , आता शिवरायांनी आपला डाव टाकला , राजांनी आपला वकील , गंगाधरपंत ह्यास सिद्दी जौहरच्या छावणीत पाठविला , राजे वकीलामार्फत असे म्हणतात कि , ‘ अलिअदिलशाहा आपले सर्व गुन्हे माफ करीत असेल तर आपण जिंकलेला सर्व मुलुख दुर्गांसाहित परत देऊ ‘ , असा प्रस्ताव पाठविला . गंगाधरपंतांनी उत्तम काम बजावले , सिद्दी मनोमन खुश झाला , त्याने तर सर्वत्र मिठाई वाटायला सांगितली . जे कार्य अफजलखानास जमले नाही , ते आपण करून दाखविले त्यामुळे तो आनंदी झाला . ह्या बातमीने आदिलशाही फौझेत उत्साह निर्माण झाला , आणि वेढा थोडा थंडावला .
जुलै १६६० , च्या प्रथम आठवड्यातला हा प्रकार , राजांनी डाव उत्तमच टाकला होता , आता राजांनी एके रात्री आपल्या हेरास एक गुप्तखलिता घेऊन , राजधानी राजगड येथे , आऊसाहेबांकडे पाठविले , खलित्यात गुप्तमजकूर असा होता कि , ” आऊसाहेब , आम्ही येथून परवाच निघणार , फौज पांढरेपाणी गावाजवळ पोहचवा ” . जिजाऊमाँसाहेबांनी लगोलग तजबीज केली , त्यांनी
पांढरेपाणी गावाजवळ ३०० बांदल मावळा जमा केले , ( सिद्दीचे हेर सर्वत्र त्याने पेरले होते , आणि बांदल ह्यांनी त्या परिसरातील सर्व गुप्तवाटा ठाऊक होत्या , म्हणून बांदल सैन्याची निवड झाली होती ) . जिजाऊंनी आपली भूमिका चोख बजावली होती . शिवरायांस जसे हवे होते , तसे होत होते .
शिवरायांनी शिवा काशीद , व बाजीप्रभू देशपांडे , यांस सर्व योजना समजावून सांगितली , योजना ही , ३ मुख्य चरणात विभागली होती , ती खालीलप्रमाणे : –
● चरण – १ = दि. १२ जुलै १६६० ला , पन्हाळगडावरून रात्री ( साधारणतः १० ते ११ वाजल्यानंतर ) , २ पालख्या निवडक ५०० मावळे निघाले . एका पालखीमध्ये खुद्द , राजे होते , यांबरोबर ३०० मावळा व नरवीर बाजीप्रभू होते , हि पालखी घोडखिंडीजवळून विशालगडाच्या【खेळणा दुर्ग】 रोखाने जाणार होती , तर दुसरी पालखी त्यात शिवा काशिद , शिवाजी महाराजांच्या वेशात , राजांच्या पोशाखात होता , दिमतीला २०० मावळा , मलकापूरच्या मार्गे रोखाने जाणार होती , हा सिद्दीच्या हेरांना चकवा देण्याकरिता महाराजांचा कावा होता .
● चरण – २ = घोडखिंडीजवळ असलेल्या पांढरेपाणी ह्या गावातील ३०० हत्यारबंद बांदलांना घेऊन बाजीप्रभूंनी , पाठलाग करणाऱ्या , आदिलशाही फौझेस रोखायचे होते .
● चरण – ३ = विशालगडावर जाऊन किल्ला ताब्यात घेऊन लढाई करीता , तयार राहणे [ विशेष किल्ल्याच्या मागच्या मार्गाच्या जवळ आऊसाहेबांनी ३०० ते ४०० राखीव फौज तयार ठेवली होती .
■ रणसंग्राम : –१२ जुलै चा दिवस उजाडला , दिवसभर राजे योजना तपासून पाहत होते , कारण एक बारीकशी
चूक जीवावर बेतनार होती , रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र केलं , राजांनी शिवा काशिद यास मिठी मारली , आणि म्हटलं , ” शिवा विशाळगडावर भेटायचं आहे ” , शिवाने राजांस मनापासून हसत मुजरा केला .
राजे साध्या वेशात घोंगडी पांघरून पालखीत बसून निघाले , शिवाही पालखीत बसून निघाला , त्यावेळी गडाची जबाबदारी गुजर ह्यांवर होती , दोन्ही पालखींनी थंडाविलेला वेढा पार केला , ठरलेल्या योजनेनुसार राजे विशालगडाच्या रोखाने , तर शिवा मलकापूरच्या रोखाने जाऊ लागले .
