❤️ जिजाऊंनी शिवरायांसाठी ठेवलेले 25 लाख होन ❤️
शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर 11 दिवसांनी जिजाऊंचे निधन झाले. ती तारीख 17 जून 1674.
शिवरायांवर जिजाऊंचे फार प्रेम होते. जिजाऊंच्या संस्कारांनी शिवरायांना
'छत्रपती शिवाजी महाराज' केले होते. मुलगा कितीही मोठा झाला तरी आईची माया
कधीच कमी होत नाही. ती नेहमी आपल्या मुलाची काळजी घेत असते.
महाराजांच्या राज्याभिषेकावेळी फार खर्च झाला होता. दान खूप दिले होते.
सभासद म्हणतो 1 कोटी 42 लाख होन म्हणजे एक होनाची किंमत 3.5 रुपये धरल्यास 4,970,0000 रुपये एवढा खर्च राज्याभिषेकाचा झाला होता. त्यावेळी स्वराज्याच्या तिजोरीवर नक्कीच भार आला असणार.
जिजाऊंनाही त्याची चिंता असेलच. एक डच पत्र याची साक्ष देते.
दि. 3 ऑक्टोबर 1674 ला वेंगुर्लाहुन बताव्हिया ला एक पत्र लिहिले गेले.
त्यात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकबद्दलची हकीकत होती. त्यात
राज्याभिषेकाचे सविस्तर वर्णन त्याने केलेले होते. राज्याभिषेक सोहळ्याचे
वर्णन करून आणि हकीकत सांगून पुढे तो लिहितो 'शिवाजीची आई 80 वर्षाची
वयातीत म्हातारी होती. तरी राज्याभिषेकाला उपस्थित राहून 12 च दिवसांनी ती
मरण पावली. तिने 25 लाख होन काहींच्या मते अधिकच आपल्या मुलाला मागे ठेवले'
12 दिवस सांगताना त्याची गल्लत झाली असावी. पण यात महत्वाचे हे की
जिजाऊंनी शिवरायांना 25 लाख होन मागे ठेवले होते. शिवरायांना त्या पैशाची
नक्कीच मदत झाली असणार. आईची माया कधी कमी होत नाही याचे हे उत्तम उदाहरण.
जिजाऊंचा आज स्मृतिदिन. जिजाऊंना विनम्र अभिवादन 🙏❤️💐
चित्र- सनी कोळेकर.
- आशुतोष सुनील पाटील.
#HiStoryteller #AshutoshPatil
No comments:
Post a Comment