विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 August 2020

छत्रपती

 

छत्रपती घराण्याला “



छत्रपती” हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर मिळालेला एक सन्मान आहे त्याच प्रकारे शहाजी राजे यांचे कारकीर्दित महाराज हा बहूमुल्य किताब शहाजी राजे भोसले यांना मिळाला होता.
पादशाह (बहादुर निज़ामशाह) मृत्यु नंतर शके १५४१ म्हणजेच इ.स. १५९९ मध्ये पादशहाची दोन मुले होती एक आठ वर्षें व एक सहा वर्षें ही मुले लहान असल्याने मुलांची आई बेगम साहिबा ने कारभारी कोण करावा या बाबत सर्व मनसबदार बोलावून मसलत केली त्या वेळी शाबाजी अनंत ज्यांस चतुर संबोधले जाई त्यांनी शहाजी राजे हे बुध्दिवान, शुर मर्द, द्रव्याढ्य आहेत सर्व गुणसंपन्न आहेत त्यांना वज़ीराची वस्त्रे द्यावीत ते निज़ामशाही(पातशाही) जतन करतील असे सुचवले व अर्ज़ केला याला बेगम साहिबा यांनी फ़ार उत्तम म्हणून हेच कर्तव्य सिध्दांत करून म्हणून शहाजी राजे यांना वज़ीराची वस्त्रे देव सन्मान देवून पादशहाजादे मुर्तज़ा निज़ाम शाह यांस शहाजी राजे यांचे मांडीवर बसवले. या नंतर शहाजी राजे सर्व पादशाही दौलतीचा कारभार शबाजी चतुर व बेगम यांचे अनुमतीने चालवू लागले व राजे हा कीताब होताच तो ‘महाराज’ म्हणून पत्रव्यवहार करू लागले. परंतू राजकारणास्तव हिंदू राजा वजीरीची वस्त्रे घेवून महाराजा बनला आहे हे मुस्लिम सरदार व आदिलशाह तसेच मुघलांना न पचणारे होते. मलिक अंबर यांचा मृत्यु शके १५४८ म्हणजेच इ.स.१६२६ मध्ये झाल्याने शहाजी महाराज व शबाजी चतुर यांचेच वर्चस्व होते हे वर्चस्व मलिकअंबर यांचा मुलगा फत्तेखान याला सहन न झाल्याने स्वत:ला वजिरी मिळावी या हेतूने जाधवराव मंडळींच्या पुर्ववैमनस्याचा फ़ायदा घेत शहाजी महाराज यांचे विरोधात कटकारस्थान सुरू केले. यांच वेळी शाहजहानने १६३६ मध्ये निज़ामशाही खालसा केली या मध्ये शहाजी महाराजांनी आदिलशाही स्विकारली त्या मुळे त्यांना ‘सरलष्कर’ व ‘महाराज’ या पदव्यांनी गौरवण्यात आले . सोबतच पुणे -सुपे ही जहांगीरी ही तशीच ठेवण्यात आली पुढे शहाजी महाराजांनी प्रदेश विस्ताराचे धोरण अंगीकारून आपले वर्चस्व वाढविले त्या मुळे इ.स. १६३७ मध्ये महंमद आदिलशहाने कर्नाटकात जहांगीरी देवून शहाजी महाराजांची कर्नाटक मध्ये रवानगी केली. तेथे त्यांनी पेनुकोंडे, बसवपट्टनम्, होपेस्ट,बिदनूर,श्रीरंगपट्टनम व इतर ठीकानच्या पाळेगारंविरूध्द मोहीमा आखून तो प्रदेश आदिलशाही मध्ये आणला या सन्मानार्थ शहाजी महाराजांना इ.स. १६४८ मध्ये बेंगलोर ची जहागीरी व ‘महाराज’ सोबत ‘महाराज फर्जंद’ हा कीताब देण्यात आला.
छत्रपती हा विशेष कीताब शिवाजी महाराजांनंतर ही चालत राहीला त्याच प्रमाणे ‘महाराज’ हा ही कीताब आजही छत्रपती घराणे बाळगते.
साभार- golden history of maharashtra

भोसले घराण्याची वंशावळ.

 


भोसले घराण्याची वंशावळ...
आनंद घोरपडे आपल्या पुस्तकात लिहितात " अल्लाउद्दीन खिअलजीने ज्यावेळी इ.स.१३०३ मध्ये चित्तोडवर स्वारी केली, तेव्हा झालेल्या लढाईत राणा लक्ष्मणसिंह ठार झाला. राणी पद्मिनीने इअतर राजस्त्रीयांसहीत आत्मत्याग केला.लक्ष्मणसिंहाचे सात मुलगे या लढाईत ठार झाले. आठवा मुलगा अजयसिंह चित्तोडच्या गादीवर आला. अजयसिंहाला सजनसिंह आणि क्षेमसिंह असे दोन मुलगे होते. एका लढाईत दोघांनाही आलेल्या अपयशामुळे रागावलेल्या अजयसिंहाने पुतण्या हमीरला गादीवर बसवले. त्यामुळे नाराज होऊन हे बंधू इ.स.१३२० च्या सुमारास मेवाड सोडुन दक्षिणेकडे आले. सजनसिंह आणि त्याचा पुत्र दिलिपसिंह यांनी बहामनी राज्याची स्थापना करणार्या हसन गंगू बहामनी यांच्याकडे नोकरी पत्करली. याच दिलिपसिंहापासूनच्या १२व्या पिढित (सन १५३३) बाबाजी यांचे पुत्र मालोजी हे जन्माला आले. मालोजी हे शहाजी राजांचा जन्म झाला. दिलिपसिंहाच्या नातवाचे नाव 'भोसाजी' असे होते. याच नावामुळे पुढे हा वंश भोसले म्हणुन ओळखला जाउ लागला असे काही जाणकार मानतात.
काही इतिहासकरांच्या मते भोसले हे नाव 'भूशल' पासुन पडलं अस्ल्याचं अधिक संभवनीय वाटतं. त्यांच्या मते 'भूशल' चा एक अर्थ 'भूतलावरील शस्त्रधारी' म्हणजेच 'क्षत्रिय योध्दा' असा आहे. त्यामुळे भूशलचे वंशज हे भौषल, भौसल, भोसल, भ्सला, भोसले अशी भोसले या शब्दाची परंपरासिद्ध, इतिहास सुसंगत व्युत्पत्ती ठरते.
पण हे भोसले घराणे चित्तोडच्या राजपुत सिसोदे वंशातील अस्ल्याची वंशावळ उपलब्ध आहे. तसेच खुपशा जुन्या कागदपत्रांमध्ये शहाजीराजे आणि शिवाजी राजांचा उल्लेख राजपुत म्हणुन केल्याची नोंदही मिळते.
हे झाले आनंद घोरपडे यांच्या पुस्तकाबाबत. प्रा. रा आ. कदम यांनी तर आपल्या पुस्तकात सजनसिंहापासुनची वंशावळच दिली आहे. तीच सर्वापर्यंत पोहोचवण्यासाठी हा खटातोप मी केला आहे.
_____________________________
वंशावळ
१. सजनसिंघ
२. दिलिपसिंघ
३. सिंघजी
४. 'भोसाजी'
५. देवराज
६. इंद्रसेन
७. शुभकृष्ण
८. रुपसिंघ
९. भुमिंद्र
१०. धापजी
११. बरहटजी
१२. खेलोजी
१३. कर्णसिंघ
१४. संभाजी
१५. बाबाजी
१६. मालोजी
१७. साहजी
१८. शिवाजी राजे
१९. संभाजी राजे
संदर्भ - सिद्धांत विजयः पृष्ट ८४-८५)
साभार- Golden history of marathas