मलकापूरच्या दिशेने पालखी , हत्यारबंद सैनिकांशी जात आहे हि , खबर मध्यरात्री सिद्दी जौहर ह्यास हेरांकडून मिळाली , जौहरने तात्काळ सिद्दी मसूद यास , त्या पालखीच्या मागावर पाठविले , सिद्दी जौहरने लगेचच सर्व सरदारांना छावणीत बोलाविले , त्यावेळी छावणीत बाजी घोरपडे , भाईखान , सादातखान , रुस्तुमे झमान , बडेखान , आणि सरदार सावंत होते . सिद्दी मसुदने शिवा ह्यास शिवाजी महाराज समजून छावणीत आणले , सिद्दी जौहर ह्याने शिवरायांस याआधी पाहिले
नव्हते हे शिवास पुरते ठाऊक होते , त्याने सोंग वटवायला सुरुवात केली , बातचीत केली , त्यावेळी छावणीत कोणालाच संशय आला नाही , शिवाने नाटकच तसे केले होते , तेवढ्यातच फाजलखान (अफजलखानाचा पुत्र) छावणीत आला , आल्या आल्या त्याने शिवाला प्रश्न विचारला , ” तुम कौन हो ? ” , शिवाने आत्मविश्वाने उत्तर दिले , ” आम्ही शिवाजी राजे भोसले आहोत ” , फाजलखान म्हणाला ठीक आहे .छावणीत तर सर्वांचीच खात्री झाली होती , शिवाजी गिरफ्तार हो गया , अपवाद फाजलखान . फाजलखानास माहित होते कि , अफजलखान आणि शिवाजीराजांची जेव्हा प्रतापगडावर भेट झाली होती , तेव्हा खानाचा वकिल कृष्णा भास्कर कुलकर्णी , ह्याने राजांच्या मस्तकावर तलवारीचा घाव केला होता , त्याचं बारीकसही निशाण शिवाच्या मस्तकावर नव्हते , पुढे फाजलखान आसनावरून शिवाच्या पाठी गेला , व म्हटला , ” क्या वाकई तुम शिवाजी हो ? ” , शिवा हा म्हटला , आणि त्यानंतर दुसऱ्या क्षणास फाजलखानाने आपली कट्यार शिवाच्या पाठीत घुपसली , साऱ्या छावणीत शांतता पसरली , खुद्द सिद्दी हबकला , आणि बोलला फाजल ए क्या किया तुमने ? फाजलने वरील सर्व प्रकार सांगितला , सिद्दी जौहर आपली समशेर घेऊन आला , त्याने शिवाच्या छातीवर वार केला आणि विचारलं
कौन हो तुम ? , शिवाच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला , ” शिवाजी ” . पुढे सिद्दी हाच प्रश्न विचारत होता , शिवा तेच उत्तर देत होता , त्यावर सिद्दी शिवावर वार करत होता , काही क्षणानंतर शिवा काशीदची प्राणज्योत मावळली . ” शिवाने मृत्यूला आलिंगन दिले , पण राजांशी एकनिष्ठता दर्शविली ” . सारी छावणी सुन्न झाली , पुढे हेरांकडून खबर शिवाजी राजे विशालगडाच्या रोखाने जातोय .
■ घोडखिंड आणि मराठे : –राजे ठरविल्याप्रमाणे घोड — खिंडीजवळ पोहचले , तेथेच ३०० बांदल राजांस मिळाले , आता योजनेनुसार सैन्याच्या २ तुकड्या झाल्या , पहिली तुकडी जे आधी ३०० मावळ्यांचे पथक होते , ते राजांच्या बरोबर आणि ३०० बांदल हे बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्यानेतृत्वाखाली गनिमाला रोखण्याकरिता , दिमतीस दिले , बाजीप्रभूंनी राजांस मुजरा केला . राजे पालखीत बसले , बाजीप्रभू पालखीजवळ आले आणि राजांस म्हणाले कि , ” राजे विशालगडावर पोहचल्यावर तोफांचे ३ बार काढा , म्हणजे आम्ही समजू कि आमचा राजा सुखरूप पोहचला ” , राजांनी मानेने इशारा दिला , बाजींनी स्मित हलकेसे केले , व राजे विशालगडाच्या रोखाने निघाले . व बाजीप्रभूंनी , प्रत्येकास आपापली जागा वाटून दिली , सर्वप्रथम दगडं – धोंडे ह्यांचे थर करण्यात आले , बाजीप्रभूंनी दोन्ही हातात दांडपट्टे घातले , तसेच विशेष म्हणजे घोडखिंड हिचे भौगोलिक स्थान असे आहे कि , खिंड रुंदीला कमी होती , त्याचाच फायदा बाजीप्रभूंनी घायचा ठरविला होता . पुढे सिद्दी मसूद सैन्य घेऊन आला , हशमांची एक एक फळी यायची आणि कापली जायची , बाजीप्रभू सपासप हशमाना कापत होते , वरना सुद्धा दगडांचा मारा करत होते , ३ तास झाले तरी एकही गनीम खिंड पार करू शकला नाही , बांदल सुद्धा थकले होते , परंतु बाजी सतत लढत होते , आणि सर्व मावळ्यांना प्रेरणा देत होते . गनीम नुसता कापला जात होता , सर्वत्र रक्तरंजित वातावरण झाले होते .
