## सरदार कदमबांडे. ##
postsaambhar :डॉ उदयकुमार जगताप
नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते.
मराठा व पेशवे कालखंडात १८१८ पर्यंत गायकवाड, होळकर, पवार, कदमबांडे,
शिंदे या मराठी शासनकर्त्यांनी आपली सत्ता येथे प्रस्थापित केली. कसबे
रनाळे मूळ संपादन करणार अमृतराव कदमबांडे हे विजापुरास चाकरीस होते .
दरम्यान त्यांचे पादशाहाशी वितुष्ट आले म्हणून साताऱ्यास छत्रपतींच्या दरबारी आले .
पुढे लढाईत गोळी लागून अमृतराव ठार झाले
त्यांचे चिरंजीव त्रिम्बक कदमबांडे व सक्खे बंधू संताजी ,चुलत बंधू
राघोजी पराक्रमी असल्याने परगणे नंदुरबार व परगणे सुलतानपूर च,मौजे कोपर्ली
,मौजे हरदू , तोरखेड , ठाणे चाकरीचे पोटी लावून गुजराथ प्रांती अंमल
बसवण्यास पाठवले ,
कदमबांडे ३० हजार फौज घेऊन गुजराथ सर करून रनाळे
मुक्कामी आले . नंतर शाहू महाराजांची कन्या गजराबाई राघोजी यांचा मुलगा
मल्हारराव कदम याना दिली .
संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता
असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी
गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत
. तोरखेडा गढी हि त्यापैकी एक.
स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे.
तोरखेडा गढी दक्षिण नंदुरबार भागात शहादा तालुक्यात शहादा पासुन २७ कि.मी. अंतरावर आहे .
गावाच्या एका टोकाला तापी नदीकाठी हि गढी असुन गढीच्या आत सरदार कदमबांडे यांचा तीन मजली जुना भव्य वाडा आहे.
गढीच्या तटबंदी व बुरुजांनी जरी माना टाकायला सुरवात केली असली तरी वाडा आजही सुस्थितीत आहे
मोगलाई अमलात राऊळ यांनी बंड करून मनस्वी उपसर्ग केला म्हणून राणोजी
कंठाजी व गोजजी कदम याना त्यांचा बंदोबस्त करून इनाम घेण्याचे पेशवांच्या
हुकुमाने सनदा करून दिल्या .
सरदार कदमबांडे यांनी हा भाग जिंकुन
घेताना हि गढी देखील जिंकली. . इंग्रजांनी त्या घराण्याचा उल्लेख स्वत:स
राजे समजणारे, स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र ध्वज, घोडदळ, पायदळ बाळगणारे असा
केला आहे.
छत्रपती शाहुमहाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर अमृतराव कदमबांडे त्यांच्या पक्षात सामील झाले.त्याकाळापासून ते सुमारे
इ.स.१७१० ते १७३५ हा काऴ कदमबांडे घराण्याचा सुवर्णकाऴ होता.
No comments:
Post a Comment