विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 24 July 2019

* क्रिकेटमहर्षीं चा ऐतिहासिक वाडा*


* क्रिकेटमहर्षीं चा ऐतिहासिक वाडा*
भारताचे इंग्रजासोबत क्रिकेट खेळुन शतकवीर झालेले महान क्रिकेटर ज्यांच्या नावाने देवधर रणजी स्पर्धा भरवली जाते ,ज्यांना भारत सरकारचा पद्मश्री व पद्मविभुषण पुस्कार प्राप्त झाला अशे भारतीय क्रिकेटचे भाग्यविधाते *प्रा.दिनकर बळवंत देवधर* यांचा वाडा किंवा जन्मगावातली चिरेबंदी गढी आंधळगावात शेवटची घटका मोजत आहे.
आंधळगावात चौकातच चार बुरुंजाचा देवधर वाडा दिमाखात उभा आहे आपल्या पडलेल्या बुरजासह अन तटबंदिसह कोणी तरी इतिहासप्रेमी येइल अन माझ वास्तव जगाला सांगेल या आशेत. ,वाड्याचा दरवाजा भक्कम व व्यवस्थित आहे तसाच दरवाजाचा अडसर पण व्यवस्थित आहे,वाड्याच्या समोरील एक बुरुंज अर्धा तर एक पुर्ण ढासळलाय.वाड्यात मुख्य इमारत दोन मजली असुन वाड्याच छप्पर कौलाच आहे,वाड्याच्या इमारतीच्या मधोमध दुसरा मजल्यावर जायला लाकडाचा जिना असुन तो अजुन चांगला आहे,मुख्य इमारती समोर व मागे दोन्हि बाजुने भरपुर मोठ पटांगण आहे ,दुसर्या मजल्यावर गच्ची असल्याच बाहेर आलेल्या लाकडांवरुन समजते तस वाड्याच्या पुढच्या बाजुला एका दरवाज्या बाहेर गच्चीच्या ठळक खुणा आहेत.मुख्य इमारतीला लागुन डाव्या बाजुला पाच खोल्या असुन त्यातील एका खोलीचा दरवाजा पहाण्यासारखाआहे,खोल्यांसमोर एक छोटी कोरडि विहिर असुन तिच्यात भरपुर कचरा पडलेला दिसतो,त्या खोल्यांच्या छप्परावरुन आतमधे उतरायला एक जिना आहे ,लोक त्याला भुयार अस म्हणतात वाड्याच्या बाहेर समोर एका घराच्या भिंतीवर दगडात रामचंद्र बलवंत देवधर अस कोरलेल दिसतय व एक फुल सुध्दा कोरलय,यावरुन वाडा देवधर कुटंबाचा आहे यात काहि शंका नाहि,देवधर हे १७ शतकातील जहागीरदार तसेच पेशवेकालापासुन शिरुर तालुक्यालते मोठे वतनदार व सर्व जमिनी संबंधीचे सर्व दस्तऐवज देवधरांच्या घरी होत असे शिवाय केडगाव येथे देवधर बाजारपेठ प्रसिध्द आहे.
वाड्याच बांधकाम एखाद्या गढीसारख असुन तटबंदिला ठिकठिकाणी जंग्या आहेत ,त्याच बांधकाम १७किंवा १८ व्या शतकातल असुन वाड्याच्या ठिकाणी दिनकर देवधर यांच्या आजोबांच घर होत त्याजागी आता हा वाडा आहे, वाडा एक एकर च्या आसपास आहे अस आंधळगावचे देवधर घराण्यातील बापु देवधर यांनी सांगितल,वाड्याच्या बाहेरुन पश्चिम बाजुला एक पांडवकालिन दगडी सुरेख अस महादेवाच मंदिर असुन त्याच्या सभागृहाची रचना गोल घुमटासारखी आहे शिवाय अखंड दगडात वैशिष्टपुर्ण मंदिर मन वेधुन घेत मंदिरासमोरच देवधरांच्या वाड्याच्या बुरुजाला चिटकवुन तीन विरगळी आहेत त्यांच्यावर पांढरा रंग पडलाय.त्यांची झीज भरपुर प्रमाणात झाली आहे .बहुतेक या विरगळी मंदिराजवळ असाव्यात त्यामुळे मंदिर रंगवताना त्यावर रंग पडला व ग्रामस्थांना विरगळी च महत्व माहित नसल्यान त्यांनी रस्त्याच्या कडेला वाड्याच्या बुरुंजाजवळ आणुन मग त्या वाड्याला ऐतिहासिक महत्व जरी नसल तरी वाड्याच्या मालकान क्रिकेट विश्वात एक दिव्य इतिहास रचला हे महत्वाच।
*दिनकर बलवंत देवधर यांचा जन्म १४जानेवारी१८९२ व मृत्यु २४आँगस्ट१९९३ ला झाला ,ते शिक्षणासाठी व नोकरीसाठी गावातुन पुण्याला स्थाायिक झाले ,शेवटपर्यत त्यांनी आपल मुळगाव कोणालाच सांगितल नाहि,
त्यामुळ आंधळगाव ग्रामस्त देवधरांवर नाराज असल्याच समजल .
पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिकले. १९०६ मध्ये वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी कँपमधील एका शाळेविरुद्ध शतक काढले. दोन वर्षांतच शालेय संघाचे नायकपद त्यांच्याकडे आले. शालेय शिक्षणानंतर ते फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाले.
देवधरांनी आर्थर गिलीगनच्या नेतृत्वाखालील परदेशी संघाविरुद्ध भारतातील प्रथमश्रेणीतील पहिले शतक रचले होते. त्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अस्तित्वात नसल्याने हे भारतासाठीचे पहिले कसोटी शतक ठरले नाही. देवधरांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने १९३९-४० आणि १९४०-४१ या लागोपाठच्या वर्षांमध्ये रणजी करंडक जिंकला. सातत्याने मोठमोठ्या सांघिक धावा करणाऱ्या महाराष्ट्र संघाने आणि नभोवाणीवरून सामन्यांची वर्णने करणाऱ्या बॉबी तल्यारखानांनी भारतात रणजी स्पर्धा लोकप्रिय केली असे देवधरांनीच आपल्या शतकाकडे या आत्मचरित्रात म्हटले आहे.२४ ऑगस्ट, इ.स. १९९३ रोजी (वय १०१ वर्षे २२२ दिवस) त्यांचे पुण्यात निधन झाले. त्यांचे पुत्र शरद देवधर हे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले असून त्यांच्या नावावर एक शतक आहे. तारा, सुमन आणि श्यामा या त्यांच्या मुली राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळलेल्या आहेत.
वैयक्तिक आयुष्यातही शतकवीर ठरलेल्या या क्रिकेटमहर्षीचा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने कालांतराने गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पूर्णाकृती पुतळा उभारला. याच स्टेडियमवर मुंबई-सौराष्ट्र हा अंतिम फेरीचा सामना २४-२-२९१६ रोजी झाला. १९४० मध्ये २४ फेब्रुवारी रोजीच अंतिम सामना सुरू झाला होता. त्यानंतर बरोबर ७६ वर्षांनी पुण्यात रणजी करंडक अंतिम सामना झाला.
अशा या क्रिकेटवीराचा अठराव्या शतकातील वाडा आजही पडलेल्या अवस्थेत आपल्या वशंजांची आतुरतेने वाट पाहतोय ,गावातील लोकांची या वाड्याच्या इतिहासाविषयी तळमळ आहे,कुणी तरी येइल अन आपल गाव देवधरांच गाव म्हणुन गौरवेल अशी आशा मनात ठेउन आहेत .
*लेखन व शब्द रचना :मंगेश गावडे*
*(८२७५६९४१४४)*
*माहिती साभार:- अभिजीत धोत्रे ,शशी कुसेकर,प्रमोल कुसेकर*
*फोटोसाभार:सचिन खोमणे*

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...