श्रीमंत बाजीराव पेशवे : एकही लढाई न हारता मराठा साम्राज्याची पताका भारतभर फडकविणारा योद्धा
बाजीराव पेशवे म्हणजे मराठा साम्राज्यातील एक महान सेनापती…त्यांनी १७२० सालापासून आपल्या मृत्यूपर्यंत चौथे मराठा छत्रपती शाहू महाराज यांची पेशव्याच्या (प्रधानमंत्री) रुपात सेवा केली. बाजीरावांनी आपल्या कार्यकाळात मराठा साम्राज्याला एका मोठ्या उंचीवर नेले होते.
आपल्या २० वर्षाच्या लहानग्या पण पराक्रमी कारकीर्दीमध्ये बाजीराव एकही लढाई हरले नाहीत हीच गोष्ट त्यांच्या महानतेचे दाखले देते.
बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा भारतभर डंका वाजवला.
दिल्लीच्या तख्तावर मराठा ध्वज फडकवणे हे बाजीरावांचे ध्येय होते.
बाजीराव पेशवे म्हणजे मराठा साम्राज्यातील एक महान सेनापती…त्यांनी १७२० सालापासून आपल्या मृत्यूपर्यंत चौथे मराठा छत्रपती शाहू महाराज यांची पेशव्याच्या (प्रधानमंत्री) रुपात सेवा केली. बाजीरावांनी आपल्या कार्यकाळात मराठा साम्राज्याला एका मोठ्या उंचीवर नेले होते.
आपल्या २० वर्षाच्या लहानग्या पण पराक्रमी कारकीर्दीमध्ये बाजीराव एकही लढाई हरले नाहीत हीच गोष्ट त्यांच्या महानतेचे दाखले देते.
पेशव्यांच्या कारकीर्दीचे पहिला ११ वर्षांचा व दुसरा ९ वर्षांचा असे दोन खंड पडतात. बाळाजी विश्वनाथाने आरंभलेला उद्योग (स्वराज्यविस्ताराचा) त्याने पुढे चालविला, परंतु वर सांगितल्याप्रमाणे त्याला त्यांत दरबारी मंडळीचा व खुद्द शाहूचाहि अडथळा होऊं लागला. सय्यदाचा करार निजाम पुरा करीना व मराठयांचा घरांत फितूर घालूं लागला. त्यामुळे प्रथम निजामाची खोड मोडणे पेशव्यांस भाग होते, या कामी त्यांची ११ वर्षे गेली व त्यांत त्यांनी आपली कर्तबगारी दाखवून शाहूचा संपूर्ण विश्वास संपादन केला (१७३१). निजामाबरोबरच कोल्हापूरकर संभाजी, चंद्रसेन जाधव, त्रिंबकराव दाभाडे यांचाहि बंदोबस्त केला. यानंतर पुढील ९ वर्षांत चौथाई व सरदेशमुखीच्या नांवाखाली माळवा व गुजराथ हाताखाली घातला. नादीरशहाची स्वारी व स्वतःचे अल्पायुष्य ह्या दोन गोष्टी नसत्या तर दिल्लीस मराठी तख्त स्थापन झाले असते. पहिल्या कालखंडांत स्वकीय विरोधकांचे कावे, छत्रपतीच्या मनाची धरसोड व निजामाच्या लटपटी यांमुळे पेशव्यांचे हातपाय जखडले गेले होते. ते त्यानी कुशलतेने सोडवून पुढील कालखंडांत आपले खरे धाडस व शौर्य दाखविले आहे.
#बाजीराव_आणि_झोप
‘लक्षात ठेवा, रात्र ही झोपेकरिता नाही, तर ती बेसावध शत्रूच्या छावण्यांवर हल्ला करण्याची देवाने दिलेली नामी संधी आहे. झोप ही घोड्यावर बसल्यावरही घेता आली पाहिजे.’ हे सुप्रसिद्ध उद्गार थोरल्या बाजीराव पेशव्यांचे होत. या उद्गारामागे एक महत्त्वाची बाब दृष्टीस पडते, ती म्हणजे बाजीरावांचे स्वत:च्या झोपेबद्दल असलेले नियंत्रण. कुठून आली असेल ही हुकमी झोप? बाजीराव घोड्यावर बसून झोप घेत असे, ही नोंद अनेक ऐतिहासिक बखरींमध्ये स्पष्ट आहे.
#बाजीरावांचे_प्रारंभिक_जीवन
पेशवे घराण्यांतील हे दुसरे पेशवे, बाळाजी विश्वनाथाचे वडील चिरंजीव असून यांचे दुसरे नाव विसाजी असे होते. .
