विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 February 2020

आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक

आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक 

 

राजकुमार गडकरी, शिर्डी
" rajkumargadkarisai@gmail.com
आपल्या हिंदुस्तानात येऊन राजवट गाजवणार्‍या इंग्रजांविरोधात सर्वप्रथम बंड करून देशव्यापी क्रांतीचे स्वप्न पाहण्यासाठी शेवटपर्यंत झगडणारा महाराष्ट्रातील एक शूर निधड्या छातीचा विर नरवीर उमाजी नाईक स्वातंत्र्य लढ्यातील एक आद्य क्रांतिकारक नरवीर ठरला गेला, त्यांची पुण्यतिथी 3 फेब्रुवारी रोजी असून त्यानिमित्त त्यांचा हा लेख..
आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी समाजात दादोजी खोमणे व माता लक्ष्मीबाई यांच्या उदरी 17 91 रोजी पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील भिवडी गावाच्या हद्दीत वज्रगडाच्या पायथ्याशी जांभुळवाडी येथे झाला, शूरवीर ,स्वाभिमानी, इमानी व धार्मिक मातापित्यांच्या पोटी उमाजी नावाचा एक रत्न जन्माला आला, उमाजी चे वडील दादोजी हे पुरंदर किल्ल्याचे सरदार होते ,आई लक्ष्मीबाई या जेजुरी जवळील पानवडी च्या होत्या ,त्यामुळे या कुटुंबाची जेजुरीचा खंडोबा वर अपार श्रद्धा होती ,उमाजीचे सर्व कुटुंब नातलग व रामोशी समाज छत्रपतींच्या काळापासून पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे जबाबदारी इमानेइतबारे पूर्व पार सांभाळत होता, त्यामुळे त्यांना गडनायक ही पदवी बहाल होऊंन खोमणे ऐवजी नाईकच सर्वजण म्हणत असत, उमाजीला अमृता व कृष्णा ही दोन मोठाली भाऊ व जिजाई ही लहान बहीण होती ,असे सर्व सुरळीत जीवन जगत असताना उमाजीचे वडील दादोजी सन१८०२ मध्ये स्वर्गवासी झाले, त्यावेळी उमाजी फक्त 11 वर्षाचा होता, हुशार, चंचल तसेच शरीराने धडधाकट रागट, उच्च बांध्याचा, करारी असल्याने त्यांनी लवकरच रामोशांची पारंपारिक छान विद्या ,वेशांतर करून गुक्तपणे बातम्या मिळण्याची हेरकला, आत्मसात केली, तसेच जसा उमाजी मोठा होत गेला, तसा त्याने दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा ,तलवार ,भाले ,कुऱ्हाडी ,तीरकमठा,गोफणी चालवयाची कला अवगत केली, उमाजीचे लग्न गंगुबाई बरोबर झाले होते ,उमाजीला महां काला व तुका ही दोन मुले व पार्वती नावाची मुलगी होती कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना अशातच इंग्रजांनी हिंदुस्थानात सत्ता स्थापन करण्यासाठी लढा सुरू केला ,हळूहळू काही मराठी भाग ताब्यात घेतला पुण्याचा मुलुख जिंकला, इंग्रजी सेनापती वेलस्लीने १८०3 मध्ये तेथे दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले, त्याने इंग्रजांचे काम सुरू केले, सर्वप्रथम त्याने इतर किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्यावरील संरक्षणाचे काम क्रांतिकारी रामोशीसमाजा कडून काढून घेतले छत्रपतींनी दिलेली वतने नष्ट केली व आपल्या मर्जीतील माणसे तेथे बसवली, त्यामुळे क्रांतिकारी रामोशी समाज उपाशी मरू लागल्याने चवताळला तसेच नंतर मराठी राज्य गेली, इंग्रजी सत्तेचा पाया भक्कम होत गेला, भयंकर दुष्काळ पडला ,इंग्रज नावाने भारतात आलेल्या महाभयंकर रोगाने देशावर कब्जा मिळवला, ३जून१८१८ इंग्रजांचा देशावर अंमल सुरू झाला, जुलमी कायद्यापुढे मराठी जनता तग धरीना , आया-बहिणींची अब्रू उघड्यावर लुटू लागली अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला, आईने लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या सांगितलेल्या गोष्टी आठवल्या व एक दिवस ठाम निश्चय केला, छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या आधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही व माझ्या जनतेला उपाशी मरू देणार नाही असा पण करत विठुजी नाईक, कृष्णानाईक, कुशाबा रामोशी, बाबू सोळकर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली, सर्वप्रथम रामोशी समाजाला बरोबर घेऊन छत्रपतींनी दिलेली वतने नष्ट करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली,
