खंडोजी खोपडे अफजलखानास जाऊन मिळाला म्हणून छञपती शिवाजी महाराजांनी उजवा हात व डावा पाय कलम करण्याची शिक्षा फर्मावली.
खंडोजी खोपडे हे रोहिडाखोऱ्यातले एक देशमुख होते. सन १६५९ च्या अफजलखानाच्या स्वारीत त्यांनी आदिलशाही फर्मानाप्रमाणे त्यांच्या सैन्यात सामील होऊन छञपती शिवरायांच्या विरोधात तलवार चालवली होती. अफजलवधानंतर छञपती शिवरायांना ह्या प्रकरणात लक्ष घालायला सवडच झाली नव्हती. त्यानंतर सिद्दीच्या वेढ्यात चार महिने गेले. शिवराय जेव्हा राजगडावर परतले तेव्हा आता शांत बसुन चालणार नाही हे खंडोजीला जाणवले. त्याबरोबर त्यांनी त्यांचा जावई व छञपती शिवरायांच्या सैन्यातला विश्वस्त सरदार हैबतराव शिळीमकर, ह्यांच्याकडे धाव घेतली. हैबतराव जरी छञपती शिवरायांच्या विश्वासातले असले तरी छञपती शिवरायांकडे थेट जाऊन खंडोजीसाठी अभय मागण्याइतकी त्यांची पोच नव्हती. त्यामुळे ते कान्होजी जेध्यांकडे गेले व आपले गाऱ्हाणे मांडले. कान्होजीने शिवरायांना आग्रह केला व त्यानुसार शिवरायांनी खंडोजीला अभय दिले. त्यानंतर खंडोजी राजगडावर रीतसर हजेरीसाठी जायला लागले. एकदा नेहेमीप्रमाणेच ते गडावर गेले व छञपती शिवरायांना मुजरा केला. अचानक छञपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांना खंडोजीला धरुन त्याचा उजवा हात व डावा पाय कलम करण्याचा आदेश दिला. छञपती शिवरायांच्या विरुद्ध जाणाऱ्या लोकांना ही एक चेतावनी होती. ह्यात महत्वाचे म्हणजे छञपती शिवरायांनी कान्होजीला दिलेला शब्दही पाळला व अशा विश्वासघातकी लोकांना मोकळीक मिळणार नाही हे देखिल पाहिले. जर कोणी अपकृत्य केले तर त्याला लगेच त्याचे परिणाम भोगावे लागत. तो छञपती शिवराय म्हणत असे की राज्यकर्त्याने अपराधाकडे कधीही, विशेषकरुन जर ती अपकृत्ये त्याच्या अधिकाऱ्यांनी केली असतील तर, दुर्लक्ष करु नये. तसे केल्यास त्या अपराधाला राज्यकर्त्याची सहमती आहे असेच समजले जाईल.
संदर्भग्रंथ
राजा शिवछत्रपती, पृष्ठ ३३०-३३४
शिवाजीची राजनीति, पृष्ठ ९१
No comments:
Post a Comment