बाजीरावांचा जन्म कोकनस्थ चितपावन ब्राम्हण वंशाच्या कुटुंबामध्ये १८ ऑगस्ट १७०० मध्ये झाला होता. त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ, छत्रपती शाहू यांचे प्रथम पेशवे (प्रधानमंत्री) होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. बाजीरावांच्या छोट्या भावाचे नाव चिमाजी अप्पा होते.
यांचे लग्न १७१३ सालच्या सुमारास चासकर महादजी कृष्ण जोशी यांची मुलगी काशीबाई हिच्याशी झाले.
दमाजी थोराताने बाळाजीपंतास अडकवून ठेविले त्यावेळी बाजीरावहि त्यांच्याबरोबर होते (१७१३).
#लहान_वयातच_बाजीरावांना_मिळाले_पेशवे_हे_पद
लहानपणापासून बाळाजीपंताबरोबर बाजीराव असत, त्यामुळे राज्यकारभार, मुत्सद्दीगिरी व युध्दकला यांचे ज्ञान त्यांना झाले. एकंदर आयुष्यांत त्यांना विश्रांती मिळाली नाही. घोडयावर बसण्यांत व संकटाची पर्वा न करण्यांत ते तरबेज होते. सय्यदाच्या मदतीस बाळाजीपंत दिल्लीस गेले, तेव्हा (१७१८-१९) बाजीराव बरोबर होते. तेथून परत आल्यावर खानदेशांत सय्यदांच्या मदतीस त्यांची रवानगी झाली. दहा बारा वर्षे त्यांची हुषारी शाहुजराजांनी पाहिल्यामुळे बाळाजीपंत वारल्यावर १५ दिवसांनी बाजीराव यांना मसून येथे पेशवाईची वस्त्रे दिली. (ता.१७ एप्रिल १७२०). ती मिळाल्याबरोबर पेशवे हे ताबडतोब दिल्लीच्या कारस्थानासाठी खानदेशांत निघाले. यांना पेशवाई मिळू नये अशी जुन्या मंडळींची खटपट शाहूने चालू दिली नाही. शाहूच्या या निवडणुकीनेच मराठी राज्याचा ताबडतोब भाग्योदय झाला.
जेव्हा १७२० मध्ये बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला तेव्हा शाहू महाराजांनी २० वर्षाच्या बाजीरावांना पेशवे (प्रधानमंत्री) म्हणून नियुक्त केले.
बाजीरावांना तरुण असतानाच पेशवे म्हणून नियुक्त केल्यामुळे सर्व वरिष्ठ मंत्री जसे नारो राम मंत्री, आनंद राम सोमंत आणि श्रीपत राय हे बाजीरावांचा मत्सर करत असत.
#निजाम_विरुद्ध_मोहीम
दक्षिणेत मोघल सुभेदार निजाम-ऊल-मुल्क असफजाह आपले स्वतंत्र साम्राज्य प्रस्थापित करू इच्छित होता आणि त्याकरता तो मराठा अधिकाऱ्यांना आव्हान देऊ लागला.
२७ ऑगस्ट १७२७ मध्ये बाजीरावांनी निजामांच्या विरोधात मोहीम उघडली. त्यांनी हल्ला करून निजामाचे जालना, बुरहानपुर आणि खानदेश उध्वस्त केले. जेव्हा बाजीराव पुण्यापासून दूर होते तेव्हा निजामाने पुण्यावर आक्रमण केले. जेथे दुसरे संभाजी कारभार पाहत होते.
२८ फेब्रुवारी १७२८ मध्ये बाजीराव आणि निजामाचे सैन्य पल्खेडच्या लढाई मध्ये एकमेकांसमोर आले. निजाम पराभूत झाला आणि त्याला करार करून स्वत:ची कातडी वाचवावी लागली. या करारानुसार मराठ्यांनी दक्षिनेणेमधून कर वसूल करण्याचा हक्क मिळवला.
१७२८ मध्ये बाजीरावांनी आपले बस्तान सासवड वरून पुणे येथे हलवले आणि या छोट्या शहराचे एका महानगरामध्ये रुपांतर केले. बाजीरावांनी मुठा नदीच्या किनाऱ्यावर शनिवारवाडा तयार करण्यास सुरुवात केली जो १७३० मध्ये पूर्ण झाला, जिथून पेशवे संपूर्ण राज्यावर नियंत्रण ठेवत असतं.
