" पुरंदरचा रणसंग्राम "
【मराठ्यांचा एक अभुतपुर्व पराक्रम 】
अबु तालिब शास्ताखानाच्या , झालेल्या धक्कादायक पराभवामुळे , तसेच सुरतेच्या लुटीमुळे ,
मोगल बादशहा औरंगजेब फारच वैतागला आणि
शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी खासा राजपूत
, अजय सेनापती मिर्झाराजे जयसिंग आणि महाकपटी पठाणी ,सरदार मामुरखान ( दिलेरखान ) या दोन महापराक्रमी सरदारांची नेमणूक करण्यात आली .

■ जयसिंगाला मराठ्यांचा पराभव करण्यासाठी दिलेला
सरंजाम : -
१ . ६०,००० मोगली फौज .
२ . १ कोटी अशरफिया , मोहिमेच्या खर्चासाठी .
३ . ५० तोफा व ३ अतिशय उत्तम तोफा .
४. अनुभवी तथा मातब्बर सरदार .

◆ मिर्झाराजे जयसिंगाबद्दल माहिती : -
पुरंदर स्वारीच्या वेळी , मिर्झा चं वय ५६ वर्षे होतं . वयाच्या १० व्या वर्षी मोगल सैन्यात पदार्पण केले . अनेक कठीण मोहीमा यशस्वी केल्या .एकंदर आयुष्यात , एकही लढाई हरली नाही , अजय सेनापती म्हणून गौरव . राजस्थानातील अमेर , या संस्थानाचे महाराज आणि मोगली सल्तणीचे
सहा हजारी ( प्रथम दर्जाचे ) मनसबदार . औरंगजेबाला
दिल्लीच्या तख्तावर बसविण्यासाठी मदत केली , म्हणूनच
मिर्झा म्हणजे खास , राजकुमार हा मानाचा 'किताब , बादशाहने जयसिंगास बहाल केला .

◆ मिर्झा स्वराज्यावर चालून येतोय , ह्या बातमीची तपशीलवार माहिती बहिर्जी नाईकांनी , महाराजांना
दिली .
दिली .
◆ मराठ्यांची जान किल्ल्यांमध्ये आहे , हे ओळखून
मिर्झाने आपला पहिला डाव टाकला .
मिर्झाने आपला पहिला डाव टाकला .
मिर्झाची रणनिती : -
१ . कुतूबुद्दीन खानाला , ७ हजाराची फौज देऊन , जुन्नर
ते लोहगडपर्यत , स्वराज्याच्या प्रदेशाची नासधूस वा
जाळपोळ केली , व पुढे लोहगडला वेढा घालण्याचे
आदेश दिले .

२ . इहतेशामखानास पुण्याचा काही भाग नासधूस
करण्याचा आदेश दिला आणि त्यास दिमतीस
रणदौलतखान , बिरमदेव सिसोदिया ( राजपूत )
व ४ हजार कडवी फौज दिली .
करण्याचा आदेश दिला आणि त्यास दिमतीस
रणदौलतखान , बिरमदेव सिसोदिया ( राजपूत )
व ४ हजार कडवी फौज दिली .
३ . दिलेरखानास ५ हजाराची मोगली हशमांची आणि
२ हजाराची राजपुतांची फौज , देऊन किल्ले पुरंदरावर पाठविले .

● कर्यात मावळ , भोर मावळ , पौड मावळ , खेडेवारे , कानद खोरे या प्रांतात , हजारो मोगल लुटालूट करत
होते . हे अस्मानी संकट आता विनाशाचे दुसरे रूपच
भासत होते , मोगल पाशवी अत्याचारच करत होते .

पुरंदराला वेढा पडला , ७ हजारी सैन्याने , किल्याला विळखा घातला . पुरंदरचे किल्लेदार होते ,
" मुरारबाजी " . आलेल्या संकटाचे , ते निर्भयपणे सामना
करत होते .
मुरारबाजी , भरलेला देह , पहाडासारखी छाती ,
मजबूत डोंगरासारखे दंड , बुद्धीनेही तेवढेच तेज आणि
न्यायी व कडक प्रवृत्तीचे .

पुरंदर आणि वज्रगड ( रुद्रमाळ ) , हे दोन्ही किल्ले एकमेकांस लागूनच होते , वज्रगड हा उपकिल्ला
होता , उंचीने कमी होता . पुरंदरावर १२०० मावळे होते
, तर वज्रगडावर ३०० मावळे होते . दिलेरखानाने प्रथम
वज्रगड घ्यायचे ठरविले . अडीच हजार फौझेने , किल्ल्याला घेरले . पुढे हशम किलीयवर आले , गडावर
लढाई सुरू झाली . एक एक मावळा , दहा हशमांना भारी
पडत होता . पण समुद्रापुढे नदी किती काळ टिकणार ,
अखेर वज्रगडावर मोगली चांदतारा फडकला .

