विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 7 July 2020

मराठेशाहीतील व उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध बारभाईंच्या कारस्थानचे मुख्य कारभारी "नाना फडणवीस"

मराठेशाहीतील व उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध बारभाईंच्या कारस्थानचे मुख्य कारभारी  "नाना फडणवीस"

        

मराठेशाहितील व उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध असे बारभाईंचे कारस्थानाचे मुख्य कारभारी "नाना फडणवीस" हे होते. खुप कमी लोक असतील ज्यांना या कारस्थाना बाबत ठाऊक नाही याचे दोन प्रमुख कारभारी म्हणजे "सखाराम बापु बोकील व नाना फडणवीस" हे दोन्ही म्हणजे पेशवाईतील "साडेतीन शहाण्यांपैकी दोन शहाणे बापु पुर्ण व नाना अर्धे शहाणे".... बारभाईंच्या या कारस्थानामुळे राघोबादादांसारखे मुत्सद्दी व्यक्ती पेशवाईची गादी बळकाऊ शकले नाही व सवाई माधवराव पेशवे तर जन्माला येण्या अगोदर यांनी त्यांना पेशवे केले व जन्मानंतर अधिकारीक रित्या त्यांच्या नावाने कारभार सुरु केला.. नानासाहेबांच्या तालमीत तयार झालेले "नाना फडणवीस" म्हणजे "बारभाईंच्या कारस्थानाचे प्रमुख कारभारी व पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे" उत्तर पेशवाईतली सर्वात हुशार व मुत्सद्दी व्यक्ती "नाना फडणवीस," यांच्या नंतर दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळात "त्रिंबकजी डेंगळे"  हे त्यांच्या हुशारी मुळे "दुसरे नाना फडणवीस" म्हणून ओळखू जाऊ लागले.

संदर्भ:-  पेशवाई- कौस्तुभ कस्तुरेNana Fadnavis - YouTube

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...