#माळव्याची_विजयी_मोहीम
निजामला हरवल्यानंतर बाजीरावांचे लक्ष आता माळव्यावर होते.
माळव्याचा मोंगली नायब सुभेदार राजा गिरिधर हा होता. आणि त्याच्यावर सवाई जयसिंग हा सुभेदार होता, परंतु गिरिधर हा जयसिंगाच्या विरुध्द वागे म्हणून जयसिंगाने नंदलाल मंडलोई याच्या मार्फत मराठयांनां माळव्यांत आणले.
१७२३ मध्ये बाजीरावांनी माळवाच्या दक्षिणी भागांमध्ये मोहीम सुरु करण्याची योजना बनवली. पेशवे प्रथम १७२२-२४ त २-३ वेळ तिकडे गेले होते,मराठा मंत्री माळव्याच्या कित्येक भागांमधून कर वसूल करण्यात यशस्वी झाले होते.
मराठा साम्राज्याचा विरोध करण्यासाठी मोघल बादशाहाने गिरधर बहादूरला माळव्याची सर्व सूत्रे दिली.
ऑक्टोबर १७२८ मध्ये बाजीराव आपले छोटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली एक विशाल सेना घेऊन माळव्याकडे कूच करू लागले.
चिमाजींच्या सैन्याने अमझेराच्या लढाई मध्ये मोघलांना पराभूत केले. या लढाईत गिरधर बहादुर आणि त्याचा सेनापती दया बहादुर ठार झाला. पुढे चिमाजींनी उज्जैनकडे सुद्धा कूच केली परंतु रसद कमी पडल्याने त्यांना करार करावा लागला. १७२९ पर्यंत मराठा सैन्य सध्याच्या राजस्थानपर्यंत पोहोचले होते.
त्यानंतर खुद्द पेशव्यांनी तेथे जाऊन तेथल्या वसुलाची व कारभाराची व्यवस्था लाविली.
#बुंदेलखंड_मोहीम
बुंदेलखंडात छत्रसाल याने मोघल साम्राज्याच्या विरोधात उठाव केला आणि आपले स्वतंत्र साम्राज्य स्थापित केले. डिसेंबर १७२८ मध्ये मोहम्मद खानच्या नेतृत्वाखाली मोघलांनी छत्रसालला हरवून त्याच्या कुटुंबियांना कैद केले. छत्रसालने बाजीरावांकडे मदत मागितली पण तेव्हा बाजीराव माळवा मोहिमेमध्ये व्यस्त होते.
शेवटी मार्च १७२९ मध्ये पेशव्यांनी छत्रसालला मदत पाठवली आणि मराठ्यांनी बुंदेलखंडाकडे कूच केली. छत्रसाल कैदेतून सुटला आणि मराठा सैन्यामध्ये समाविष्ट झाला. या संयुक्त आघाडीने जशी जैतपुरकडे कूच केली व महंमद बंगष चा प्रभाव केला, त्याच क्षणी मोघलांना बुंदेलखंड सोडावा लागला आणि बुंदेलखंड परत एकदा छत्रसालच्या अधिपत्याखाली आला.
त्याबद्दल छत्रसालाने झाशी प्रांत (२॥ लक्षांचा) पेशव्यांस दिला व पुढे आपल्या राज्याचा तिसरा हिस्साहि त्यांस दिला (१७३३).
#हिंदुपदपातशाही_स्थापन_करण्याचा_प्रयत्न
यावेळी मराठे व माळवा, बुंदेलखंड, रजपुताना येथील रजपूत एक होऊन धर्माच्या नांवाने त्यांनी मुसुलमानांविरुध्द हत्यार उचलले होते. यावेळी पुन्हा पेशव्यांनी हिंदुपदपातशाही स्थापण्याच्या कल्पनेला उचलून धरले होते, यावेळी जर शाहूने व इतर मराठे सरदारांनी योग्य पाठबळ दिले असते तर पेशव्यांनी दिल्ली सहज काबीज केली असती. पंरतु ती संधि सातारा राजधानींतील अनास्थेमुऴे सर्वस्वी फुकट गेली व पुढे मराठयांविरुध्द मोठे कारस्थान उभारले गेले. पुढे मराठयांना उत्तरेंत स्वा-या करतांना या बुंदेलखंडातील प्रांताची व बुंदेले रजपुतांची फार मदत झाली.
