विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 8 July 2020

पटवर्धन घराणे

पटवर्धन घराणे
पेशवाईतील एक निष्ठावंत व कर्तबगार घराणे म्हणून पटवर्धन घराणे ओळखले जाते. हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवड गावचे होय. या घराण्याचे मूळ पुरुष हरिभट पटवर्धन. त्यान  कृष्ण, बाळ, त्रिंवक, गोविंद, रामचंद्र, माधव य भारकर असे सात मुलगे होते. त्यांपैकी त्रिंबक, गोविंद व रामचंद्र हे प्रसिद्धीस आले.
हरिभट गाव सोडून बहिरेवाडी येथे आला. तेथे त्याचा इचलकरंजीकर घराण्याचे संस्थापक नारो महादेव जोशी यांच्याशी कुलोपाच्याया म्हणून संबंध आला. इचलकरंजीकर व पेशवे यांचे विवाहसंबंधाचे नाते होते. त्यामुळे याचा बाळाची विश्वनाथाशी संबंध आला. गोविंदराव यांनी इंद्रोजीच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी त्यास त्याच्या सैन्याचे आधिपत्य दिले. अशा रीतीने पटवर्धनांनी मराठी राज्याच्या सेवेस सुरुवात केली. भाऊ रामचंद्रराव यांनी  वसईच्या मोहिमेत मराठ्यांच्या बाजूने मोठा पराक्रम गाजवला.
गोविंदराव यांच्या पराक्रमामुळे व स्वामिभक्तीमुळे त्यांचे नाव सर्वत्र झाले होते. बाळाजी बाजीराव यांनी  आपले पाच हजांरांचे पथक गोविंदराव यांच्या  स्वाधीन करून त्याची नवीन कामगिरीवर नेमणूक केली.  या दोन्ही भावांबरोबर हरिभटाचे आणखी दोन मुलगे-त्रिंबकराव व भास्करराव हेही त्यांना सामील झाले. तसेच पटवर्धनांचा इतर परिवारही पेशव्यांच्या सैन्यात व चाकरीत दाखल झाला.
माळवा (१७२८, १७४०), दिल्ली (२७३७, १७३९), बुंदेलखंड (१७४१), गुजरात (१७३१, १७५५) आणि कर्नाटक सावनूरचा नबाब,  हैदर व टिपू यांच्या विरुद्ध यांत झालेल्या लढायांत पटवर्धन घराण्यातील अनेक पुरुषांनी मोठा पराक्रम करून पेशव्यांना यश प्राप्त करून दिले. त्यामुळे त्याला १७५५ मध्ये नगाऱ्याचा मान देण्यात आला.
सदाशिवराव भाऊ व पटवर्धन यांचे एवढे सूत नव्हते. शिवाय गोविंदराव दक्षिणेच्या स्वारीत गुंतस्यामुळे पटवर्धनांपैकी पानिपतच्या लढाईत कोणीही हजर नव्हते. पण भाऊसाहेबाच्या साह्यास जाणाऱ्या बाळाजी बाजीरावाबरोबर पटवर्धन उत्तरेत गेले होते. शिवाय १७५० नंतर दक्षिणेची बाटू मुख्यतः पटवर्धनांनी सांमाळली होती.
पटवर्धन घराण्याने १७४० ते १८०० पर्यंत मराठी राज्यासाठी अतोनात कष्ट घेतले. अनेक लढायांमध्ये ते आघाडीवर होते. ६० वर्षांच्या कारकीदींत या घरण्यातील तीस कर्ते पुरुष धारातीर्थी पडले.
रघुनाथराव व माधवराव पेशवे यांच्या भांडणामुळे पटवर्धन घराण्यास काही काळ प्रतिकूल गेला. रघुनाथरावाने पटवर्धनांच्या मुख्य ठिकाणावर म्हणजे मिरजेवरच चढाई केली. याचा तात्कालिक परिणाम म्हणजे गोविंदरावाचा मुलगा गोपाळराव निजामाकडे गेला. परंतु पुढे माधवराव पेशव्यांनी पटवर्धनांना आपल्या बाजूस वळवून घेऊन राक्षसभुवन येथे निजामाचा पराभव केला.
पेशव्यांनी पटवर्धनांना २५ लाखांचा सरंजाम आणि त्यासाठी मिरज व तुंगभद्रा-कृष्णेमधील प्रांत दिला आणि ८,००० घोडदळ सरकारी तैनातीत ठेवण्याची आज्ञा केली. गोविंदरावाचा मुलगा गोपाळराव आणि रामचंद्ररावाचा मुलगा परशुरामाभाऊ हे आपल्या वडिलांसारखेच शूर व कर्तबगार निघाले. माऊंनी तासगाव येथे आपले वास्तव्य कायम केले.
पटवर्धनांना मोठा सरंजाम मिळाल्यामुळे त्यांचे राजकीय महत्त्व वाढले. कर्नाटकातील हैदर व टिपू यांच्या विरुद्ध झालेल्या लढायांचा सर्व भार त्यांच्यावरच होता. ती कामगिरी पार पाडून त्यांनी कर्नाटक आपल्या ताब्यात ठेवले. १७७१ साली हैदरविरुद्ध झालेल्या स्वारीत गोपाळराव यांना मृत्यू आला व पुढे काही दिवसांतच गोविंदरावही मरण पावले.
नारायणरावाच्या वधानंतर पटवर्धनांनी सवाई माधवरावाची बाजू उचलून घरली. गुजरातच्या स्वारीत गोविंदरावा यांचे  दुसरे  चिरंजीव वामनराव हरिपंत फडक्यांबरोबर होते. ते १७७५ मध्ये मरण पावले.
गोविंदराव यांचा तिसरा मुलगा यास सरंजाम देऊन कर्नाटकात हैदरविरुद्ध पाठविले. १७७७ च्या सावशीच्या लढाईत ते गंभीर जखमी झाले. या लढाईत पटवर्धनांची फारच हानी झाली. पटवर्धनांपैकी कुरुंदवाडचे कोन्हेरराव पडले आणि गोविंदरावाचा तिसरा मुलगा पांडुरंगराव, शीपतराव व वासुदेवराव यांना कैद झाली.

चिंतामणराव यांच्या नावे १७८३ मध्ये सरंजाम दिला गेला. १७९०-९१ मध्ये टिपूविरूद्ध ढालेल्या लढाईत परशुरामभाऊ यांना महत्त्वाचे स्थान होते. १७९५ च्या खर्ड्याच्या लढाईत चिंतामणराव हजर होते, तर विठ्ठल घोंडो याने खूपच मोठा पराक्रम केला. दुसऱ्या बाजीरावाने पटवर्धनांचा अनन्वित छळ केला. परशुरामभाऊंना कैदेत टाकले; परंतु पटवर्धनांनी मराठी राज्याच्या सेवेत कोणतीच कसूर न करता आपले प्राण वेचले. खडकीच्या बाजीराव-इंग्रज लढाईत (१८१७), तसेच कोरेगाव व अष्टी या लढायांत (१८१८) पटवर्धनांनी भाग  घेतला होता. १८१८ नंतर त्यांनी इंग्रजांचे मांडलिकत्व पतकरले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...