Wednesday, 26 August 2020

|| उत्तरेतील झंजावत श्रीमंत महाराज महादजी शिंदे ||

 


|| उत्तरेतील झंजावत श्रीमंत महाराज महादजी शिंदे ||
अठराव्या शतकाच्या पूर्वधात भरताता मराठ्यांचे साम्राज्य निर्माण झाले.त्याच्या रक्षणाची व्यवस्थ छत्रपती शाहू महाराज यांनी मोठ्या दूरदृष्टिने केली.
सरखेल अंग्रे(कोकणपट्टी),
सरदार गायकवाड़(गुजरात),
सरदार होळकर(इंदूर-मालवा),
सरदार पवार (धार-मालवा),
सरदार शिंदे(उज्जैन ग्वाल्हेर- मालवा),
सरदार खेर(सागरप्रांत-बुंदेलखंड)
सेनासाहेब सुभा भोसले(नागपुर -वर्हाड)
सरदार फत्तेसिंह भोसले(अक्कलकोट)
सरदार पटवर्धन(कर्नाटक सीमा)
आशा प्रकराचे सराजमे देवून मराठा दौलतीचे रक्षण व्हावे,अशी योजना करण्यात आली...
छत्रपती शाहु महाराजांनी जे नवे सरदार पुढे आनले त्यापैकी मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे प्रमुख होते.
राणोजीराव शिंद्याच्या चार पुत्रानी जय्यापाराव,ज्योतिराव,दत्ताजीराव तुकोजीराव आणि जनकोजी(नातू) एका मागून एक असे मराठा साम्राज्यासाठी आपले बलिदान दिले,
इतके करुणही पनिपतावर रणदेवता मराठ्यांना प्रसन्न झाली नाही. अपरित हानी झाली.शिंदयांचे वारस म्हणून शिंदयांची दौलत पुन्हा उभी करण्याचे आणि उत्तरेत मराठा राज्याची गेलेली पत पुन्हा निर्माण करण्याचे अत्यंत बिकट कार्य नियतीने महादजींच्या पदरात टाकले.
असे असूनही पानीपतानंतर पुढची सात आठ वर्षे पेशव्याच्या घरातल्या अंतर्गत राजकरणाचा परिणाम म्हणून महादजींना सुभेदारी मिळू शकली नाही.वनवासात सिंहासन घडत असते या नियमानुसार या सात वर्षाच्या राजकीय विजनवसातच महादजीच व्यक्तिमत्व.नेतृत्वगुण यांचा कस लागून ते बावनकशी सोने असल्याचे सिध्द झाले.याच कालखंडात त्यांनी जी माणसे जोडली ती आयुष्यभर त्यांच्याशी एकनिष्ठ राहिली..
पुढे सुभेदारी मिळाल्यानंतर *महादजींनी सगळा हिंदुस्थान आपल्या पराक्रमाने उजाळुन टाकला.त्यांनी दिल्ली पुन्हा झींकुन रोहिल्यांचा पूर्ण पराभव केला.पनिपताचा सूड पुरेपुर उगवला.त्यानंतर शहाआलम बादशहाला दिल्लीच्या गादिवर बसवून उत्तरेत मराठ्यांचा दबदबा पुन्हा निर्माण केला....
परंतु जरा स्थिरस्थावर होते न होते तोच रघुनाथरावाच्या अततायीपनाने मराठा राज्यावर इंग्रजांचे संकट आले. या संकटाचा मराठ्यांनी यशस्वी मुकाबला केला आणि वडगावला इंग्रजांचा साफ पराभव केला,तो प्रामुख्याने महादजींच्या नेतृत्वाखाली..!!
या वेळे पर्यन्त इंग्रजांना भरताता पराभव माहित नव्हता.
वडगावची लढाई जर इंग्रजांनी जिंकली असती तर पुढे 1818 साली जे मराठ्यांचे राज्य बुडाले ते चाळीस वर्ष अगोदरच घडले असते. आशा युद्धात सेनापतित्वाचा खरा कस लागतो आणि यात महादजी अजेय ठरले.पानीपतावर गेलेली प्रतिमा मराठा राज्याने वडगावच्या लढाईत पुन्हा प्राप्त केली.पुढे सालाभाईच्या तहाने ती कायम प्रस्थापित झाली आणि अठरावे शतक संपेपर्यन्त ती टिकून राहिली.
या कालखंडात मराठा साम्राज्य टिकले ते महादजी शिंदे यांच्या बुध्दिकौशल्य आणि रणकौशल्य यामुळेच
महादजी नुसतेच उत्तम सेनापती नव्हते तर पहिल्या प्रतिचे मुत्सुदी होते,याचे अनेक दाखले त्यांच्या चरित्रात सापडतात..
उत्तर हिन्दुस्थानत किती सत्तांना आपल्या क़ाबूत ठेवावे लागे त्यावर नुसती नजर टाकली तर आश्चर्य वाटते-मुग़ल,रोहिल,अवधचा नवाब,राजपूत,जाट,शिख,बुंदेले, इंग्रज इतक्या सत्तांना तोड़ द्यावे लागे.
हे सारे उत्तरेचे राजकारण महादजींनी सुमारे पंचवीस वर्षे एकहाती संभाळले आणि तेहि अत्यंत यशस्वीपणे हाच त्यांच्या बुध्दिकौशल्याचा पुरावा काहे ...!!
महादजींनी पानीपतावर जवळपास नामशेष झेलेले शिंदयांचे लष्कर पुन्हा उभारले इतकेच नव्हे , तर तत्कालीन भरतातले अजिंक्य सैन्य अशी प्रतिष्ठा त्याला प्राप्त करुण दिली.
मराठ्यांनी निजामाशी खरडा येथे मोठी लढाई दिली आणि ति जिंकली.ही मराठ्यांनी जिंकलेली अखेरची लढाई.
या लढाईच्या वेळी झाडून साऱ्या सरदरांच्या सरंजामी फौजा गोळा करण्यात आल्या होत्या.पण शिंदयांच्या फौजेखेरिज नवाबाशी लढाई करणे नानाना शक्य वाटेना म्हणून त्यांनी उत्तरेतुन शिंदयांची कवायती व इतर फ़ौज बोलवली आणि पुढे याच फौजेने यूध्दाला निर्णायक कलाटनी दिली.
*या युद्धाच्या वेळी इंग्रजांचा वकील मँलेट हा मराठ्यांच्या छावनीत होता.त्याने तेथून एक खलीता आपल्या सरकारला लिहिला त्यात तो म्हणतो महादजी शिंध्यानी डी बॉय कवायतीचे कुठेच तोड़ नाही,कवायातीतला ज्या प्रमाणे आपल्या सरकरातिला क्वायतीस सुख सुविधा असून सुद्धा आपल्या वाद आहेत,या पैकी कोणतीही सोय सुविधा नसून देखील महादजीची कवायती फ़ौज ही अजिंक्य आहे
ज्या इंग्रजांनी कवायती पलटनीच्या जोरावर सारा भारत जिंकला ,त्याच इंग्रजांनी महादजीच्या कवायती पलटनीना दिलेले हे शिफारस पत्र पाहिले म्हणजे महादजींचा कर्तुत्वाची ओळख पटते.
प्रत्येक मराठ्याची मान अभिमानाने ताठ व्हावी अशी गोष्ट आहे.
महादजींचे व्यक्तिमत्व बहुरंगी होते,ते पराक्रमी योध्दे,उत्तम सेनापती प्रजा दक्ष राजा,कसलेले मुत्सुदी तर होतेच पन ते स्वतः भक्ति पर रचना करत आणि त्या स्वतः म्हणत असत
माधव - विलास* नावाचा भक्ति पर रचनांचा संग्रह त्यांनी लिहिला.....
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
जय महादजी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

सर्वोभौम भारतवर्ष मराठा सम्राट छत्रपती शाहुजीराजे

 


