विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 7 July 2020

मराठा घराणी भूमिका

मराठा घराणी

भूमिका

छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात महाराष्ट्रात हिदवी स्वराज्य स्थापन करून मराठी सत्तेचापाया घातला. आठराव्या शतकात हिंदूस्थानभर मराठी सत्तेचा विस्तार झाला. हिंदूस्थानच्या इतिहासात हा कालखंड मराठी सत्तेच्या परमप्रभुत्वाचा (मराठा सुप्रीमसी) कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता १८१८ पर्यंत टिकली.

सबंध हिंदुस्थानातील इतर प्रांतांतील जनसमूहास मुसलमानी सत्तेचे जोखड झुगारून देण्याचे काम करता आले नाही, ते मराठयानी केले. त्यांनी मुसलमानांची सत्ता झुगारून देऊन स्वत:ची सत्ता सबंध हिंदुस्थानभर अठराव्या शतकात राबविली. दिल्लीचे तख्त ताब्यात घेऊन मोगल बादशाहच्या नावे १८०२ पर्यंत राज्यकारभार केला. इंग्रजांनी मराठ्यांसही दिल्लीतून घालवून मोगल तख्त ताब्यात घेतले आणि सबंध हिंदुस्थानात पसरलेल्या शिंदे, होळकर, गायकवाड यांच्या ताब्यातील काही मुलूख खालसा करून व त्यांना मांडलिक बनवून सर्व हिंदुस्थानभर अधिसत्ता स्थापन केली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...