शिवरायांनी घालुन दिलेली व्यवस्था संभाजीराजांच्या काळात जशी आहे तशी चालुच राहीली किंबहुना त्यात स्वराज्याला हितकारक अशा गोष्टी संभाजीराजांनी वाढवल्या.
सलग 32 वर्ष सैन्य व अधिकारी यांना शिवछत्रपतींनी लावुन दिलेली शिस्त नव्या पिढीतले तरुण सैन्यात आले असतानादेखील संभाजीराजांनी अबाधित ठेवली.
उलट जास्त जबाबदारीने नवी माणसे आपापल्या स्वतंत्र जबाबदारीवर व दक्षतेने स्वार्या व छापे घालु लागले.
शिवकाळ व शंभुकाळातली सर्वात महत्वाच्या फरकाची आणि मराठेशाहीसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे शिवकाळात फार फारतर दोन आघाड्यांवर झुंजावे लागे पण शंभुकाळात शत्रू म्हणजेच दस्तुरखुद्द आलमगिर औरंगजेब जातीने दक्षिणेत उतरल्याने मराठ्यांना संभाजीराजांच्या नेतृत्वात किमान पाच ते सहा आघाड्यांवर लढावे लागत होते.
छत्रपती संभाजीराजांनी युद्धतंत्र स्वतःच्या हातात घेऊन आपल्या सर्व युवा व अनुभवी सेनापतींना रणांगणावरचे सर्व अधिकार बहाल केले तसेच लढाईसाठी इच्छुक सरकारकुनांनाच स्वार व पाऊलोक बाळगण्याची परवानगी दिली यामुळं इतर सरकारकुनांची वायफळ लुडबुड युद्धक्षेत्रातुन पुर्णपणे बंद झाली.
धामधुमीचा काळ लक्षात घेता संभाजीराजांनी आपल्या प्रतिनिधी पदाचा कार्यभार आपल्या पत्नी महाराणी सरकार येसुबाईंना सोपवला.
येसुबाई सरकार राजधानी रायगडावरुन प्रशासनाची कामे स्वतंत्र सही शिक्क्यांनीशी करत असत.
सर्व राजपत्रे देण्याचा व राज्यव्यवस्थेसंबंधी फर्मान काढण्याचा अधिकारही संभाजीराजांनी येसुबाईसाहेबांना दिला होता.
"श्री सखी राज्ञी जयती।" ह्या संभाजीराजांनी दिलेल्या शिक्क्याचा वापर येसुबाई करीत असत.
पुढे थोरले शाहु कैदेत असताना त्यांच्या 'सप्तहजारी' मोकाशाचा कारभार येसुबाईंनी "येसुबाई वालिदा-ई-साहू राजा" या पर्शियन लिपीतील शिक्क्यांनी केला.
अन्वयार्थ -
1) शिवकाळात लढाया फारफारतर 2 आघाड्यांवर व्हायच्या त्या शंभुकाळात 5-6 आघाड्यांवर होऊ लागल्या.
2) शिवकाळात मराठ्यांचा लढा अप्रत्यक्षपणे औरंगजेबाशी होता शंभुकाळात खुद्द औरंगजेब स्वराज्यावर चालुन आला.
3) शिवकाळातली प्रशासनाची व सैन्याची शिस्त संभाजीराजांनी अलबत अबाधित ठेवली.
4) शंभुकाळात स्वतःच्या वैय्यक्तीक जबाबदारीने नवे अधिकारी स्वतंत्रपणे छापे घालु लागले.
5) शंभुकाळात युद्धक्षेत्रातली सरकारकुनांची 'निरर्थक' लुडबुड सरळ सरळ बंद झाली आणि लढवैय्यांनाच पाऊलोक व स्वार बाळगण्यास परवानगी मिळाली.
6) शंभुकाळात स्वतः शंभुराजांनी युद्धक्षेत्राची सुत्रे स्विकारल्याने स्वतंत्रपणे "राणी" हे पद निर्माण केले व प्रशासनातले अधिकार "श्री सखी राज्ञी जयती।" येसुबाई सरकारांना दिले.
पित्याने पायर्या बांधल्या पुत्राने कळसाला गवसणी घातली म्हणुनच "बाप से बेटा सवाई...!"
क्षत्रियकुलावतंस छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो.
#छत्रपती_संभाजीराजे_जन्मोत
पोस्ट साभार : विशाल गवळी
No comments:
Post a Comment