#१३_जुलै_१६६०
पिसाळलेल्या सिद्दी जौहरने शिलेदार शिवा काशिदच्या हत्येच्या हुकुमाबरोबर हुकुम केला सिद्दी मसूदला,आणि मसूद ५ हजारच सैन्य घेऊन निघाला महाराजांना गिरफ्तार करण्यासाठी .तो झाडा-झुडपातून महाराजांचा माग काढत पाठलाग करू लागला.
पाऊसचं थैमान सुरूच होत,आषाठी पौर्णिमेचा चंद्र तर पावसाच्या काळ्या ढगांआड लपलेला होता .महाराजांची पालखी वेगाने विशाळ गडाची वाट चालत होती ;वेग धीमा होऊ नये म्हणून खांदेकरी एक सारखे बदलत होते.आज त्यांचे पाय कोणी रोखू शकत न्हवतं,ना हा पडणारा मुसळधार पाऊस ,ना वादळ वारा ....ते फक्त धावत होते ,महाराजांच्या जीवांच्या रक्षणासाठी बेभानपणे .पालखी गाजपुरच्या घोडखिंडीजवळ आली,तोच महाराजांच्या हेराने खबर दिली,सिद्दी मसूदने शिलेदारांची हत्या केली आणि ५ हजाराची फौज घेऊन पाठलाग करत येत आहे.शिलेदार शिवा काशिदच्या हत्येची बातमी ऐकून महाराज हळहळले ,महाराजांच्या डोळ्यात अश्रू उमटले पण ती वेळ न्हवती शोकाकुल होण्याची गनिम वेगाने जवळ येत होता .
पालखी घोडखिंडीत पोहोचताच,महाराज पालखीतून बाहेर आले आणि बाजी प्रभुंना गनिमाला खिंडीत रोखण्याचा बेत सांगितला.धास्तावलेले निष्ठावान बाजी प्रभू ,महाराजांना विशालगड जवळ कर म्हणून विनंती करू लागले. "नाही बाजी,तुम्हाला संकटात टाकून जाणे आम्हास मान्य नाही ;तुम्ही मावळे आम्हांस स्वराज्यापरि मोलाचे ...आम्हाला ते शक्य नाही" महाराज म्हणाले.
गनिम जवळ येतोय बघून बाजी महाराजांना जीवाच्या आकांताने विनवू लागले ,"राजं जा ....गड जवळ करा.माफी असावी पण वयाने वडील म्हणून या नात्याने सांगतुया राजं जा गड जवळ करा;आम्ही इथे खिंड झुंझवत ठेऊ ....तुम्ही जा." महाराज म्हणाले,"लढू इथचं मरू इथचं, पण तुम्हाला संकटात टाकून जाणे शक्य नाही ."
"नाय राजं ..नाय,लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे ,राजं तुम्ही निघा ऽऽ. आणि एक करा,गडावर पोहोचताच ईशारातीच्या तोफांचे ३ बार काढा म्हणजे आम्हाला समजल आमचं राजा गडावर पोहोचले म्हणून तोवर हा बाजी एका पण गनिमास पुढं सरकू देणार न्हायी "
हे ऐकताच महाराजांनी भारावून बाजींना मिठी मारली ,बाजींनी णि सगळ्या मावळ्यांनी महाराजांना मुजरा केला आणि निघाले मोजके मावळे सोबत घेऊन विशाळगडाकडे.
महाराज निघताच बाजींनी सगळ्या मावळ्यांना आपआपल्या जागा घेऊन सज्ज व्हायला सांगितल.सिद्दी मसूद आपल्या सैन्यासह खिंडीत पोहचताच मावळ्यांनी त्यांच्यावर गोपानीच्या दगडाचा वर्षाव केला ,घायाळ सैन्य पळून गेलं .नंतर स्वतः सिद्दी सैन्यासह आला मावळ्यांनी हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली.मावळे प्राणपणाने लढत होते .बाजी दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन तुटून पडले ,बाजी असे फिरत अंगात वीरश्रीचं तांडवच.. बाजींच्या फिरत्या दांडपट्ट्यात विजेचा संचार दिसत होता.लवकरात लवकर पोहचून ईशारातीची तोफ देण्यासाठी महाराजांनी गडाचा पायथा घाटला पण घात झाला,सुर्वे आणि दळवी या आदिलशाही चाकरांनी वाट रोखली. बाजी गेली २१ तास विना विश्रांती लढत होता. बाजींला आवरणे खूप कठीण झाला होत सिद्दीसाठी ,म्हणून डाव केला आणि लढत्या बाजींवर तीर सोडला ,तो तीर बाजींच्या छातीत लागला.तरीही रक्तात माखलेला फिरत होता ,बाजींला थांबणं शक्य न्हवतं.बाजी थांबणार होते ते ईशारातीच्या ताफांच्या आवाजावरच.
अखेर महाराज कोंडी फोडून गडावर पोहोचले आणि ईशारातीच्या तोफेचे आवाज झाले. लढणाऱ्या बाजींच्या कानी तोफेचा आवाज आला,त्यांना आनंद झाला महाराज गडावर सुखुरूप पोहोचल्याचा,समाधान झाल अथक परिश्रमाच.तेवढ्यात एक तीर बाजीच्या कंठात घुसला आणि बाजी पडला. आपल्या महाराज्यांच्या रक्षणासाठी बाजीने प्राण अर्पण केले तो दिवस होता १३ जून १६६०.
निष्ठावान,स्वामिनिष्ठ बाजी प्रभूनीं जिथं देह ठेवला ,तीही घोडखिंड पावन जाहली आणि इतिहासात 'पावनखिंड' म्हणून अमर जाहली.
बाजीप्रभूंच्या शौर्याला,स्वामिनिष्ठेला ,बलिदानाला शत्-शत् प्रणाम !!!
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

No comments:
Post a Comment