वज्रगड जिंकल्यामुळे , तोफांचा मारा पुरंदरावर करणे सोपे झाले , मुरारबाजींच्या अडचणी वाढल्या .
दिलेरखानाने अब्दूलाखान , फत्तेलष्कर , आणि महेली
या तीन महत्वाच्या ( भारीभक्कम ) तोफा , कठीण प्रयत्नाने वज्रगडावर चढविल्या . ह्या तोफांमुळे वज्रगड
, आपल्या हातून सुटणे शक्यच नाही ; अशी खात्री निर्माण झाली . पुढे रात्रभर तोफांचा मारा , पुरंदरावर चालू होता . भिकाजी नाईक व त्याचे सहकारी आजूबाजूच्या प्रदेशात , मोगली हशमांच्या वेषात , कधी मौलवी तर फकीर , चांभार इ . वेषात फिरत होते , माहिती काढत होते . बहिर्जी , ही सर्व माहिती महाराजांना पोहचवीत होते .

मिर्झा स्वतः , त्याचा मुलगा कुवरसिंह , उदयभान , हरिभान गोंड , तोफखानाप्रमुख अतिशखान , मीर अतिश , करण राठोड , चतुर्भुज चव्हाण अशी पराक्रमी मंडळी स्वतःची ताकत पणाला लावून लढा दवत होती .
किल्याच्या दक्षिणेकडून मारा करण्याची जबाबदारी दाऊदखान कुरेशी याकडे सोपविली होती .
त्याच्या दिमतीस राजा रायसिंह राठोड , मुहम्मद हुसेन
दाऊदझई , अविदिन बुखारी , झैनूल , शेरसिंह राठोड व
राजसिंह राठोड दिले होते .

【दाऊदखान व दिलेरखान यांमध्ये वैर होते ] .
इकडे रसद पुरंदरावर पोहचवायची जबाबदारी
भिकाजीला देण्यात आलेली . भिकाजीने मोठ्या आत्मविश्वासाने ही जबाबदारी स्वीकारली . भिकाजीने ६० मावळे निवडले . रसद घोड्यावर लादून ६० मावळ्यांसह , भिकाजी करहेपठाराच्या निघाले . पुढे काळदरीमार्फत मावळे पुरंदरावर पोहचले ; कारण तेथे पहारा कमी होता . ( दाऊदखानाला चुकवून , त्याच्या सैनिकांना चुकवून , त्याच्या हेरांना चुकवून , मात्र दोन दिवसातच भिकाजी गडावर पोहचले , गडावर आल्यानंतर , मुरारबाजी त्यांना धन्यवाद देत होते . )

★ मुरारबाजींची धारणा : - " मरावे परी गड शत्रूपदी न
लागावा " .
लागावा " .
■ भिकाजीची रणनीती :-
सफेद बुरुजाला खूप दारूगोळ्याची पोती आणून
व्यवस्थित ठेवायची , जरी शत्रू आला , तरी त्यांचाच नुकसान आहे . योजनेनुसार सर्व काही झालं , परुंत चुकून संध्याकाळी बुरुजाजवळ आग लागली आणि ८० मावळेमृत्युमुखी पडले . मुरारबाजी आणि भिकाजी , यांच मन थोडं कचरल .

दुसऱ्या दिवशी , सकाळीच गडाचा मुख्य दरवाजा उघडला , आणि ७०० मावळे व मुरारबाजी , ५००० मोगलांवर तुटून पडले . मुरारबाजींच्या तलवारी , गनीमाना सळसळ कापत होत्या , जो समोर येत होता तो कापला जाई .... जणू कालभैरवच अवतरला होता . मुराराबाजीं - सारखीच भिकाजीचीही तलवार चालत होती . दिलेरखानाने मुरारबाजी ची तारीफ केली , व मोगलात सामील होण्याचा प्रस्तावही दिला , परंतु मुराराबाजींनी तो प्रस्ताव ठुकरविला . आणि सरळ दिलेरखानाच्या रोखाने धावत आले , दिलेरखानाने दोन बाण मुरारबाजींच्या रोखाने सोडले , आणि मुरारबाजी पडले . दिलेरखानाला सुद्धा वाईट वाटले . भिकाजीने सहीसलामत मुरामरबाजींच्या देहाला किल्यात नेले व
मुख्यदरवाजा लावून घेतला . दिलेरखान खूप खुश झाला
कारण आता पुरंदरही लवकरच ताब्यात येईल , असे त्यास वाटत होते . मुराराबाजींचे अंत्यविधी निट पार पडले आणि भिकाजी नाईकांनी नेतृत्व सांभाळले . दुसऱ्या दिवशी भिकाजीने अशीच रणनीती आखली , भिकाजीचे शौर्य पाहून दिलेरखान हबकला ; काव्याने भिकाजीलाही मारले . तरीही किल्ल्ला खानाला जिंकता आला नाही . उलट किल्यावरील मराठे अतिशय त्वेषाने लढत होते .जवळ जवळ दोन मास उलटून गेले . पण दिलेरच्या आशांच्या , निराशा झाल्या .

पुढे किल्ला तहात , मोगलांना मिळाला . परंतु
दिलेरखानास लढून किल्ला जिंकता आला नाही .

~ राहुल रमेशजी पाटील .
(शंभूमहितीगार)
(शंभूमहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail.com
भ्रमणध्वनी क्र. : - 7741923346 / 9579301838

No comments:
Post a Comment