सर्वोभौम भारतवर्ष मराठा सम्राट छत्रपती शाहुजीराजे
छत्रपती संभाजी महाराजानंतर मराठा स्वराज्या विस्तारक छत्रपती शाहू महाराज आसेपर्यंत कोणालाही छत्रपतीविरुध्द कारस्थान करण्याचे धाडस झाले नाही.छत्रपती शाहू महाराजांनी अखंड मराठा सम्राज्यावर नियंत्रन मिळवले.
१७१८ मधे शाहू महाराजांनी ३५ हजार मराठा सैनिक घेऊण सरसेनापती खंडेराव दाभाडे यांना दिल्ली मोहिमेवर पाठवले,सर्व नियोजन केले.मुघलाकडील हसन आपल्याकडे वळवले.तत्कालीन बादशाहा फारुखशयर याने हुद्दाम वागणूक दाखवली.त्यामुळे शाहूनीतीप्रमाने बादशाहा फारुखशायरचा दरबारातच हसन बंधूकडून कत्ल केले गेले.मराठ्याच्या मर्जीतील बादशाह दिल्लीच्या तख्तावर शंभूपुत्र शाहूराजेनी बसवला,आपल्या मर्जीप्रमाने तह करुण घेतले,आपला संपूर्ण परिवाराची शाहूछत्रपतींनी सुटका करवून घेतली, दिल्ली मराठ्याची मांडलिक झाली,बादशाहाला सुरक्षा मराठ्यानी दिली .'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' ही म्हण खऱ्या अर्थानी नावारुपाला आली असे म्हणले तर अतिशयोक्ति होणार नाही.
या संपूर्ण घटनाक्रमामधे काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.दिल्लीसारख्या मोठ्या मोहिमेचे नियोजन स्वत: शाहू महाराजांनी केले होते.दिल्ली मोहिमेचे नेतृत्व सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्याकडे देण्यात आले होते.सरसेनापती खंडेराव दाभाडे हे पहिले मराठा सेनानी दिल्लीवर चाल करुण जाणारे होत.दूसरी महत्वाची घटना सर्व अगदी शाहू महाराजांच्या मर्जीप्रमाने झाल्यावर तहाचा कागद देऊण सरकारकून बालाजी विश्वनाथला पुढे पाठवले आणि नंतर मराठा सैनिकासह खंडेराव दाभाडे आले.येथे मात्र कागद घेऊण येणाऱ्याला सर्व श्रैय देऊण टाकण्यात येते,शाहूछत्रपतीना डावलण्यात येते.
१७१८ नंतर शाहूछत्रपतीवर कसलाही मुघलाचा दबाव राहिलेला नव्हता मुत्सद्देगीरी दाखवत त्यांनी दिल्लीचे तख्तच मांडलिक केले होते.सर्व छत्रपती परिवाराची सुटका केली होती त्यामुळे पुढील काळात रायगड मोहिम वारना तह यासारख्या अभूतपूर्व मोहिमा ईतरही अनेक मोहिमा केल्या.मराठा स्वराज्याचा भगवा भारतभर फडकवला.
अखंड भारतावर ४२ वर्ष राज्या केले.शाहूछत्रपतीची प्रशासकिय व्यवस्था खुप महत्वपुर्ण होती,मराठा प्रशासकीय व्यवस्था आणि मुगली प्रशासकीय व्यवस्थाचा एकत्रीत प्रभाव त्यामधे होता.त्यानूसार त्यांनी मुत्सद्देगीरीच्या जोरावर भारतावर नियंत्रन मिळवले होते.१०० मईलाच्या आंतरावर एक एक मराठा गढी होती तर उत्तरेकडे सुभेदार शिंदे ,होळकर,पवार सारखे अभेद्या भुरुज बसवले होते.पुर्वेकडे सेनासाहेब सुभा रघोजी भोसले सारखा ५० हजाराची मनसब आसलेला महापराक्रमी महाप्रतापी साक्षात तांडव करणार शिव होता.पुर्वेकडे रघोजी भोसलेनी बंगालपर्यंत शाहूछत्रपतीच्या नेतृत्वाखाली मराठ्याची घोडदौड केली.
मराठा आरमार सरखेल आंग्रे यांनी शाहूकाळात उत्तमप्रकारे वाढवले समुद्रावर मराठ्याचे वर्चस्व कायम राखले.गुजरातकडे सरसेनापती दाभाडे आणि गायकवाड यांनी शाहूछत्रपतीच्या नियंत्रनाखाली आनले.शाहू महाराज प्रतेक मोहिमावरील माहिती घेत त्यानूसार गरज पडेल तेथे हूजूराती फौजा सरसेनापती,प्रतिनिधी,प्रधान यांच्या नेतृत्वाखाली पाठवत.
१७-१८ शतकात शाहूछत्रपती भारतवर्षाचे हिंदूनृपती झाले होते.त्यांनी अजातशत्रू वृत्तीने कार्य केले.सातारा राजधानीतून भारताचा कारभार पाहिला.भारताची राजधानी म्हणुन व्यापर वृध्दि,आनेक सावकाराना सातार्यात बोलवून,लोकहिताची कामे करुण साताऱ्याला वैभव प्रप्त करुण दिले.
छत्रपती संभाजी महाराजानंतर मराठ्याची नीति बदलली होती.मुघलाकडील जिंकलेला प्रदेश सरंजाम म्हणुण देण्याची पध्दत सुरु झाली होती.सरदेशमुखी आधिकार छत्रपतीकडे होता.मराठा सम्राज्या राजारामकाळात वाढू लागले होते.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तर त्याचा वेग वाढला.त्यामुळे छत्रपतीना मोहिमेवर जाण्याचा गरज पडत नसे.शाहूछत्रपतीच्या हाताखाली लहान मोठ्या ५०० च्या आसपास सेनापती,सरदार,सरकारकून होते.तरी शाहूछत्रपती काही मोहिमेवर जातीने हजर होते तर काही मुख्य मोहिमाचे त्यांनी स्वत: नियोजन केले होते.त्यामधे दिल्ली मोहिम,रायगड मोहिम आणि वारणेच्या तहावेळच्या वारणेची मोहिम होय.
छत्रपती शाहू महाराज म्हटलं कि आजही बहुसंख्यक लोकांना माहिती नाही.बहुसंख्यक लोकांना कोल्हापुरचे शाहू राजर्षि आठवतात,ऐवढे कमी होते म्हणुन कि काय काही ईतिहासकारानी शाहूछत्रपतीचा कार्यकाळच पेशावाई म्हणुन घोषित केला त्यासाठी युक्तीवादही खुप पोरकट केला आहे .शाहूछत्रपतीचा कालखंड मोठा आहे म्हणुन तो प्रधानाच्या नावानी विभाजित केला असे देतात.अकबर औरंगजेबाचा कालखंड मोठा आहे तो वजिराच्या नावानी विभागूण मांडण्याची चेष्टा कोणी करणार आहे का ? खरच धन्य ते राजवाडे-सरदेसाई सर !खंतपुर्वक मत मांडावे लागतेय .
एक गोष्ट मला खुप गोंधळात पाडते नक्की शंभूपुत्र शाहू महाराज दूर्दैवी आहेत कि या महाराष्ट्रातील फक्त महाराष्टेरातीलच नाही तर या भारतातील लोक दूर्दैवी आहेत.एवढा मोठा राजा या महाराष्ट्राच्या भूमित जन्माला आला हि साधी गोष्ट नाही.आजच्या घडीला मात्र तो खोल दरित ढकलून दिलेला आहे आणि त्यावर पिशवाईशाही घोडे नाचवले जात आहेत.
७ वर्षाचे वय शाहूराजेचे होते जेव्हा ते रायगड तहानंतर औरंगजेबाच्या राजकिय कैदेत सापडले.महाराणी यसूबाई सरकार जिजाऊ आऊसाहेब झाल्या.त्यांनी संस्कार केले .औरंगजेबी धर्मपरिवर्तनाच्या चक्रातून सोडवले.त्या कोवळ्या युवराज्याच्या सुटकेसाठी प्रतापराव गुज्जरांच्या दोन्ही पोरांनी मोठा त्याग केला किती ती स्वामीनिष्ठा.सुटून आले हक्कासाठी शुन्यातून लढवावे लागले.छत्रपती शिवाजी महाराजापाठीमागे तरी शहाजीराजासारखा महाबली होता.मात्र शाहू महाराजांच्या पाठीशी पुर्वजांचा वारसा आणि शिकवन आणि मुघली व्यवस्था जवळून आनूभवली या व्यतिरिक्त काही नव्हते.
१७ वर्षाच्या कैदेनंतर भारतभर मराठा साम्रज्याचा विस्तार करतो,नवी प्रशासन आणि मुलकी व्यवस्था आंमलात आणतो आणि संपूर्ण भारतावर ४२ वर्ष राज्य करतो ही काही साधी गोष्ट झाली नाही.शाहूछत्रपतीनंतरही मराठा लढत होता कारकूनी कारस्थाने होत होते तरी तो शतकभर वर्षे टिकून होता.ईंग्रजांना शाहूछत्रपतीच्याच सेनानाईक सरदाराबरोबर निकराचा लढा द्यावा लागला.बहूतेक वेळा हारही पतकारावी लागली ही पुण्याई आणि पाठबळ त्याच पुण्याश्लोक राजाचे होते.
टिप- बाकी पिशवाई भटशाही आणि सरदारशाहीचा कितीही डंका वाजवला तरी तुम्हचा पालनहार बाप शाहूराजा आहे हेच अंतिम सत्य आहे.मुळात तुम्हच्या सर्वांचा निर्माता भाग्यविधाता तोच आहे तुम्ही मात्र त्याच्या मृत्यनंतर सर्वच विसरुन गेलात आणि आज त्यालाही झाकण्याचा प्रयत्न करताय.
कधीतरी वाटतं एखदा शाहूप्रेमी हॉलिवुड/बॉलीवुड बिग बजेट बिग थिममधे जेव्हा मराठा विस्तारक भारतवर्ष सम्राट राजा शाहूछत्रपतीवर चित्रपट निर्मिती करीन आणि अल्पावधीत जगभर त्या राजाचे नाव जाईल तेव्हा काय नजारा आसेल अखंड भारत त्या पुण्याश्लोक राजापुढे नतमस्तक होईल .
शाहू महाराज हे हिंदूस्थानचे राजे झालेले आहेत त्यांच्या विरोध्दात जायचे म्हंजे संपूर्ण हिंदूस्थानच्या विरोध्दात जाणे होय - पोर्तूगीज
जय शहाजीराजे
जय शिवराय
जय शाहूराजे
साभार —मिनीनाथ रावसाहेब गेरंगे पाटिल

