विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 July 2019

स्वराज्याचे_सरलष्कर_हंसाजी_मोहिते_उर्फ_हंबीरराव_मोहिते

स्वराज्याचे_सरलष्कर_हंसाजी_मोहिते_उर्फ_हंबीरराव_मोहिते

#स्वराज्याचे_सरलष्कर_हंसाजी_मोहिते_उर्फ_हंबीरराव_मोहिते
।। आपुल्या वंशावरी तू दिव्य किर्तीची ध्वजा।।
।। यातुनी घेतील स्फूर्ती कोटी वीरांच्या प्रजा ।।
हंसाजी मोहिते म्हणजेच हंबीरराव मोहिते , शिव छत्रपतींच्या तेजस्वी नजरेत भरलेले स्वराज्याचे सरलष्कर होय . ह्या नररत्नाचं मूळ गाव तळबीड . खंडोबा आणि ज्योतिबा ह्यांच्या घराण्याचे दैवत .
हंबीर राव मोहिते ह्यांचे पणजोबा रतोजी मोहिते ह्यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजवला होता , म्हणून त्यांना निजामशाहीने बाजी हा किताब दिला होता. मोहिते घराण्याचे पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावाची पाटीलकी सांभाळत होते , व ह्या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरिक जुळून आणली होती. शहाजीराजे ह्यांच्याशी या घराण्यातील संभाजी मोहिते व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजी राजे ह्यांच्या लष्करात शमील झाले .
मोहिते घराणे मग छत्रपतींच्या अगदी जवळचे घराणे झाले . यातील संभाजी मोहिते ह्यांचा मुलगा म्हणजेच हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते . छत्रपती शिवराय ह्यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हे ‘किताब देऊन सेनाप्रमुख म्हणून निवडले.
हंबीरराव ह्यांच्या कन्या म्हणजे महाराणी ताराबाई राणी सरकार .
हंबीराव एक किताब
महाराजांच्या पाच हजार फौजेवरील एक सरलष्कर सरदार असत. सन १६७४ साली स्वराज्याचे मुख्य सेनापती प्रतापराव गुजर हे विजापूरच्या सैन्यावर तुटून पडले असता , प्राणाची आहूती देऊन फौज फुटली गेली होती , त्याच वेळेस हंबीरराव मोहिते ह्यांनी शत्रूच्या सैन्यावर हल्ला करून मुसुलमानी सत्तेचा पराभव केला म्हणून शिवाजी महाराजांनी हंसाजी राव ह्यांवर खुश होऊन त्यांना ( हंबीरराव ) असा ‘किताब दिला आणि ( प्रतापराव गुजर म्हजेच कुडतोजी गुजर ) ह्यांच्या पदावर नेमले.
शहाणा , मर्दानी , सबुरीचा , चौकस , शिपाई ह्या धारकऱ्यास पाहून कूल लष्कराचा गाहा केला व हंबीरराव ह्यांचे ताबीज दिधले .
सन १६७४ साली हंबीराव मोहिते ह्यांनी बऱ्हाणपुरवरून थेट माहरपर्यंत मोगलांचा मुलुख लुटला , व भडोच जिल्ह्यातून खंडणी गोळा करून सर्व पैका रायगडास सुरक्षित आणला . पावसाळा संपल्यावर हंबीरराव ह्यांनी मोगल सत्ता परत ठेचून काढली , आणि त्याच्या पुढच्या वर्षी यादगिरीजवळ हुसेनखान मायणाचा पराभव करून त्यातही त्यांनी पुष्कळ लूट मिळवली होती. एका सरलष्कर च्या पदावर येणं म्हणजे कामगिरी पण तेवढीच बजवावी लागते हे हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते ह्यांनी दाखवून दिले .
यवनी सत्तेवरील हंसाजी मोहिते ह्यांच्या स्वाऱ्या
इ . स . १६७८ मधे कृष्ण व तुंगभद्रा यांच्या दुआंबात विजापूरच्या सैन्याचा परत एकदा पराभव केला आणि सर्व दुभाब प्रांत आक्रमण करून कित्येक बंडखोर देशमुखास वठणीस लावले होते.
सन १६७९ मधे हंबीरराव ह्यांनी मोगलांचे रणमस्तखान याला गाठून त्याचा प्रभाव केला आणि मग हंसाजी उर्फ हंबीराव विजापुरास आले व वेढा देऊन बसलेल्या दिलेरखानाच्या सैन्याभोवती घिरट्या घालून मोगलांच्या सैन्यात अन्नधान्याची इतकी टंचाई केली कि पावसाळा संपल्याबरोबर दिलेरखानने विजापूरचा वेढा उठविला . पुढे सन १६८० मधे बऱ्हाणपूरवर हल्ला करून कोल्हापूरजवळ सुलतान शहाअलम याची छावणी उध्वस्त केली आणि सन १६८४ साली औरंगजेबने आपली छावणी अहमदनगरास आणल्यामुळे खांदेशप्रांत मोकळा पडला आहे असे पाहून हंबीरराव अचानक बऱ्हाणपूर गेले व त्या शहरी कित्येक दिवस खंडणी वसूल करत ते खंडणीसह महाराजांकडे परत आले. ( मराठा रियासत भा. १ ; डफ )
शिवाजी महाराजांच्या राजाअभिषेक नंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंसाजी उर्फ हंबीरराव ह्यांना दिला व हि स्वारी हंबीराव मोहिते ह्यांनी यशस्वी करून त्यांनी त्यांनी खानदेशातील मोगलांचा खांदेश, बागलाण , गुजरात , बऱ्हाणपूर , वऱ्हाड , माहुड , वरकड पर्यंत प्रदेशात धुमाकूळ घातला . यानंतर सन १६७६ मधे सरलष्कर हंबीराव ह्यांनी कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणच्या येलबुर्गा येथे मोठा पडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली .
स्वराज्याच्या सैन्याचा सरलष्कर पद परिपूर्णपणे निभावणारा माणूस , शिवाजी राजियांना दिलेला शब्द ह्याचं मान राखत त्यांच्या राजाअभिषेक नंतर प्रधानांची बंडखोरी मोडून , हंबीरराव मोहित्यांनी संभाजी राजा समोर आपले विश्वासू कर्तव्य हासील केले हे त्यांच्या निष्ठावंत स्वभावातून दिसून येतं .
Ref books :
1) ( मराठा रियासत भा. १ ; डफ )
2) Ec Ratnakara Rava (1997) Govind , Shivaji’s Warrior . Orient Longman p.6 ISBN ( International Standard Book Number )
3) Shivaji , The Great Liberator

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...