#गुजरात_मोहीम
मध्य भारतात मराठी वर्चस्व वाढवण्यासाठी बाजीरावांनी गुजरातला आपले लक्ष्य बनवले. १७३० मध्ये चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली एका तुकडीला गुजरातला पाठवण्यात आले. गुजरातचा मोघल सुभेदार सरबुलंद खान याने मराठ्यांच्या समोर समर्पण केले आणि त्यांना गुजरातचा कर वसूल करण्याचा अधिकार दिला.
सेनेवर असणाऱ्या बाजीरावांच्या नियंत्रणाला कंटाळून शाहू महाराज्यांचा सेनापती त्रिंबकराव याने मराठ्यांविरुद्ध उठाव केला. त्याला गुजरातच्या दोन मराठा मंत्र्यांनी पाठींबा दिला. मोघल बादशाहने मोहम्मद खान बंगाशला गुजरात परत मिळवण्यासाठी पाठवले. बंगाशने त्रिंबकराव दाभाडे आणि इतर दोन मंत्र्यांसोबत संयुक्त सेना बनवली. दाभोईच्या लढाईमध्ये त्रिंबकरावचा मृत्यू झाला.
#जणंजिऱ्याची_मोहीम
जंजि-याच्या शिद्दयाच्या घरांत गृहकलह लागला, त्याचा फायदा घेऊन शाहूने पेशवे व इतर सरदार यांनां जंजि-यावर पाठविले (मे व आगस्ट १७३३). पेशव्यानी तळे, घोसाळे, बिरवाडी, अवचितगड, निजामपूर वगैरे पुष्कळ ठिकाणे घेतली. आग्र्यांनीहि आरमाराने शिद्दीची ठाणी काबीज केली. प्रतिनिधीने रायगड घेतला. या मोहिमेमुऴे मुंबईच्या इंग्रजांनां धास्ती पडली. त्यांनी हबशांस मदतहि केली. परंतु पुढे पेशवे-प्रतिनिधी यांच्या चुरशीने लढाई थंडावली. लढाईत पेशवे, आंग्रे व प्रतिनिधी हे स्वतंत्र वागत, त्यामुळे जंजिरा घेण्याची आलेली संधि फुकट गेली. यांनतर पेशवे या शिद्दी-प्रकरणांत स.१७३५ पर्यंत कोकणांतच होते. पुढल्या वर्षी ते माळव्यांत गेले व ते तिकडेच वर्षभर (१७३७) होते.
#बादशाह_विरुद्ध_संघर्ष
मळव्याच्ची सनद देते वेळी कबूल केलेल्या चौथ व सरदेधमुखीचा पेशव्यानी दिल्लीच्या बादशहाकडे लकडा लावला, परंतु दिल्लीदरबार ते कबूल करीना व उलट निजामास मिळून त्याने मराठयांविरुध्द जंगी चढाई केली. या स्वारीत उत्तरेकडील सर्व मुसुलमान सुभेदार, नबाब वगैरे हजर होते (१७३६). ही मोहीम १७३८ पर्यंत चालली व तींत शेवटी पेशव्यांनी आठरे येथे बादशहाचा पराभव करून स्वारीखर्च १३ लाख व माळवा प्रांत संपादन केला. आणि दिल्लीची पातशाही हाताखाली घातली. हाच उपक्रम पुढील पेशव्यांनीहि चालविला. नंतर पेशवे परत फिरल्यावर त्यांच्यावर निजाम चालून आला. त्या दोघांची लढाई भोपाळजवळ होऊन तींत पराभव झाल्याने निजाम शरण आला. त्यामुळे नर्मदा-चंबळा दुआब मराठयांनां मिळाला. नंतर पेशवे पुण्यास परतले. (१७३८ जुलै). (१७३७) सादतखान, महंमद बंगष वगैरे सरदारांनी पुष्कळ फौज घेऊन पेशव्यांवर स्वारी केली, पण तींत त्यांच्याच पराभव झाला.
#पेशव्यांची_दिल्ली_वर_स्वारी
२० वर्षांच्या वादळी कारकिर्दीत थोरल्या बाजीराव साहेबांनी काही अचाट धैर्य केली. त्यातील एक होते थेट दिल्लीवर चढाई करणे. १७३७ साली सादतखानावर केलेली ही चढाई इतिहास प्रसिद्ध आहे.
मराठे दिल्लीत येताच बादशहाने लाल किल्ल्याचे दरवाजे बंद करून घेतले
( २०० वर्षांच्या मोगलाई त पहिल्यांदाच घडले)
व तोच मागील दराने यमुनेतून नावंनद्वारे पळून गेला, पुढे जयपूर च्या रण्याने मध्यस्थी करून बादशाह व मराठ्यांच्यात तह घडवण्याचा प्रयत्न केला होता.
