नारो बापूजी मुदगल देशपांडे....
हे छत्रपतींचे बालसंवगडी होते.स्वराज्य स्थापनेच्या शपथ विधीतील एक अनमोल संवगडी म्हणजे नारो बापूजी मुदगल हे होत.
शाहीस्तेखान पुण्यात लालमहालामध्ये आपल्या विशाल सैन्याबरोबर मुक्कामाला असताना त्याने इथल्या गोरगरीब रयतेला प्रचंड त्रास दिला होता. त्याने प्रजेकडुन अमाप लुट केली होती. शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी शिवरायांनी स्वतः ३ एप्रिल १६६३ रोजी लालमहालात घुसुन शाहीस्तेखानावर हल्ला केला आणि त्याला आपली चुणुक दाखवली. शिवरायांच्या आक्रमकतेमुळे भयभीत झालेला शाहीस्तेखान तीन दिवसात आपल्या फौजेसह पुणे सोडुन पाय लावून पळाला. जाताना त्याने केलेली लुट सोबत घेउन गेला. शाहीस्तेखानाने स्वराज्याची अपरिमीत हानी केली.
स्वराज्याचा डोलारा पुन्हा उभा राहणे आवश्यक
होते. मार्ग सापडत नव्हता. शिवरायांनी बहीर्जी नाईकांवर आर्थिक स्त्रोत
शोधण्याची जबाबदारी सोपवली. बहीर्जी नाईकांनी आपली जबाबदारी पार पाडली.
“राजे, सुरत मारलियाने अगणित द्रव्य गवसेल…” ही गोष्ट त्यांनी महाराजांना
सांगितली. महाराजांनाही पटले .शाहीस्तेखानाने स्वराजाची केलेल्या नुकसानीचा
बदला म्हणजे ....
" सुरतेवर छापा "
मराठ्यांच्या इतिहासातील एक गौरवास्पद घटना. या घटनेनंतर शिवरायांच्या
शत्रुंनी त्यांचा इतका धसका घेतला की त्याचे वर्णन इंग्रजी पत्रांमध्ये
“Surat Trembles At The Name Of Sevagee” (अर्थ-शिवरायांच्या नावानेच सुरत
थरथर कापते.) अशा पध्दतीने केल्याचे पहायला मिळते. शिवरायांना जगभर
पोहचवणाऱ्या अनेक प्रसंगांपैकी हा एक प्रसंग. शिवरायांची राजनिती,
युध्दनिती, पराक्रमाचा एक उत्कृष्ट नमुना.
स्वराज्य स्थापनेच्या शपथ घेण्यापासून,स्वराजाचे पहीले
तोरणा घेण्या पासुन महाराजांच्या सर्व कार्यात सदैव सोबत असणारे नारो
बापूजी मुदगल.इतिहासकारांनी या महान मावळ्यास वंचित ठेवले.शिवरायांच्या
विश्र्वासातील बालमित्र होते.
६ जानेवारी - ९ जानेवारी १६६४ पर्यंत
महाराजांनी मनसोक्त सूरतेवर छापा टाकला. बाद्शःची सुरत बतसुरत झाली.
सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले.
२३ जानेवारी १६६४
रोजी एक मोठी वाईट घटना घडली ती म्हणजे शिवरायांचे वडिल शहाजीराजे यांचा
स्वर्गवास झाला.शहाजीराजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून
गेले. ५ फेब्रुवारीस मराठा फौजेचा माघ काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात
पोचले आणि तडक मागे जुन्नरहुन मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला.
मुकुंदसिंहांस अटकाव करण्यासाठी महाराजांचे बाळसवंगडी नारों बापूजी मुदगल
सरसावले. नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे
पुत्र.
वडगावजवळ नारो बापुजिंच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना
झाला. मुघलांनकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी
सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो
बापूजी आपली नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते की,
मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत
नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजिंच्या छातीत घुसला
आणि ते धरणीवर कोसळले.५ फेब्रुवारी १६६४ नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान
दिवस आहे.
महाराजांना सलग दोन संकटे आली ,एक शहाजीराजे व स्वराज्य स्थापनेपासून ते स्वराज्यातील सर्व सुख दुःख त
खांद्याला खांदा लावुन भावासारखा बालसंवगडी नारो बापूजी मुदगल हे स्वर्गवासी झाले ,राजे खुप दु:खी झाले.
No comments:
Post a Comment