छत्रपती थोरले शाहू महाराज

 


छत्रपती थोरले शाहू महाराज - 
महाराष्ट्राच्या मराठा राज्याच्या पराक्रमी व्यक्तींची आत्माहुती पडल्यानंतर नेतृत्व नसलेल्या जहाजा सारखी महाराष्ट्राची स्थिती झाली होती. अशावेळी समर्थपणे या नेतृत्वहीन राज्याचे नेतृत्व शाहू महाराजांनी आपल्या हाती घेतले व त्याला योजकतेने मार्गाला लावले. रणांगणावरील हातघाईशी महाराजांचा संबंध जास्त आला नाही परंतु गरूडाच्या पारखी आणि धुर्त नजरेतुन त्यांनी राज्यव्रुद्धी साठी एक एक मोहरे पारखून मराठा राज्याच्या उत्कर्षाला चालना दिली. राज्य चालवायचे असेल तर त्याला एका दिशेची आवश्यकता असते. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्रात एवढी जरब ठेवली होती की, ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. त्यांचा शब्द अखेरचा असे. आपल्या शब्दाबाहेर जाणार्यांची ते गय करीत नसत आणि याच भावनेतून पुरंदर्यांनी वेळोवेळी पत्र पाठवून महाराजांशी संपर्क साधीत जा अशी बाजीरावांना सक्त ताकीद दिली होती. महाराजांच्या या करारी स्वभावामुळे पेशव्यांना आपली मनमानी शेवटपर्यंत करता आली नाही.
थोरले शाहू महाराज हे सर्वांना छाया देणार्या वटवृक्षा प्रमाणे होते .
सर्वांशी स्नेह सलोखा ठेऊन त्यांनी नव्या उमद्या विचारांची माणसे जमविली. जी जुनी माणसे बाजुला पडली होती त्यांना अनुकूल करुन मानाची पदे दिली. जो शहाणा व पोक्त आहे त्याचा सल्ला घ्यावा, हा त्यांनी आपला धर्म मानला .
विश्वास टाकण्याजोगी जी माणसं होती त्यांना जवळ केले. जे व्यसनी , मादक द्रव्यांचे सेवन करणारे होते त्यांना दुर सारून प्रधान प्रतिनिधी आदी अष्टप्रधान व दरखदार यांच्या हातून कारभार चालवला. मराठा सरदारांच्या योग्यते प्रमाणे सरंजाम देऊन त्यांना शिपाई गिरीच्या कामास ठेवले . कारण साहस, बंधुभाव, आणि वीरवृत्ती हे सदगुण संधी मिळताच प्रकट होतात , विकास पावतात हे त्यांना चांगले ठाउक होते .
शाहु महाराजांनी देशातील मंदिरे यवनांच्या शिकंजातून मुक्त केली .
रामेश्वरादि अनेक पवित्र स्थाने मुक्त करुन स्थानिक लोकांच्या हाती त्यांचा कारभार दिला. व त्या वरील वसूल खंडणीच्या रूपाने जमा करण्याचा इंतजाम केला. रामेश्वरचा मुख्य पुजारी आजही महाराष्ट्रीयच असतो.
या तीर्थावर आजही मराठ्यांची कुटुंबे समर्थपणे वास्तव्य करुन असतात. ही सारी शाहु महाराजांची देणगी आहे .
असा थोर राजा आपल्या भुमित होऊन गेला हे आपले भाग्यच.
थोरल्या शाहू महाराजांनी आपल्या बुद्धी कौशल्याने बाजीराव व चिमाजी आप्पा या धोरणी बंधुंच्या सहकार्याने मध्य प्रदेशातील चंबळ प्रदेशा पर्यंतच्या प्रदेशावर स्वारी करून आपला साम्राज्य विस्ताराचा संकल्प सोडला .
हे सर्व करित असताना लगाम आपल्या हाती ठेवून महाराष्ट्राच्या सीमेचे विस्तारण पेशव्यांच्या माध्यमातून करुन घेतले . शाहु महाराजांचा पेशव्यांवर वचक होता . प्रसंगी पेशव्यांना नेतृत्व हीन करूनही त्यांची महाराजां वरील श्रद्धा कमी झाली नाही. हे सारे वैभव व आपल्या विरश्रीला मिळालेले उत्तेजन शाहु महाराजांमुळेच मिळाले आहे अशी त्यांची भावना होती. या श्रद्धे पोटीच महाराजांचे जोडे नानासाहेब पेशवे आपल्या देव घरात ठेवून त्यांची पुजा करत असत.
एक उदात्त , व सर्वांवर उदार अंत: करणाने प्रेम करणारा हा राजा होता.
__/\__ थोरले शाहु महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा

छत्रपती शाहू आणि सातारा गादीची स्थापना.

 

छत्रपती शाहू आणि सातारा गादीची स्थापना.
postsaambhar ::

अजय अरूण शिंदे, त्र्यंबकेश्वर.
मित्रांनो आज आपण स्वराज्याचे पाचवे छत्रपती, शाहू महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेऊ. त्यांच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) हे मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले होते.
शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू व छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र होते. त्यांचा जन्म १८ मे १६८२ रोजी कोकणात गांगोली येथे झाला. त्यांचे जन्मनाव त्यांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून शिवाजी असं ठेवलं होतं मात्र पुढे त्याचा मुघली अपभ्रंश होऊन ते शाहू असं बोललं जाऊ लागले.
शाहू महाराज लहानपणापासून दुर्देवी होते. त्यांच्या जन्माच्या वर्षी औरंगजेबाने स्वराज्यावर सर्वशक्तीनिशी आक्रमण केले व छत्रपती संभाजी महाराज सात वर्षे सलग युद्धमग्न राहिले. हा कालावधी शाहू महाराजांच्या जीवनातील अत्यंत अस्थिर काळ होता. त्यांची माता महाराणी येसूबाई साहेब यांनी त्यांच्या पालनपोषणात कोणतीही कमतरता येऊ दिली नाही तरीही संभाजी महाराजांप्रमाणे शाहू महाराजांनाही पित्याचा सहवास असा मिळालाच नाही. शंभूराजे औरंगजेबाच्या हातून मारले गेले व लागलीच रायगडासारखा बुलंद किल्ला फितूरीमुळे मुघलांच्या हाती पडला. महाराणी येसूबाई साहेब यांनी धिरोदत्तपणा दाखवून राजाराम महाराज जे शंभूराजांच्या मृत्यूनंतर मंचकारोहण करते झाले होते त्यांना जिंजीला धाडले व झुल्फिकारखानासोबत करार करून स्वत: आणि छोट्या शाहूस मुघलांच्या ताब्यात दिले. औरंगजेबाने जरी मायलेकांना काही उघड उघड त्रास दिला नाही तरी शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतच होते. त्यांना जरी कोणत्याही प्रकारचे मुस्लिम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला नाही तरी एका मराठा राजपुत्राला मिळणारं शिक्षणही त्यांना मिळू शकलं नाही. अशा परकीय सत्तेच्या नजरकैदेत असणाऱ्या शाहू महाराजांच्या सुटकेसाठी छत्रपती राजाराम महाराजांनी आकाश पाताळ एक केले. त्यांनी साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतींचा वापर केला. राजाराम महाराजांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही मात्र तरीही त्यांनी अखेरपर्यंत आशा सोडली नाही. एकदा संताजी घोरपडे व त्यांच्या तुकडीने औरंगजेबाच्या तंबूपर्यंत छापा मारला मात्र शाहू महाराज त्यावेळी तेथे नव्हते.
असो अशाप्रकारे या छावणीतुन त्या छावणीत असा सुमारे अठरा वर्षे औरंगजेबाच्या सैन्यासोबत शाहू महाराजांचा प्रवास होतच राहीला. या काळात औरंगजेबाने शाहू महाराजांचे दोन विवाह करवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झुल्फिकारखानाच्या सल्ल्यावरून आझमशाहने शाहू महाराजांना मुक्त केले मात्र त्यांच्या पायात काहीतरी खोडा असावा म्हणून राजमाता येसूबाई साहेब यांना मुघलांच्या ताब्यात ठेवून घेतले. लवकरच शाहू महाराज एलिचपुरास दाखल झाले व त्यांनी मराठा सरदारांना पत्रे पाठवून आपल्या बाजूने येण्याचं आवाहन केले. त्यांच्या बाजूने येणाऱ्या व्यक्तींमधे बाळाजी विश्वनाथ हा एक होता. त्याने आपली मुत्सद्दीगिरी पणाला लावून सेनापती धनाजी जाधव, सेनाखासकेल दाभाडे, सरखेल कान्होजी आंग्रे या शक्तीशाली सरदारांना शाहू महाराजांच्या बाजूला आणण्यात मोठी भूमिका बजावली. यामुळे त्याला शाहू महाराजांनी आपला दुसरा पेशवा बनवलं.
बाळाजी विश्वनाथ भट हा एक कार्यक्षम व्यवस्थापक होता. त्याने लवकरच दिल्ली दरबारी वजन असणाऱ्या सय्यद बंधूंशी जुळवून घेतलं व त्यांच्या मदतीने राजमाता येसूबाई साहेब यांना मुघलांच्या ताब्यातून परत साताऱ्यास आणलं. त्यानेच शाहू महाराज हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे एकमेव अधिकृत वारस आहेत अशा मुघल बादशाहच्या सनदा मिळविल्या. या सनदा म्हणजे शाहू महाराजांच्या शरणागतीचे नाही तर भविष्यात मराठा साम्राज्याचे अधिकृत प्रतिक असल्याचे निदर्शक होत्या कारण कसेही असले तरी मुघल अखिल भारतीय शक्ती होते व त्यांच्या सनदांमुळे भविष्यात मराठा साम्राज्यात कोल्हापूर सातारा या दोन गादींमळे होऊ शकणारी दुही टाळता येईल अशी आशा बाळाजी विश्वनाथ व शाहू महाराज या दोघांना होती.
१७२० मधे बाळाजीचा मृत्यू झाला व शाहू महाराजांनी त्याचा कर्तबगार मुलगा बाजीराव बल्लाळ यास पेशवा बनवलं. बाजीरावाने शाहू महाराजांच्या विश्वासाचं चीज केलं व मराठा साम्राज्याचा दक्षिणेत कावेरी पासून उत्तरेत गंगा यमुनेच्या खोऱ्यापर्यंत विस्तार केला. त्याने शाहू महाराजांच्या अनेक शत्रूंचा पराभव केला. त्याच्यात व शाहू महाराजांत अनेक वादही निर्माण झाले. त्यातील प्रमुख म्हणजे शनिवार वाड्याच्या कोटाचा वाद. बाजीरावाने पुण्यात बांधलेल्या वाड्यास कोट करण्याचे ठरविले मात्र शाहू महाराजांच्या दरबारातील लोकांनी याविरोधात सल्ला दिला व शाहू महाराजांनी बाजीरावास कोट न बांधण्यास सांगितले. बाजीरावानेही कोटाचे बांधकाम थांबवलं. पुढे हा कोट शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीरावाने बांधून पुर्ण केला. बाजीराव पेशवा मेल्यावर शाहू महाराजांनी त्याचा १९ वर्षांचा मुलगा बाळाजी बाजीराव भट यास पेशवा बनवलं.
बाळाजी बाजीरावाने आपल्या नेतृत्वाखाली बंगाल ओरिसा मधे अनेक स्वाऱ्या केल्या. त्यातून शाहू महाराजांच्या कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे नागपुरकर भोसले व शाहू महाराज यांच्यात मतभेद निर्माण झाले. बंगाल ओरिसा मधे स्वाऱ्यांचा अधिकार शाहू महाराजांनी रघूजी भोसले यांना दिला होता मात्र बाळाजी बाजीराव याच्या हस्तक्षेपामुळे भोसले नाराज झाले. मात्र शाहू महाराज या काळात स्वत:च्या प्रकृतीच्या व वारस नसल्याच्या काळजीने त्रस्त झाले होते यामुळे त्यांनी भोसले पेशवा वादात हस्तक्षेप केला नाही व त्याचा परिणाम म्हणून नागपूरकर भोसले हळूहळू मराठा सत्तेच्या परिघाबाहेर जाण्यात झाला. त्यांनी शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर प्रथम निजाम व नंतर इंग्रजांच्या मराठा साम्राज्याच्या विरूद्ध मोहिमांत भाग घेतला.
शाहू महाराजांनी आपल्या मृत्यूपूर्वी राजमाता ताराबाई यांचे पुत्र व कोल्हापूरचे भूतपूर्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र रामराजे यांना दत्तक घेतले. या दत्तकविधानावर राजमाता ताराबाई व पेशवा बाळाजी बाजीराव यांनी पुढील काळात सातारा दरबारात बरेच राजकारण केले. दोन्ही पक्षांना छत्रपती रामराजे आपल्याच नियंत्रणात असावे असे वाटत होते. यात पुढं पेशव्याच्या पक्षाचा विजय झाला व बाळाजी बाजीरावाने मराठा साम्राज्याचा कारभार त्याला सोयिस्कर असणाऱ्या पुणे येथे नेला. शाहू महाराज मराठा साम्राज्याचे शेवटचे सर्वशक्तीशाली छत्रपती होते. त्यांच्या मृत्यूनंतर साम्राज्याचे अधिकार प्रथम पेशव्याच्या व नंतर नाना फडणवीस व महादजी शिंदे यांच्या सारख्या सरदारांच्या हाती गेले.
शाहू महाराजांचा मृत्यू १५ डिसेंबर १७४९ रोजी सातारा येथे झाला व त्यांचा अंतिम संस्कार संगम माहुली येथे करण्यात आला जेथे त्यांची समाधी आहे.
(या लेखातील काही मजकूर अथवा लेखाचा माझ्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

मोसे खोरेतील शिवपिंडच्या आकारातील विहीर, शिर्के वाडीतील शिर्के वाडा व गायकवाड वाडा

 
















मोसे खोरेतील शिवपिंडच्या आकारातील विहीर, शिर्के वाडीतील शिर्के वाडा व गायकवाड वाडा ⛳⛳
🙏🙏कोदवा गावातील शिर्के वाडी तालुका वेल्हा जिल्हा पुणे तील आई शिरकाई देवीकडे जाताना आपण वळणावर एक विहीर दिसते सदर विहीर हे बघण्याची योग आले तो शिर्के वाडीतील पिण्याचे पाणी पुरवठा साठी व शिरकोली येथे जाण्यासाठी हे मार्ग आहे शिरकाईदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची सोयीसाठी सदर विहीर शिवकाळापासून वापरले जात आहे असे माहिती ग्रामस्थ व शिरकाईचे मानकरी घराण्यातील अरूणराव शिर्के यांना दिले , सदर विहीर हे शिवलिंग च्या आकाराचे आहे त्यावर ६०पायरी खाली जाऊन पाणी घेण्यासाठी सोयी आहे त्यावर पाणीपुरवठा करणाऱ्या दोन जुन्या मोटी आहेत उन्हाळ्यात पण पाणी असते
सदर विहीरपासुन ५००फुटावर शिर्के घराण्याचे एक पुरातन वाडा आजपण वापरता आहे पाहण्यासारखा आहे
पण आज रोजी पाठीमागे भागाचा अवशेष शिल्लक आहेत तर वाडाची समोरील भागात शिर्के मंडळी राहतात
वाड्याच्या समोर तुळशी वृंदावन आहे , सदर शिर्के वाडा हे माईसाहेब आईसाहेब याचा वाडा म्हणून ओळखले जात कारण बडोद्याच्या गायकवाड घराण्यातील माईसाहेब याचा विवाह येथे शिर्के घराण्यात झाले होते तसेच यावेळी सदर शिर्के घराण्याचे इतिहास तील उल्लेख तपासले असते कोदवातील शिर्के घराण्याचे बडोद्याच्या गायकवाड व गवंल्हेर शिंदे घराण्यातील नातेसंबंध होते असे दिसून येते तसेच या घराण्याचे काही मंडळी बडोदा येथे गायकवाड घराण्यातील नातेसंबंध मुळे बडोदा येथे स्थायिक झाले आहे असे काही इतिहास उल्लेख सापडले आहेत
यावेळी अरूणराव शिर्के यांना सांगितले की आमच्या घराण्यातील हे ८वी पिढी येथे राहत असून छत्रपती घराण्याकडून येथे आम्ही शिर्के घराण्याचे इनाम जमीन देण्यात आले आहे या शिर्केवाडी एक गोत झाले आहे असे माहिती समोर आले आहे तसेच मागील काही दिवसांपासून आम्ही स्वत या संदर्भात माहिती घेताना सातारा कर छत्रपती घराण्याशी नातेसंबंध असणार्या पैकी अस्सल राजे शिर्के हिच खरी मंडळी आहेत असे माहिती समोर आले आहे
🙏🙏
💐💐गायकवाड वाडा 💐💐
शिर्के वाड्याच्या पाठीमागे काही अंतरावर बडोद्याच्या गायकवाड घराण्यातील वाडाचे अवशेष शिल्लक आहेत पण पाऊसमुळे झाडझुडप उगवलेला आहे त म्हणून अवशेष बघते आले नाहीत याचं खंत मनात निर्माण झाले
आता आपण विचारले की बडोद्याच्या गायकवाडचा वाडा येथे कशामुळे तर माईसाहेब या गायकवाड घराण्यातील विवाह करून येथे आल्यानंतर बडोद्याकर घराण्यातील वाडा येथे बांधण्यात आले आहे असे माहिती अरूणराव शिर्के यांना दिले 💐💐
यावेळी इतिहास संशोधक व अटकेवीर सरदार मानाजीराव पायगुडे याचा वंशज मा. श्री. नवनाथराव पायगुडे सर वमा. श्री. यागेशराव चव्हाण सदर याचा सोबत या ठिकाणांवर भेट देण्याचा योग आले .......
आज खरी राजे शिर्के घराण्यातील भेटले
छत्रपती घराणे, बडोदाकर गायकवाड घराणे व गवल्होरकर शिंदे घराण्यातील खरी वंशजांना भेटायला मिळाले याचा आनंद वेगळाच अनुभव देऊन गेले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे९०४९७६०८८८

तानाजी मालुसरे यांचे बंधु सूर्याजी मालुसरे यांचे समाधीस्थळ

 

हिंदवी स्वराज्यातील तहामध्ये गमावलेले किल्ले परत भगव्याखाली आणण्याच्या मोहिमेची सुरुवात कोंढाणा किल्ला ताब्यात घेऊन कामगिरी फत्ते करून करण्यात आली. याकामी तान्हाजी मालुसरे धारातिर्थी पडले तर मावळ्यांमध्ये वीरश्री संचारण्यासाठी त्यांचे बंधू नरवीर सूर्याजी मालुसरे यांनी दिलेली ’बाप धारातिर्थी पडला म्हणून पळून का रे जाता? गडाचा दोर कापला आहे…लढून मरा नाहीतर उड्या टाकून मरा…’ ही चिथावणी इतिहासात अजरामर झाली. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अखेरच्या श्वासापर्यंत लढावूपणे साथ देणार्या नरवीर सूर्याजी मालुसरे यांचा मृत्यू साखर येथे झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने पार्थिव मांडीवर घेऊन सती जाण्याचा निर्णय घेतला. ही समाधी साखर येथे गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित अवस्थेत दिसून येत असल्याची खंत साखर येथील वंशज अनिल ज्ञानोबा मालुसरे यांनी व्यक्त केली.

