विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 August 2019

" दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय " भाग १

" दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय "
भाग १
【मराठ्यांच्या इतिहासातील अभूतपूर्व पराक्रम 】
स्वराज्याच्या विस्तारासाठी , छत्रपती शिवाजी
महाराजांनी आणि युवराज शंभूराजांनी , दक्षिणदिग्विजय
ही मोहीम आखली . या मोहिमेच्या रणनीतीनुसार ,
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्व सैन्यासह ,
दि . ६ ऑक्टोबर १६७६ रोजी , रायगडहून निघाले .
■ छत्रपती शिवाजी महाराजांचा लवाजमा : -
१ . २५ हजार घोडदळ .
२ . १२ हजार पायदळ .
३ . २ हजार तिरंदाज .
४ . प्रभावी तोफखाना .
● छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर घेतलेले मातब्बर
सरदार : -
१ . हंबीरराव मोहिते ( सरनौबत ) .
२ . येसाजी कंक ( सेनापती - पायदळ ) .
३ . नेतोजी पालकर ( प्रमुख सरदार ) .
४ . सूर्याजी मालुसरे .
५ . सर्जेराव जेधे .
६ . बाबाजी ढमदेरे .
७ . आनंदराव नाईक .
८ . प्रल्हाद निराजी .
९ . दत्ताजी पंत .
१० . बाळाजी आवजी .
११ . मानाजी मोरे .
तसेच सर्व मावळ्यांनी भरजरी पोशाख घातलेलं .
दक्षिण दिग्विजय मोहिमेला निघण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशाहीतील वकीलामार्फत कुतुबशाहा बरोबर बोलणी केली. कुतुबशाहीचा कारभार मदाण्णा आणि अक्काण्णा या वजीरांच्या हातात होता. त्यांनी कुतुबशाहशी बोलून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मैत्री करण्यात त्याचा फायदा आहे हे पटवून दिले. तसेच दक्षिणेकडे निघण्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांच्या आघाडीवर शांतता आवश्यक होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी निराजीपंतला बहादुरखानकडे धाडले. निराजीपंताने बहादुरखानला दागदागिने व इतर भेटवस्तु दिल्या. त्याने मोगलांबरोबर गुप्त करार केला की छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाहीच्या दक्षिणेतील प्रदेश जिंकण्यासाठी गेले असताना मोगलांनी स्वराज्यावर आक्रमण करु नये. मोगलांचे स्वराज्यावरील आक्रमण थोपवणे आणि कुतुबशहाशी हात मिळवणी करत दक्षिण मोहीम यशस्वी करण्याच्या योजनेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय मुस्तद्दीपणा, बुद्धीचातुर्य आणि परराष्ट्रनिती धोरण हे पैलू ठळकपणे जाणवतात.
" छत्रपती आणि पातशहा भेटीच श्रेय , हे प्रल्हाद निराजी
, मदाण्णा आणि अक्काण्णा यांनाच जातं " .
छत्रपती शिवाजी महाराज , हैद्राबाद ला येताच
मदाण्णा आणि अक्काण्णा व पातशाहाने महाराजांचे
यथोचित स्वागत केली . हैद्राबादमध्ये छत्रपती शिवरायांची प्रचंड मोठी मिरवणूक काढली होती . हैदराबादमधील प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना पहावयास आतुर झालेला होता ; कारण आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे , सर्वांनी पराक्रम ऐकले होते ( अफजल वध , शास्ताखानाची फजिती , जौहरचा वेढा , आग्राभेट व सुटका , शिवराज्याभिषेक ) . त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज , कुतुबशाहीच्या राजवाड्यात आले , शाही नियमानुसार महाराजांचे योग्य आदरातिथ्य , पातशहाने केले . पुढे १ प्रहर , छत्रपती शिवाजी महाराज आणि सुलतान अब्दुल हसन तानाशहा ( कुतुबशहा ) यांच्यात चर्चा झाली . या चर्चेत , " दक्षिण देश दक्षिणेतील सत्ताधीशांच्याच स्वाधीन राहिला पाहिजे " , असे धोरण निश्चित झाले . आणि इतर काही महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली . हैद्राबादला महाराज १ महिन्याहून , अधिककाळ ( ४ फेब्रुवारी ते १० मार्च १६७७ ) राहिले . या दिवसात एक मुख्य प्रकार घडला तो खालीलप्रमाणे :

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...