तेव्हा बाजीरावांनी आता पर्यंत च्या कारकिर्दीत जिंकलेल्या सर्व मुलखावर ( विशेष माळवा) बादशाह कडून मान्यतेची मोहर उठून घेतली, व गंगा तीरावरील तिर्थस्थळांची ही मागणी केली होती.
ह्या स्वारी बद्दल थेट राउंनीच अप्पांना पत्र लिहून कळवले होते. हे पत्र त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्वपूर्ण ठरावे असेच आहे. पत्रातील एक वाक्य तर कायम स्मरणात रहावे असे आहे, त्यावरून त्या काळातील राजकारणावर भरपूर प्रकाश पडतो –
“दिल्ली महास्थळ, अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो”.
#वसई_मोहीम
वसईची मोहीम झाली, तीस कारण धार्मिक छळ होय. या कामी मालाडचा देसाई अंताजी याने पेशव्यांनां फार मदत केली. चिमाणाजीआप्पास या कामी मुख्य नेमले होते. ही मोहीम स.१७३७ त सुरू होऊन १७३९ च्या जूनमध्ये संपली. या सुमारास इंग्रजांनी शाहू व पेशवे यांच्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण तो फुकट गेला व गॉर्डनने स्वच्छ सांगितले की शाहूवर पेशव्यांचा दाब विशेष आहे.
#पेशव्यांची_शेवटची_मोहीम
इकडे निजामा (नासीरजंग) ने ठरलेली जहागीर देण्याची टाळाटाळ चालविल्याने पेशव्यानी त्याच्यावर मोर्चा फिरविला (१७३९, डिंसेबर) व त्याचा औरंगाबादेजवळ पराभव करून, पूर्वीची व आणीक नवीन जहागीर मिळविली होती. (१७४०, फेब्रुवारी),त्यानंतर पेशवे उत्तरेकडे वळले. तिकडे जात असतां नर्मदाकाठी खरगोण जिल्ह्यांतील रावेरखेडी येथे ताप येऊन बाजीराव याचा अंत झाला (२८ एप्रिल १७४०).
#बाजीरावांचे_व्यक्तिगत_जीवन
बाजीरावांची पहिली पत्नी काशीबाई होय. तिला तीन मुले होती. बाळाजी (नाना साहेब), रघुनाथ राव आणि जनार्दन राव. १७४० मध्ये बाजीरावांच्या मृत्युनंतर नानासाहेब पेशव्यांचे उत्तराधिकारी बनले.
बाजीरावांची दुसरी पत्नी मस्तानी होती. मस्तानी आणि बाजीराव यांचा एक मुलगा होता, तो समशेर बहादुरच्या नावाने ओळखला गेला. सहा वर्षाचा असल्यापासून त्याला काशीबाईंनी वाढवले होते. १७६१ मध्ये मराठा आणि अफगाण यांच्यामध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात वयाच्या २७ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
#बाजीराव_साहेबांचे_चरित्र
#निजाम_दरबारातील_प्रसंग
रूपवान बाजीरावावर हिंदुस्थानातील अनेक स्त्रिया भाळल्या होत्या. एकदा तर बलाढ्य निजामाच्या जनानखान्याने बाजीरावांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा निजाम हादरला. त्याने जनानखान्यास धमकावलेही. परंतु स्त्रियांच्या अट्टहासामुळे निजामाने बाजीरावांना दरबारात बोलावले तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून तमाम जनानखाना संमोहित झाला. कित्येक महिलांनी त्यांच्यावर पायली पायली मोती उधळले. महालात मोत्यांची रास उभी राहिली, परंतु बाजीरावांच्या पापण्या झुकलेल्या होत्या. तिथे बाजीराव उद्गारले एक काशीबाई, दुसरी मस्तानीबाई या दोघी माझ्या पत्नी बाकी सर्व स्त्रिया मला मायबहिणी.
#निधन
२७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले.प्रचंड पराक्रमी वर्णनातीत विद्वत्ता, भविष्याचा वेध घेणारी इच्छाशक्ती असे हे थोरले बाजीराव आदर्श राष्ट्रपुरुष होते. दि. २८ एप्रिल १७४० रोजी वयाच्या फक्त ४०व्या वर्षी निधन झाले.
सर जदुनाथ सरकार लिहितात, (इ. स. १९४२) 'अखंड हिंदुस्थानात हा एक अलौकिक पुरुष झाला असे दिसते.'
#बाजीरावांची_मुद्रा
॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥
No comments:
Post a Comment