विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 August 2019

" छत्रपतींच्या विशेष युद्धनीती "

" छत्रपतींच्या विशेष युद्धनीती "
【 द्वितीय आवृत्ती 】
छत्रपती शिवाजी महाराज हे , ३२ विद्यांमध्ये पारंगत होते .त्यामध्ये अर्थशास्त्र , नीतीशास्त्र , उद्योजकशास्त्र , विविध प्रकारची शस्त्र चालविणे , धर्मशास्त्र , न्यायशास्त्र ,
८ भाषांचे जाणकार समाविष्ट आहे .
वरील सर्व शास्त्र इतर राजांना हि अवगत होते , तरीही
ते युद्धभूमीत यशस्वी का नाही झाले ?????
आणि
छत्रपती शिवाजी महाराज युद्धभूमीत यशस्वी का झाले ?????
।। छत्रपती शिवराय युद्धभूमीत यशस्वी असण्याला कारण
एकच , "छत्रपतींच्या विशेष युद्धनीती " ।।
"छत्रपतींच्या विशेष युद्धनीती " : -
१. कृष्णकावा : -
'कृष्णकावा' म्हणजे , युद्धात शस्त्र न उचलता शत्रूचा सर्वनाश करणे .
उदाहरण १. मिर्झाराजे जयसिंह , पुरंदर तहानंतर असे झाले कि , छत्रपतींनी किल्ले घेण्याचा तडाखाच लावला (तेव्हा मिर्झा दख्खन मध्येच होते ) , आणि पुढे शिवप्रभूंनी जहरी चाल खेळली , बादशहास मिर्झाविरुद्ध पत्र लिहिले , याचा परिणाम असा झाला कि , बादशहास असे वाटले , कि मिर्झा शिवाजीस सामील आहे ; त्यामुळे बादशहाने मिर्झाच्या मुन्शीद्वारे , मिर्झास विष देऊन त्याचा खून केला . ' मिर्झाविरुद्ध शस्त्रही न उचलता त्यास यमसदनी
धाडले '.
उदाहरण २. सिद्दी जौहर , सन १६६० पन्हाळगडाच्या वेड्यातून ; (शिवा काशिद , रणधुरंधर बाजीप्रभु देशपांडे,
आणि बांदल यांच्या साहाय्याने ) बाहेर पडल्यावर ,
विशाळगडावर पोहचल्यावर आदिलशहास एक विलक्षण
पत्र लिहिले त्यामुळे , चिडून आदिलशहाने सिद्दीस दरबारात पेश होण्याचा हुकूम सोडला , आपली नाचक्की
पाहून सिद्दीने विष खावून आत्महत्या केली .
' सिद्दी प्रकरणातही दिसून येते कि , शस्त्रही न उचलता त्यास यमसदनी धाडले '.
अशाप्रकारे शिवछत्रपतींनी 'कृष्णकावा' या युद्धनीतीने औरंगझेब बादशहा आणि अमीन आदिलशहा यांच्या
महाबली योध्यास यमसदनी धाडले .
२. इंगीत जाणण्याची कला : -
'इंगीत जाणण्याची कला' म्हणजे , युद्धातील राजकारणाबद्दल महत्वपूर्ण नीती आहे.या नीतीचा मूळ सूत्र म्हणजे , ' आपल्या शत्रूच्या मनात आपल्याविरुद्ध काय रणनीती चालू आहे , याचा अचूक निष्कर्ष लावणे '.
उदाहरण . आगऱ्यातून सुटका : - संपूर्ण आग्रा प्रकरण
अभ्यासल्यावर समजून येते कि , शिवप्रभूंनी औरंगझेबाच्या सर्व योजना अचूक हेरल्या , आणि
औरंगझेबाच्या मगरमिठीतून यशस्वी बाहेर पडले .
अशाप्रकारे शिवछत्रपतींनी 'इंगीत जाणण्याची कला' या
युद्धनीतीने औरंगझेबास त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अपमान केला .
३. गनिमी कावा : -
'गनिमी कावा' म्हणजे गोरिला वॉर .
कमी फौझेने , शत्रूच्या बलाढय फौझेचा पराभव करणे तेही आपलं कमीत कमी नुकसान करून.
गनिमी काव्याचे तीन प्रमुख प्रकार आहेत .
१. छापा :- छापा म्हणजे जलद गतीने येणे व ३ ते ४ तासात लुटून , कापून त्वरित निघणे .
उदाहरणार्थ : - शाहिस्तेखानावरचा हमला , कल्याणच्या
सुभेदारावरील आक्रमण तसेच लूट .
२.मोहीम :- मोहीम म्हणजे विशेष प्रकारचा छापा , मोहीम हि काही दिवसांची असू शकते .
उदाहरणार्थ :- सुरत लूट , कोकणस्वारी .
३.युद्ध :- वरील दोन पर्याय जमत नसतील तर एखाद युद्ध . सुरुवातीला राजे छापे आणि मोहीमाच करत असत . जसं सैन्यबल वाढत गेलं तेव्हा राजे युद्ध करू लागले .
उदाहरणार्थ :- अफजलखानाचा वध , दक्षिणदिग्विजय .
अशा "शिवछत्रपतींच्या विशेष युद्धनीती" आहेत .आणखी एक विशेष कारण आहे छत्रपतींच्या विजयाचं , ते म्हणजे
"विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर". तो कसा ते आपण पुढच्या लेखामध्ये पाहणार आहोत .
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 7741923346 ( whatsapp no. )
आणि 9579301839 .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...