इंग्रजांना त्रास देण्यामुळे उमाजीला सन 18 18 मध्ये इंग्रजांनी पकडून वर्षभर तुरुंगात डांबले होते, पण तुरुंगातही उमाजीने लिहिणे वाचणे शिकले व हा वेळ सत्कारणी लावला ,उमाजी सुटल्यानंतर त्याने इंग्रजांविरोधात परत कारवायासुरु केल्या, व आणखी वाढवल्या ,उमाजी हा देशासाठी लढत असल्याने देशवासीय उमाजीला सहकार्य करू लागले, इंग्रज त्यामुळे मेटाकुटिला आले,हळू हळू उमाजीने आपले प्रस्थ वाढवले, त्यामुळे उमाजीला परत पकडण्यासाठी कॅप्टन मॉकटोस या इंग्रज अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली त्याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास नेमुन उमाजीला पकडण्यासाठी आदेश दिला, परंतु यामध्ये मामलेदाराच्या इंग्रज सैन्याबरोबर उमाजीचे मावळे यांच्यात पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात लढाई झाली ,परंतु उमाजीचे मावळ्यांनी गनिमी काव्याने यामध्येमामलेदाराला पराभव दाखवला, उमाजीचा यावेळी जय झाला, तसेच उमाजीचा पाठलाग करणाऱ्या कॅप्टन बॉईड व त्यांच्या फलटणीला मांढरदेवी गडावरून उमाजीने व त्यांच्या मावळ्याने गोफणी चालून माघारी फिरवले होते ,असे अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना व सैनिकांना उमाजीच्या सैनिकानी जेरीस आणले होते ,उमाजी ने 16 फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्ते विरोधात एक जाहीरनामा प्रसिद्ध करून इंग्रजांचा नाश करावा, इंग्रजी नोकरी सोडाव्या, देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन इंग्रजांचा विरोधात अराजकता माजवावी इंग्रजांचे खजिने लुटावे ,इंग्रजांना शेतसारा, कोणतीही पट्टी देऊ नये ,इंग्रजांची राजवट लवकरच नष्ट होणार असून त्यांना कोणीही मदत करू नये, केल्यास त्यास आमचे सरकार शासन करेन, असे उमाजीने जाहीरनाम्यात सांगून एक प्रकारे स्वराज्याचा पुरस्कारच केला होता व तेव्हापासून उमाजी हा जनतेचा राजा बनला, या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले, त्यांनी आता उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला ,मोठमोठे सावकार, वतनदार व उमाजीच्या सैन्यातील काही लोकांना अमिष दाखवत फितूर केले, या फितूरानी उमाजीला अमिषापोटी १५ डिसेंबर १८३१ रोजी इंग्रजांनी उमाजीला भोर तालुक्यातील उतरोली या गावी एका झोपडीत बेसावध अवस्थेत रात्री पकडले, उमाजी वर देशद्रोहाचा इंग्रजांनी खटला भरला, त्यांना पुण्याच्या मामलेदार कचेरीत एका बंद खोलीत ठेवले होते नरवीर उमाजीस इंग्रजांचे फिरते कोर्ट न्यायाधीश जेम्स टेलर यांनी गुन्हे सिद्ध करून फाशीची शिक्षा सुनावली व 3 फेब्रुवारी१८३२ ला पुण्याच्या खडक माळ आळी येथे मामलेदर काचेरी च्या कोठडीत वयाच्या 41 व्या वर्षी फासावर लटकवण्यात आले ,देशासाठी सर्वप्रथम लढणारा, इंग्रजांविरोधात प्रथम बंड करणारा उमाजी नाईक देशासाठी हुतात्मा झाला, स्वातंत्र्य चळवळीच्या माळेतील एक क्रांतीचा मणी निखळला गेला, अशा या उमाजीचे प्रेत इंग्रजांनी इतरांना दहशत बसावी म्हणून पुणे मामलेदार कचेरीच्या बाहेर एका पिंपळाच्या वृक्षाला तीन दिवस लटकावून ठेवले होते, मात्र नंतर धाडशी उमाजीच्या पत्नीने ते नेवून आपल्या जमिनीत मातृभूमीच्या उदरात घातले,तेथे समाधी आहे, उमाजी बरोबर इंग्रजांनी उमाजीचे साथीदार कुशाबा नाईक बाबू सोळकर यांना ही फाशी देण्यात आली होती म्हणून 3 फेब्रुवारी हा दिवस इतिहासाच्या दृष्टीने शौर्याचा असून सर्व समाज ,उमाजी प्रेमी ,देश वासीय या थोर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करत आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...