फिरगोंजी नरसाळा....
आपल धाकलं धनी शंभुराजे यांच्याच अंगाखांद्यावर खेळत खेळत मोठे झाले. शंभुराजे यांना मायेने फिरंगोजीबाबा म्हणत.यावरुनच लक्षात येत यांना महाराजांच्या परीवारात किती मानाचे स्थान असेल याची कल्पना होते.
शास्ताखानास संग्रामदुर्गाला वेढा देऊन ५०चे वर दिवस झाले होते. पण किल्ला तो वश होत नव्हता. जमिनीवरील हा किल्ला, किल्ला किल्ला तो कसला ती एक गढीच. जास्तीत जास्त ४०० - ५०० मावळे राहू शकतील एवढे ते आवार, हा छोटेखानी एक दिवसात घेऊ याच ऐटीत २१ जून १६६० रोजी खानाने वेढे दिले पण किल्ल्यातील मराठ्यांनी मोगलांशी एकाकी झुंज मांडली होती.मराठ्यांचे धैर्य तिळमात्र ही कमी झाले नव्हते.
किल्लेदार फिरंगोजी मोठ्या धीराचा माणूस. कुठलीही मदत न मिळता, हा माणूस इतके दिवस तग धरून होता. मोगल आणि मराठे यांच्यात सतत छोटीमोठी झुंबड होत असे. पण आता शास्ताखानाने कच खालली होती.अल्लाला दोष देण्याच्या कार्यक्रमाचा त्याचा सपाटाच चालू होता. "या अल्ला इतने दिन हो गये लेकिन ये छोटासा किला हासिल नही होता तो उस सिवाजी के पहाडी किले तो हमारी जान निकाल देंगे".
एक दिवस त्याने आपल्या शामियान्यात प्रमुख सरदारांसमवेत एक गुप्त मसलत केली. बेत ठरला किल्ल्याच्या एका बुरुजापर्यंत गुप्त सुरंग खोदून त्यात दारू भरायची आणि बार उडवून टाकायचाअसा बेत ठरला. ठरल्याप्रमाणे ते काम मात्र मोगल सैनिकांनी अतिशय शिस्तीत केले. किल्ल्यातील मराठ्यांना याची काडीमात्र खबर नव्हती. मंगळवार दि. १४ ऑगस्ट १६६०. रोजी सुरुंगात दारूगोळा भरला आणि आणि दिली वात पेटवून सुरसुर करत ती वाताडी पेटत बुरुजाच्या दिशेने निघाली. आणि क्षणार्धात एकच धमाका उडाला.
बुरुजावरील मराठे आकाशात उडाले.हे पाहून शास्तेखानाला स्फुरण चढले. त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली.
किल्ल्यावर अवघे ३००-३५० मावळे होते.पावसाळा चालू होणार म्हणून किल्यावर भरपूर रसद भरली होती.मुघलांनी किल्यास वेढा घातला व किल्यावर तोफांचा भडिमार चालू केला.पण किल्ला काही दाद देत नव्हता.मुघल सैनिक किल्याच्या बुरूजाजवळ आले की त्यांना गोफनगुंडे बसत.गोफनच्या साह्याने त्यांनी मुघली सैन्यांस रक्तबंबाळ केले होते.अवघ्या ३००-३५० मावळ्यासह फिरंगोजीनी किल्ला ५५ दिवसलढविला.मुघलांना किल्यावर प्रवेश करता येईना.अखेर त्यांनी तटापर्यंत भूयार खणून किल्ल्याचा तट उडविला.किल्याची एक बाजू उघडी पडली. किल्याजवळ हातघाईची लढाई झाली.
मुघलांच्या प्रचंड सैन्यापुढे आपल्या
सैन्याची वाताहत होणार ध्यानात आल्यामुळे त्यांनी माघार घ्यावयाचा निर्णय
घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला व मावळ्यांचे होणारे नुकसान
टाळले.कारण महाराज म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा.माणूस खराब होणार नाही
याची काळजी घ्यावी.'फिरंगोजीच्या पराक्रमावर खुष होऊन राजेंनी त्याना
भूपाळगडाची किल्लेदारी,एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.
