विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 October 2019

शूर मराठयांनी औरंगजेबावर आक्रमण करून संभाजी महाराज्यांना का सोडवले नाही?

 
दगा फटका करून आणि फितुरी करून संभाजी महाराज आणि कवी कलश ना पकडून मुकर्रबखान खान, इखलासखान आणि गणोजी शिर्के प्रचितगड मार्गे सांगली जिल्हायच्या बत्तीस शिराळा मार्गे कराड, मान खटाव वडूज भागातून आणि तिथून पेडगाव बहादूर गड ला गेले.गणोजी शिर्के नि दाखवले नासतड तर प्राचितगड सारख्या भागातून येणे केवळ अशक्य होते.एकदा कराड ला गाठले की आपण सुरक्षित हे मुकर्रबखान ला माहीत होते कारण त्यावेळी कराड एक मोठे मुघल ठाणे झले होते.हाताशी 3000 फौज घेऊन जेंव्हा प्राचितगड ला आले टेंव शिराळा गावातील ज्योतजी केसरकर हा मावळा, अप्पशास्त्री दीक्षित आणि तुळजीराव देशमुख आणि 100 लोकांना घेऊन संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला.3000 फौज असलेल्या मुघलांपुढे टिकाव लागला नाही पण अप्पशास्त्री दीक्षित आणि तुळजीराव देशमुख( की देसाई ?)यान जीव गमवावा लागला.ज्योतजीकेसारकर जखमी झाले पण पुढे शाहू महाराजांना परत आणताना त्यांची मराठ्या सरदारांना मन फिरवायला मोठी मदत झाली.
शाहू महाराजांनी अप्पशास्त्री उर्फ कृष्णभट दीक्षित (मूळ आडनाव जोशी) यांच्या वारसांना मौजे कडूनर शिराळा जवळ वतन चालू ठेवले होते.भागांनागर(हैदराबाद)वरून त्यावेळी काही ब्रह्मणे कुटुंब शिराळा गावी स्थायिक झालेली .शिवाजी महाराजांनी अप्पशास्त्री दीक्षित याना शिराळा जवळ ज्योतिषयी वतन दिले होते.त्यानंतर अप्पशास्त्री उर्फ कृष्णभट दीक्षित हंस रामदास स्वामींचे भक्त बनले. समर्थांनी 11 मारुती ची स्थापन केली आहे त्यात एक शिराळा लाआहे.त्याचे मंदिर बांधायला अप्पशास्त्री उर्फ कृष्णभट दीक्षित यांनी पुढाकार घेतला होता.
शिराळा मध्ये तुळाजी निकम आणि तुळाजी कडू देसाई यांच्या वतन वरून वाद असताना स्वतः संभाजी महाराजांनी निवड केला आणि आप्पा शास्त्री त्यावेळी तिथे होत.मिरज ला असताना औरंगझेबाने शिरालाच वतनदार ला आपल्या बाजूने फितवले पण अप्पशास्त्री उर्फ कृष्णभट दीक्षित यांनी त्याला मारून संभाजी महाराजांना कळवले.मौजे कडनूर क्सचे वतन कुळ कायदा असो तो पर्यंत दीक्षित कुटुंबाकडे कडे होते.
एकदा कराड गाठल्यावर मुकर्रबखान ला कसली काळजी लागली नाही कारण त्यावेळी कराड मध्ये 15000 मुघल खाडी फौज होती.
प्रत्यक्ष शम्भू महाराजनचे मेहुणे असल्यावर (गणोजी शिर्के )बाकीच्या लोकांना संशय आला नसावा.प्राचितगड शिवाय बाकीच्या सर्व घाटावर मराठा फौज होत्या.
तब्बल लाख फौज असलेल्या बहादूरगड वर हल्ला करून शम्भू महाराज ना सोडणे आत्मघाताचे ठरले असते.
(वरचयस गोष्टीचा कोणताही ऐतिहासीक पत्र नाही पण दीक्षित यांचे शिवकालीन वाडा, बांधलेले मारुती आणि तुळजा देवीचे मंदिर, रामदास स्वामी शि असलेलं संबंध हेच दर्शवत आहे आणि त्यावेळीच चाफळ येथील पत्रव्यवहार , ही कथा पिढ्या न पिढ्या शिराळा, पन्हाळा भागात सांगितली जाते , नंतर सुद्धा त्यांचे वतन सातारा गादीकडून चालवले गेले.)
ताळटीप:
मराठेशाहीचे अंतरंग :जयसिंगराव पवार
पुनल गावी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर ज्योतजी केसरकर यांची समाधी आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...