विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 29 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 29

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 29
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------5

मेजर स्टुअर्ट ह्यांनी हिंदुस्थान सरकारास पाठविलेल्या आपल्या खलित्यांत सविस्तर रीतीने केले आहे. ते प्रत्यक्ष अनुभवाने लिहिले असून करुणरसाने ओतप्रोत भरले आहे. तेच येथे सादर करितोंः
काल सकाळी ९ वाजण्याचे सुमारास, महाराजांच्या राजवाड्यांतून एक घोडेस्वार रसिडेन्सीमध्ये मोठ्या त्वरेने भरधांव घोडा फेकीत आला. त्याने हिंदुरावांचा असा निरोप कळविला कीं, * महाराज साहेबांनीं आपणांस भेटण्याची उत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ह्याकरितां, आपण एक क्षणाचाही विलंब न लावितां, ताबडतोब राजवाड्यांत यावे. हा निरोप ऐकतांच, महाराजांचा अंतकाल अगदी समीप येऊन ठेपला असे वाटून, मी लगेच घोड्यावर बसलों; आणि क्याप्टन डाईक ह्यांस फक्त बरोबर घेऊन तत्काल राजवाड्यांत गेलों. राजवाड्यांत जातांच चिंताक्रांत झालेला हजारों लोकांचा समुदाय माझे. दृष्टीस पडला. राजवाड्यांत प्रवेश करितांच निरनिराळ्या दालनांमध्ये सरदार, मानकरी व इतर सभ्यलोक जमा झालेले दृष्टीस पडले. हिंदुरावांची व माझी भेट होतांच, महाराजसाहेबांची प्रकृति कशी काय आहे असा मीं प्रश्न केला. हिंदुरावांनीं (* महाराज फार अत्यावस्थ आहेत; आपण लवकर भेटावे. ” असे उत्तर दिले. माझे व हिंदुरावांचे हे भाषण होत आहे, तोंच महाराजांच्या अंतःपुरांत, मी आल्याची वर्दी पोहोंचून, महाराजांनी मला आंत येण्याबद्दल पाचारण केले. तेव्हां मी लगेच महाराज ज्या खोलीमध्ये होते तेथे गेलों. मजबरोबर हिंदुराव, रावजी खाजगीवाले, आत्माराम पंडित व आणखी एक दोन गृहस्थ होते. क्याप्टन डाईक हेही मजबरोबर आंत आले. महाराज पलंगावर लोडाला टेकून बसले होते, किंवा पडले होते, ह्मटले तरी चालेल. त्यांच्या सभोंवतीं पुष्कळ दासी व नौकर लोक होते. त्यांच्या पलीकडे पडद्यांमध्ये बायजाबाई, रखमाबाई आणि बाळाबाई ह्या होत्या. महारा४९ जांच्या चेह-यामध्ये फार फरक झालेला पाहून मला एकदम वाईट वाटले. त्यांचे हात व शरीराचा वरील भाग अगदी कृश झाला होता. पोट व पाय फार सुजले होते. मी त्यांच्याजवळ गेलों व त्यांचा हात मी आपले हातात घेतला. आणि ते काय शब्द उच्चारतात ते ऐकण्याकरितां मी त्यांच्या तोंडाजवळ आपले डोके नेले. त्यांच्याने प्रथमतः कांहीं बोलवेना; ह्मणून ते स्तब्ध राहिले होते. शेवटीं, कांहीं वेळाने त्यांनी स्पष्ट व मोठ्याने, तेथील सर्व लोकांस व पडद्यांमध्ये देखील ऐकू जाईल अशा रीतीनें, ६ जो तुम मुनासीब, सो करो ?? ( तुह्मांस जे योग्य वाटेल ते. तुह्मी करा ) हे शब्द उच्चारिले. ते ऐकून मी महाराजांस उत्तर दिलें कीं, ८ महाराजांच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट केली जाईल. नंतर मीं त्यांचे थोडे सांत्वन केलें; व परमेश्वराच्या कृपेने अद्यापही महाराजांच्या प्रकृतीस आराम पडेल, अशी आशा दर्शविली. ह्या वेळीं महाराजांस फार गहिंवर आला, व त्यांनीं आपके देखनेसे, और आपके मोहबतसे– एवढे हृदयद्रावक शब्द उच्चारिले. परंतु पुढे त्यांच्याने ते वाक्य पुरें करवलें नाहीं. पुढे पुष्कळ वेळ ते स्तब्ध राहिले. शेवटीं मीं ६ महाराज साहेबांस आणखी कांहीं मला कळविण्याची इच्छा आहे की काय ??? असे विचारले. त्या वेळी त्यांनी पुनः“बहुत तेरासा कहना है” (आपल्याला पुष्कळ सांगावयाचे आहे ) असे शब्द उच्चारिले. परंतु पुढे पुष्कळ वेळ त्यांच्याने कांहीं बोलवेना. तेव्हां मीं असा विचार केला की, दुसन्या खोलीमध्ये आपण कांहीं वेळ जावें, व महाराजांस थोडीशी हुषारी वाटली व बोलण्याची थोडी शक्ति आली ह्मणजे पुनः त्यांच्या जवळ यावें. ते तेथील मंडळीस पसंत पडले. मी उठलों न उठलों तोंच, बायजाबाईनीं पडद्यांतून “डा० प्यांटन ह्यांस बोलावून आणवावें अशी सुचना केली. तेव्हां मी, महाराजसाहेबांची तशी इच्छा आहे४६
की काय, ह्मणून पुनः प्रश्न केला. त्यास महाराजांनीं 'होय' ह्मणून अस्पष्ट खुणेनें उत्तर दिले.
महाराजांनी ह्या प्रसंगीं जें जें भाषण केले, ते मी अक्षरशः कळवीत आहे. ह्याचे कारण, ते त्यांचे अगदी शेवटचे शब्द होत. मी दुस-या माडीवर जाऊन एक तास झाला नाहीं, तोंच राजवाड्यांतील स्त्रियांचा रुदनखर ऐकू आला; व त्याने महाराजांचा अंत झाला असे कळविलें!दौलतराव शिंदे साठी इमेज परिणाम

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...