दिलेरखान व संभाजी राजांचा भूपालगडावर कब्जा. ७०० मराठ्यांचे हात तुटले.
संभाजी राजे या कालखंडात दिलेरखानास मिळाले होते. इतिहासाचा हा एक
दुर्दैवी अध्याय आहे. इतिहास हा कधी कधी कडू असतो. त्यातीलच हे एक पान.
भूपालगडावर फिरंगोजी नरसाळे हे किल्लेदार होते. दिलेरने टेकडीवर तोफा
चढवल्या, तोफांच्या मा-याने किल्ल्याचा बुरुज ढासळला. एका प्रहरात किल्ला
मोगलांच्या हाताला लागला. मराठ्यांकडून प्रतिकार झालाच नाही कारण
दिलेरखानाने शंभूराजांना पुढे केले होते.
शंभू राजानी फिरंगोजी नरसाळे
यांना एक पत्र धाडले होते त्यात लिहले होते की “स्वराजाचा युवराज म्हणून
किल्ला खाली करण्याची अर्जी करत आहोत.” (उल्लेख "स्वराजाचा युवराज" म्हणून
केला होता दिलेरखानचा सरदार म्हणून नाही)
फिरंगोजी नरसाळे यांनी संभाजी राज्यांविरूद्ध त्यांनी तलवार उचलली नाही.
इकडे, आजू बाजूच्या परगण्यातील मराठ्यांना या हल्ल्याची माहिती कळाली तर
ते मदतीस येऊन पोहोचतील या भीतीने दिलेरखानने लगेच इखलासखान, जसवंतसिंग
बुंदेला व रशीदअली रोशनाई यांना रक्षणाकरिता नामजाद केले, किल्ल्यावरील
सर्व मनुष्यास कैद केले गेले.
जी ७०० मावळे कैद झाले होते त्या प्रत्येकाचा एक हात कापून त्यास सोडून दिले, बरीच मनुष्ये गर्दीत ठार झाली.
भूपालगड संभाजीराज्यांच्या ताब्यात देऊन ते महाराजांकडे रायगडावर निघून
आले. याबद्दल महाराजांनी फिरंगोजींची खूप खरडपट्टी काढली.व तोफेच्या तोंडी
देण्याचे आदेश दिले.संपुर्ण रायगड हादरला.फिरंगोजीबाबांना तोफेच्या तोंडी ,
महाराजांचे हे रुद्ररुप पाहुन रायगड सुध्दा थरथर कापतात होता.कोण समजुत
काढणार महाराजांची .....
पुतळाबाई महाराजांच्या दालनात गेल्या व
महाराजांना समजावु लागल्या ,उद्या हाच न्याय शंभुराजांन बद्दल होणार का?
महाराज शांत होते ,त्यांनी पुतळाबांईना जाण्यास सांगितले ,रात्रभर झोप
नव्हती. पहाट झाली होती .फिरंगोजींना तोफेच्या तोंडी बांधण्यात आले होते.
महाराज स्वत: दालनातुन पळत सुटले ,व थांबण्याचे आदेश दिले.फिरंगोजी बाबांना
सोडण्यात आले.महारांजांचे डोळे पाणावले होते ,महाराजांनी मिठी मारली व
विचारले " कायच का बोलला नाही तुम्ही" त्यावर फिरगोजी बाबा म्हणाले महाराज
तुमचा हुकुम महत्त्वाचा ,तो आईकण्यातच धन्यता ,माझं काय पिकलेल पान कवातर
गळुन पडणारच.
काय करणार महाराज युवराजांना पाहील की तुमीच दिसतासा आम्हास .मग तुम्ही सांगा काय करावं आम्ही.
(संदर्भ श्रीमान योगी)
धन्य ते मावळे धन्य ते शिवराय.
शिवरायांची पुण्याई खुप खुप थोर म्हणुनच अशी सुर्याहुन तेजस्वी मावळे स्वराज्याच्या सेवेत होती.
धन्य त्या जिजाऊ...
धन्य ते शिवराय...
धन्य ते शंभुराजे...
धन्य ते मावळे...
No comments:
Post a Comment