मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 32
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------8
महाराज दौलतराव निवर्तल्यानंतर त्यांचा उत्तरविधि राजकीय थाटाने झाला. महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांस आपल्या प्रियपतीचे चिरकालिक वियोगदुःख सहन करण्याचा भयंकर प्रसंग प्राप्त झाला. परंतु त्यांनीं, धीर न सोडतां, मोठ्या शांतपणाने ते सहन करून, आपल्या यजमानांच्या आज्ञेप्रमाणे संस्थानची राज्यसूत्रे लवकरच आपल्या हाती घेतली. | बायजाबाईसाहेबांनी महाराज दौलतराव शिंदे ह्यांच्या दहनस्थानावर एक सुरेख छत्री बांधून त्यांचे ग्वाल्हेर येथे चिरस्मारक करून ठेविले आहे. ह्या छत्रीच्या खर्चाकरितां त्यांनी सालीना दहा हजार रुपयांची नेमणूक करून दिली आहे. ती अद्यापि चालत असून त्या छत्रीचा प्रतिवार्षिक उत्सव मोठ्या थाटाने होत असतो. दौलतराव शिंदे शरीराने धट्टेकट्टे असून त्यांची उंची ५-५॥ फूट होती. त्यांचा वर्ण काळा असून, चेहरा वाटोळा व नाक किंचित् चपटें होते. तथापि एकंदर चेहरा दिसण्यांत भव्य आणि परोपकारशील असा दिसे. त्यांची वर्तणूक फार आदबीची असून त्यांस आदरसत्कार फार प्रिय असे. त्यांचा पोषाख व एकंदर चालचलणूक पाहून, पुष्कळ५० युरोपियन लोक, त्यांची इंग्लंडच्या आठव्या हेन्री राजाशी तुलना करीत असत. त्यांचे पागोटें लहान व पिळदार असून, ते सध्यांच्या ग्वाल्हेर दुरबारच्या चालीप्रमाणे कलते घालण्याचा त्यांचा परिपाठ असे. त्यांचा पोषाख फार साधा असे. एक तलम झिरझिरीत पांढरा आंगरखा व गुडघ्यापर्यंत लांब असा रेशमी तंग चोळणा हीं फक्त त्यांच्या पोषाखाचीं दोन वस्त्रे असत. त्यांच्या गळ्यामध्ये बकुळाएवढ्या पाणीदार मोत्यांचे व तेजस्वी पाचांचे फार मूल्यवान् कंठे असत. दौलतरावांस मोत्यांचा फार शोक असून, नेहमीं उत्तम मोत्ये पाहिली की, त्यांचा संग्रह केल्यावांचून ते राहत नसत. त्यांच्या मोत्यांच्या आवडीवरून त्यांस लष्करांतील लोक मोतीवाले महाराज” असे विनोदानें ह्मणत असत. | हे शिकार करण्यामध्ये फार निष्णात असून, त्यांचा काल बहुतेक घोड्याच्या पाठीवर वाघांची शिकार करण्यांत जात असे. नेम मार ण्यांत त्यांचा हातखंडा असे. नदीच्या कांठीं तासांचेतास बसून मासे 17 धरण्याचाही त्यांना नाद असे. घोड्यावर बसण्यांत व भाला मारण्यांत हे पटाईत होते. हे दोन गुण त्यांच्या सहवासाने बायजाबाई ह्यांच्या अंगीं पूर्णत्वेकरून वसत होते. ते जातीने आळशी स्वभावाचे असून सदां ऐषआरामांत राहण्याची त्यांना संवय असे. अगदी बालवयामध्ये त्यांच्या हातून कांहीं क्रूरपणाच्या व कडक गोष्टी घडल्या; परंतु पुढे केव्हाही तशा गोष्टी करण्यास ते सहसा प्रवृत्त होत नसत. ते स्वधर्मनिष्ठ असून पाटीलबावांप्रमाणेच मोठे कृष्णभक्त होते. सकाळसंध्याकाळी देवपूजा वगैरे करण्याचा त्यांचा नित्य नियम असे.
No comments:
Post a Comment