'कंक' घराण्यास छत्रपती संभाजी महाराजांची सनद
हे पत्र २३ जून १६८५ चे आहे. गुंजन मावळातील भूतोंडेच्या 'कंक' आडनावाच्या वतनदारांकडे हे पत्र सापडले. ह्या पत्रामुळे संभाजी महाराजांची पोर्तुगीजांशी झालेली 'फोंड्याची लढाई' उजेडात आली. पत्रातील मयत वडिलांचे नाव कृष्णाजी व मुलाचे नावही कृष्णाजी असेच आहे. आता आपण पत्र पाहू. श्री !
शंभो शिव !
जातस्य मुद्रा दयो !
रिव राजते ! यदं !
की सेविनो लेखा !
वर्तते कस्यनो !
परी ! ( संभाजी महाराजांचा शिक्का )
श्री !! शंभूनर पतीहर्ष
निदान मोरेश्वर सूत
नीलकंठ मुख्य प्रधान
( नीलकंठ मुख्य प्रधान याचा शिक्का )
पत्रवतन कृष्णाजी कंक पदाती नाईक सेवक राज्यमंडळ शके १२ क्रोधन नाम संवत्सरे आषाढ शुद्ध द्वितीया भोमवासर मानिलेचा ( म्हणजे मशारनिल्हे ) बाप कृष्णाजी बिन येसजी कंक यास हशमाची हजारी होती. त्यावरी फोंडियाच्या कोटास फिरंगियानी लगट केला. तेंव्हा राजश्री स्वामी ( म्हणजे संभाजी राजे) राजापूरीहून स्वार होऊन फोंडियास गेले ते वख्ती खाडीवरी गनिमासी गाठी घालून झुंज बहुतांचे केले ते वख्ती जखमा लागोन जरतूर जाला म्हणोन घरास जावया आज्ञा दिल्ही. घरास आलियावरी जखमा फुटोन मयत जाला त्याचा लेक मानिले ( म्हणजे मशारनिल्हे ) त्याचे नाव कृष्णाजीच ठेविले आहे. तिन वरसाचा मूल आहे. ( म्हणजे मूल तीन वर्षाचे आहे. ) त्याच्या नावे सुभा चालवावा आणि लोकाच्या जमावास चाहूजी कंक आहे त्यास कारभारी करून ठेवावा म्हणोन येसजी कंक यानी विनंती केली
त्यावरून स्वामी कृपाळू होऊन कृष्णाजी कंक स्वामीकार्यावरी पडला याकरिता याच्या लेकास सुभा दिल्हा आणि लोकांचा जमाव करावा हमेशा चाकरीबरी असले पाहिजे म्हणोन 'चाहूजी कंक' शंभर मावलीयांत होता तो माकूल पाहोन कारभार चालवावयासी दिल्हा. साभार सतीश कदम सर.
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment