विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 December 2019

रणमर्द शिंद्यांचा सिंहशावक मराठा सरसेनापती रक्ताने दिल्लीला अभिषेक घालणारा दत्ताजी शिंदे

रणमर्द शिंद्यांचा सिंहशावक मराठा सरसेनापती रक्ताने दिल्लीला अभिषेक घालणारा दत्ताजी शिंदे
महाराष्ट्रात अस एक घर उरले नव्हते जिथे कोणी आपले प्राण दिले नसतील. अखंड महाराष्ट्र ज्वालांनी वेढला. दत्ताजी शिंदे आणि मराठयांची कत्तल झाली. महाराष्ट्रावर आणि मराठी सत्तेवर दुःखाचा डोंगर कोसळला. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट मराठयांच्या रक्ताने माखुन गेला.
परकिय सत्तेपासून भारत भूमीचे रक्षण करताना मराठी लोकांनी दिलेले बलिदान आज देश विसरुन गेलाय. पानिपत हा तर काही लोकांना विनोदाचा विषय वाटतो. पण लक्षात असू द्या महाराष्ट्रात जेव्हा निर्भयपणे आपले पुर्वज संक्रांत साजरी करत होते तेव्हा लक्ष लक्ष मराठी सेना आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी उत्तरेत अब्दालीशी दोन हात करत होती.
निदान मराठी माणसाने तरी हा दिवस विसरू नये. आजकाल आपण सहज क्षुल्लक कारणास्तव " पनिपत झाले " ही संज्ञा वापरतो. सिनेमा - सिरिअल्स मधून " बचेंगे तो और भी लढेंगे" ही विद्युल्लता "विनोद' म्हणून निर्लज्जपणे वापरत असतो. इतिहासाच्या वास्तवतेचे भान मराठी माणसाने बाळगायलाच हवे..
जयोस्तु मराठा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...