बाजीप्रभूंचा पराक्रम पहावयास
जर अलेक्सझेंडेर , सिजर सारखे योद्धे असते , तर त्यांनी वीर बाजीप्रभू देशपांडेंचा पराक्रम पाहून , आपली हाताची बोटे तोंडात घालून कराकरा चावली असती . त्यावेळी बाजीप्रभूंचा दांडपट्टा एवढा तेज चालत होता कि , बाजींच्या दृष्टीला दिसला कि , दुसऱ्या क्षणास त्याचे मुंडके जमिनीवर पडत होते . ५ ते ६ तास मराठे त्वे्षाने लढत होते , बाजींच्या शरीरावर सर्वत्र जखमा झाल्या होत्या , मावळ्यांनी बाजींना एका दगडावर बसविले होते . एक एक मावळा पडत होता , परंतु गनिमांची संख्या काही कमी होत नव्हती . बाजींचे कान लागले होते , ते तोफांचा बार एकण्यासाठी , इकडे फुलाजीप्रभू हर हर महादेव म्हणत गनीम मारत होता .
राजे , विशालगडाच्या पायथ्याशी पोहोचले , तिथे छोटीशी लढाई झाली आणि राजे गडावर पोहचले , तोफांना बत्ती दिली ,
बाजींनी तोफांचा आवाज एकला आणि हातांनीच
राजांस मुजरा केला . पुढे सिद्दी मसूद विशालगडाच्या पायथ्याशी आला , तिथे एक लढाई झाली , परंतु राजांनी त्याचा दारुण पराभव केला , सिद्दी मसूद पळून गेला .
अशाप्रकारे योग्य नियोजनाद्वारे राजांनी आपली वेढ्यातून सुटका करून घेतली . पण ह्या सर्व लढ्यात राजांचे काही बातमीदार , वीर शिवा काशिद , नरवीर बाजीप्रभू देशपांडे , फुलाजीप्रभू देशपांडे आणि बांदल , छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी यांनी बलिदान दिले .
पुढे शिवरायांच्याच सांगण्यावरून , पन्हाळा किल्ला सिद्दी जौहरच्या ताब्यात दिला .
■ पुढे सिद्दी जौहरचं काय झालं : –दि. १२ जुलै १६६० ला , राजे पन्हाळगडाच्या वेड्यातून ; (शिवा काशिद , रणधुरंधर बाजीप्रभु देशपांडे, आणि बांदल यांच्या साहाय्याने ) बाहेर पडल्यावर , विशाळगडावर पोहचल्यावर , सिद्दी जौहरच्या नावाने एक एक विलक्षण पत्र लिहिले , पण पत्र आदिलशहाच्या हेरांच्या हाती लागेल अशी सोय केली , त्यात मजकूर असा होता कि , पन्हाळगडावरून सुटकेसाठी सिद्दी जौहरनेच राजांस मदत केली त्या बदलात मोठी रकमेची खंडनी राजांनी त्यास द्यावयाची होती , ती कर्नूलला कशी पाठवावी , ह्याबाबत विचारणापत्र होते . जेव्हा पत्र अलिअदिलशहाने वाचले , तर चिडून त्याने सिद्दीव्रिरुद्धच पन्हाळगडी सैन्य पाठविले , नंतर आदिलशहाने सिद्दीस दरबारात पेश होण्याचा हुकूम सोडला , आपली नाचक्की पाहून सिद्दीने विष प्राशन आत्महत्या केली . सिद्दी जौहरच्या प्रकरणातही दिसून येते कि , ” शस्त्रही न उचलता त्यास राजांनी यमसदनी धाडले “. छत्रपती शिवरायांचे राजकारण हे असे होते .
वीर शिवा काशिद , नरवीर बाजीप्रभू देशपांडे
ह्या महान वीरांस विनम्र अभिवादन . तसेच महामहिम छत्रपती शिवाजी महाराजांस मानाचा मुजरा ….
■ = ■ = ■ ●●●●●●●● ■ = ■= ■
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ऐतिहासिक लेख वाचण्याकरिता , तसेच सत्य इतिहास सर्वांपर्यंत पोह्चण्याकरीता ह्या पेजला अवश्य शेअर करा , तुमच्या एका शेअरमुळे , शंभूचरित्रातुन प्रेरणा घेऊन कोणीएक ,” जगविजेता ” होऊ शकतो .
” अखंड भारताचा विजय आहे ” .
|| जय हिंद ||
—– × समाप्त × —–
No comments:
Post a Comment