एकीकडे शाहिस्तेखानाचे आलेले विध्वंसक आक्रमण आणि दुसरीकडे शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्दी जोहरशी लढण्यात गुंतलेले अशी भयानक संकट स्वराज्यावर आले असताना जिजाऊ माँसाहेबांनी कोणते पाऊल उचलले या बद्दल कवी परमानंद शिवभारत मध्ये लिहतो -
" यादवराजाची कन्या शहाजीराजांची पत्नी युद्धरस अनुभवण्यासाठी उत्साहित होऊन लढायला सज्ज झाली. आपल्या गिरीदुर्गांचे रक्षण करण्यासाठी ती दक्ष झाली "
शिवभारतातील या नोंदीवरून स्पष्ट होते की राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी या कालावधीत किल्ल्यांच्या रक्षणाची आणि किल्लेदार, अधिकारी आणि सैनिकांना मार्गदर्शनाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली होती.
शिवाजी महाराजांना पन्हाळाच्या वेढातुन सोडवून आणने हे ही स्वराज्याच्या रक्षणासाठी महत्वाची गोष्ट होती. त्यावेळी जिजाऊ मासाहेब ह्यांनी नेताजी पालकर यांना निर्धार बोलून दाखवला याचे वर्णन कवी परमानंद असे करतो -
" माझ्या त्या बाळाला मी स्वता सोडवून आणण्यासाठी युद्ध करणार आहे. मी आज युद्धामध्ये जोहराचे मस्तक छाटुन आणीन. तुम्ही येथे एकत्रपणे शत्रुबरोबर युद्ध करा. मी स्वत: त्या जोहरासोबत युध्द करीन "
शिवभारतातील या माहितीवरुन राजमाता जिजाऊ माँसाहेब ह्या मनाने कणखर आणि लढाऊ वृत्तीच्या होत्या. त्यांचे मन निर्भय होते आणि त्यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास, धाडस होते हे दिसुन येते.
संदर्भ - शिवभारत
- राज जाधव
No comments:
Post a Comment