तानाजी मालुसरे यांचे बंधु सूर्याजी मालुसरे यांचे समाधीस्थळ पोलादपूर तालुक्यातील साखर याठिकाणी असून त्याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्षित पणा होत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलादपूर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात वसलेले साखर गाव याठिकाणी तानाजी मालुसरे यांचे बंधु सूर्याजी मालुसरे व त्यांच्या पत्नी सती यांचे समाधीस्थळ आहे. याठिकाणी विशेष आकर्षण म्हणजे सती यांच्या समाधीस्थळ येथे असलेले पिंपळाचे झाड अनेकदा तोडूनही पुन्हा पून्हा निर्माण होत असते त्यामुळे या समाधीला जिवंत समाधी मानले जाते. मात्र याठिकाणी जाणारा रस्ता बिकट असून समाधीस्थळ परिसरात गवताचा वेडा निर्माण झाला आहे.
तानाजी चित्रपटानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ या समाधीस्थळी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे व त्यातील काही पर्यटक सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी सुद्धा जाऊ लागले आहेत मात्र याठिकाणी पुर्णपणे असुविधा असल्याचे पाहायला मिळत आहे व येणारे पर्यटक इतिहास प्रेमी नाराज होत आहेत.इतिहासकाळातील महत्वाचा दुवा असणारी ही महत्वाची स्थळे शासनाने जतन करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत व इतिहास प्रेमींना अमूल्य असा ऐतिहासिक वारसा जपायला हवा अशी इतिहास प्रेमींची मागणी आहे.उमरठ येथे येणाऱ्या शिवप्रेमींना तानाजी यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ देखील पाहता यावे व तेथे सुद्धा सोयी सुविधा मिळाव्या अशी मागणी होत आहे.
✍माहिती नेट साभार 👏
_________________________
Pic credit @shree__kala
_________________________ -

खांदेरीचा रणसंग्राम भाग क्र. २०

 


खांदेरीचा रणसंग्राम भाग क्र. २०
Siddi to Capt. Kegwin
all peoples ey[e]s were upon us, the French, Dutch and Portugueze and the Moors(muslim) upon him, and to quitt or lye long before this place it would be a shame to us.
सिद्दी कॅप्टन केंग्विन ला.
सर्व लोकांचे लक्ष आपल्याकडे आहे. फ़्रेंच, डच आणि पोर्तुगीज यांचे इंग्रजांकडे आणि मुसलमानांच आमच्याकडे. जर ही जागा आपण सोडली किंव्हा इथे जास्त वेळ पडून राहिलो तर ती आपल्यासाठी शरमेची गोष्ट असेल.
शिवाजी महाराजांनी लिहलेले एक पत्र मुंबईला दौलतखानाने पाठवले होते. सोबतीला दौलतखानाने त्याचे सुद्धा पत्र पाठवले होते. शिवाजी महाराजांचे पत्र सौजन्यपूर्ण पूर्ण होते. पण खांदेरीवर दुर्ग उभारण्याचे कार्य हे सुरूच राहील हे इंग्रजांना बजावले होते. तर दौलतखानाने सिद्दी करत असलेल्या जळपोळीला इंग्रजांचा पाठिंबा असल्याचा आरोप केला होता. इंग्रजांनी सुद्धा हा वाद लवकरच मिटवा म्हणून दोघांनाही पत्र लिहून पाठवली.
त्यातच सुरतेत अजून एक चिंतेचा विषय निर्माण झाला. शिवाजी महाराज सुरतेवर पुन्हा स्वारी करणार अश्या प्रकारची हवा उठू लागली होती. धरणगाव, चोपडा ही गाव मराठ्यांनी लुटल्याची बातमी होती. मराठ्यांचा जोरदार तडाका ह्या भागाला बसला होता. दैवाने इंग्रजांची बखर वाचली. पण त्यांची परिस्थिती बिकट होती. तिथले मोघल फौजदार परागंदा झाले होते. खांदेरी प्रकरणामुळे आधीच शिवाजी महाराज आपल्यावर रागावले असणार त्यात हल्ला झालाच तर खांदेरीच्या घडामोडी मुळे पुरसे सेन्य देखील पदरी नाही. त्यामुळे पुरेसे पाहरे व हेर यांची तजवीज इंग्रज करून होते. काहीच शक्य नसेल तर तिथून पळून जाण्याची तजवीज सुद्धा झाली होती. पण मराठी फौज सुरतेत न घुसता बुऱ्हाणपूराच्या दिशेने गेल्या. इथे मुंबईला पत्र पाठवून हे बेट आपण स्वतःसाठी घेत नसून हे बेट मराठ्यांच्या हातात न जावे हीच आपली इच्छा आहे हे सिद्दी सांगत होता. पण इंग्रज महाराजांच्या पत्राची वाट बघत होते.
Wee have certaine newes from Naugaune that Dowlett Ckaune is fitting his fieete to put to sea, but whither he intends cannot learne ;
इथं नागावच्या खाडीत दौलतखानाच्या तयारी सुरू होती. तो नक्की मुंबईवर हल्ला करेल की नाकेबंदी पथकावर पडेल ह्याचा अंदाज मुंबईतील इंग्रजांना येत नव्हता. दोन ते तीन दिवस बाहेर राहूंन रात्रीच्या वेळेस माहीम किव्हा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी येण्याचा त्याचा बेत आहे पण हे खरे वाटत नाही अस केंग्विन कळवतो. तरी नाकेबंदी पथकापैकी हंटर व एक मचवा नागावच्या खाडीत पहारा देण्याकरता पाठवावे व सकाळी मराठ्यांचे आरमार खाडीत आहे हे बघून नाकेबंदी पथकास सामील व्हावे. व मराठ्यांचे आरमार बाहेर येत असल्याचे दिसतात इशारतीच्या तोफा उडव्याव्यात आणि त्यांच्या आरमारास नष्ट करावे. जर तिथून निसटून तो मुंबईला आलाच तर खून दिल्याबरोबर सर्वांनी येउन त्याचे आरमार बुडवावे. ह्यात सर्वांनी ह्याचा अर्थ कदाचित सिद्दीला सुद्धा घेऊन यावे हाही असावा.पहिल्या झालेल्या दोन्ही चकमकीत इंग्रजांना मार खावा लागला होता. त्यात पकडले गेलेले इंग्रज सागरगडावर कैदी म्हणून ठेवले गेले होते. आणि त्यांना सोडवून आणायचे म्हणजे मराठ्यांच्याकडील लोक आपल्या ताब्यात असावी असं इंग्रजांना वाटत होतं. तसाच त्यांचा प्रयत्न ही होता. अजूनपर्यंत मराठ्यांना कैद करण्यात इंग्रजांना यश मिळालं नव्हतं. १० डिसेंबर च्या पत्रात अजून एक गोष्ट इंग्रजांनीच अधोरेखित केली. मुंबईतून केंग्विन ला लिहून पाठवले आहे की दर दोन तीन दिवसांनी नाकेबंदी तोडून मराठी जहाज खांदेरीला रसद पुरवतात ही बाब सिद्दीला ही सांगा.
आता ह्या प्रकरणात इंग्रज, सिद्दी व मराठे बरेच पुठे आले होते. आता घडणाऱ्या घडामोडी वर इतर राज्यकर्ते लक्ष ठेवून होते. ही घटनाच मुळी विलक्षण होती. त्यांचे कर्ताझ(व्यापारी जहाजाना घ्यावा लागणारा परवाना जो पोर्तुगीज व इंग्रज देत) घेऊन समुद्रात प्रवेश करावा लागे अश्या दर्यावर्दी सत्तेशी इथली एतद्देशीय सत्ता यशस्वी झुंज देत होती. नाकेबंदी सुद्धा मराठ्यांची जहाजे थांबवू शकत नव्हती. सभासद बोलतो की राजांनी दर्याला पालन घातला. खांदेरी प्रकरणाने मराठ्यांनी समुद्रावर स्वतःचा एकाधिकार उभं करायला आरंभ केला होता.
क्रमशः
✍️ स्वराज्याचे वैभव
संदर्भ ग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English record

खांदेरीचा रणसंग्राम भाग क्र. १९

 


खांदेरीचा रणसंग्राम भाग क्र. १९
एव्हाना इंग्रज व मराठ्यांमध्ये तहाची बोलणी सुरू झालेली. १७ नोव्हेंबरला पेशव्यांकडून मुंबईला पत्र आले होते. इंग्रजांनी त्याच दिवशी त्या पत्राला उत्तर लिहून पाठवले. त्यात त्यांनी सिद्दी वारंवार खांदेरीवर करत असलेल्या माऱ्याची बातमी दिली. आणि ह्याने जर खांदेरीवर ताबा घेतल्यास तुमच्या देशावर हालअपेष्टा ओढावतील. ह्या नुकसानीपासून वाचायचे असेल तर आपण (पेशव्याने) आदेश देऊन खांदेरी बेट आपल्या ताब्यात देण्यास सांगावे. जर राजांना हा बेत नाही आवडला तर सिद्दी निघून गेल्यावर आपण तिथून सैन्य काढून घेऊ व ते बेट पूर्वीप्रमाणे निर्जन राहील. पेशव्यांकडून सकारात्मक प्रतिसाद येईल ह्या आशेवर मुंबईत इंग्रज होते. म्हणून २३ नोव्हेंबरला आलेले बंगाल मर्चट हे जहाज मुंबईत थांबवून घेतलं. पण इंग्रजांचा अपेक्षाभंग झाला. पेशव्यांनी खांदेरी सोडण्यास साफ नकार दिला होता. त्यांनी पुन्हा पेशव्यांना पत्र लिहलच. सोबत महाराजांनाही पत्र लिहुन पाठवलं. नाकेबंदी सुरू ठेवण्याकरता पैशाची गरज होती तशी मागणी मुंबईकडून सुरतेत करण्यात आली होती. खांदेरी प्रकरणामुळे नेहमीपेक्षा ५००० झेराफिन्स (त्यावेळी सुरतेत वापरलं जाणारं चलन) जास्त खर्च होत होते. तितकं मुंबई बेटाचे उत्पन्न सुद्धा नव्हते. त्यामुळे युद्धविराम झाला तर हा खर्च तरी वाचेल हा त्याचा प्रयत्न होता.
इंग्रज बेटावर तोफांचा मारा करत नाहीत वा त्याला मराठी मुलुख उध्वस्त करू देत नाहीत म्हणून सिद्दीला राग होता. पण स्वतः इंग्रजांनी हल्ले केले की सिद्दीला तसे करायला सांगितले तरीही नुकसान आपलंच असेल हे इंग्रज जाणून होते. कारण मराठ्यांचा मुलखातून गरजेच्या वस्तू इंग्रजांना मिळत आल्या होत्या. आता केलेली चूक त्यांना भविष्यात महाग पडू शकली होती. शत्रू समर्थ असल्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळे त्यांना आता दोनच मार्ग दिसत होते एक तर शिवाजी महाराजांशी तहाची यशस्वी बोलणी करणे. किव्हा दुसरे मराठ्यांना हुसकायला सिद्दीची पूर्ण मदत घेणे. त्यातही पहिला पर्याय इंग्रजांना जास्त योग्य वाटत होतो. त्यात ते झालेल्या खर्चाची मागणी करू शकत होते. त्याविषयी अधिक माहिती येणाऱ्या भागांमध्ये दिली जाईलच. पण तह होईपर्यंत काहीही करणे इंग्रज आरमाराला शक्य नव्हते. म्हणून इथे आळसात पडून राहून शत्रूकडून हसे करून घेण्यापेक्षा आरमार मागे बोलावून घेण्याची संमती मुंबईकडून सुरतेकडे मागितली जात होती.
ह्या सगळ्या प्रकरणावर निर्णय अधिक निश्चित करण्याकरता म्हणून कॅप्टन जॉन गोल्डबरो आणि कॅप्टन जॉन डॅनिएल यांना बोलवून घेतले. त्याना ह्या प्रकरणात इंग्रजांची परिस्थिती व त्यांच्यावर असलेली बंधने ह्याची माहिती देण्यात आली. त्यावर त्यांनीही आपण आपली माणसे धोक्यात घालणं योग्य नसल्याचे म्हंटले. आणि इतक्या पुढे आल्यावर लगेच माघार घेणे सुद्धा शक्य नव्हते. वाटाघाटीतुन काहीच निष्पन्न झालेच नाही तर मात्र काही कारणाने ह्यातून अंग काढून घेऊन सिद्दीला खांदेरीसाठी भांडत बसू द्यावे इथवर सुरतेत विचार केला गेला.
सिद्दी आता त्याचा कुटील डाव खेळू लागला. त्याने आता किनारपट्टी जवळील गावांची जाळपोळ व तिथल्या लोकांना बंदी करायला सुरुवात केली. केंग्विनला सिद्दीच्या जहाजावर असे काही कैदी असल्याचे दिसले. त्याने त्याची चौकशी केली असता ते नागावच्या परिसरातील आहेत ते कळलं. ही घटना ३ डिसेंबर ला घडली. त्याच वेळी सिद्दीने केंग्विन ला आपण आपली ७०० माणसे तयार ठेवल्याचे सांगितले.
सिद्दी आल्यापासून नाकेबंदी तोडणं अवघड झालेलं. नागावच्या खाडीत बोटी उभ्या होत्या. पण त्या खांदेरी नेयच्या कश्या हा प्रश्न होता. त्यावर दर वेळी मराठे काहींना काही उपाय शोधत. ह्या वेळी ही एक धाडसी प्रयत्न मराठ्यांच्या बाजूने झाला. नागावच्या खाडीतून बोटी निघाल्या. सिद्दी व इंग्रज दोघांचे मचवे खांदेरीचा आजूबाजूस फेरफटका मारत. मराठ्यांनाच्या गुप्तहेर खात्याने कमालीचं काम केलं होतं. आणि सिद्दी आणि इंग्रज ह्या दोघांची पूर्ण माहिती मराठ्यांकडे आधीपासून होती. दोन मचवे नागावातून बाहेर पडले. काही मावळे आणि एखादा सरदार असेल बोटींवर. पण वेष त्यांनी साधारण कोळ्यांचा केला असावा. त्यावर बरंच गरजेचं समान लादलं होत. ह्यावेळी जहाज लपवत न नेता त्यांनी जवळ सिद्दीच्या ताफ्याचा दिशेने घेतलं. आणि एकाएकी त्यांनी आपली मचवे त्यांचा जहाजांना चिटकवले. सिद्दीच्या हसमांनी आवाज दिला. चौकशी करायची म्हणून कोण कुठले विचारणा झाली. त्यावर कोळ्यांच्या वेशातल्या सरदाराने पुढे येऊन आपण इंग्रज कप्तानाच्या हाताखाली असल्याचं सांगितलं. इतकंच नाही एका जहाजचं नाव, जहाजाच्या कप्तानाचे अगदी पायलेटच देखील नाव वैगरे त्यानी बिनचूक सांगितलं. माहिती योग्य आहे म्हंटल्यावर त्या दोन्ही जहाजांना थांबवण्यात अर्थ नव्हता. त्या दोन्ही जहाजांना सिद्दीने सोडून दिल. तिथून निघाल्यावर दोन्ही मचवे निघाले ते थांबले सरळ खांदेरीचा धक्क्यावर. अगदी सिद्दीच्या हातावर तुरी देण्यात आली होती. आणि सिद्दीकडूनच ही गोष्ट केंग्विन ला कळाली.
RICHARD KeIGWIN TO Mumbai
( EXTRACT ) 3 dec,1679
Two boates made their escape from the Island, coming up with the Siddy’s galvetts, which haild them; the Sevagy boates aid 'they belonged to such a ahipp, naming the ships name, Captain and Pilots, by which stratagem they gott leave to passe.
धन्य तो राजा आणि धन्य ते त्याचे वीर.......
क्रमशः
✍️ स्वराज्याचे वैभव
संदर्भ ग्रंथ : शिव छत्रपतींचे आरमार
English record

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...