विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 August 2020

भोसले घराण्याची वंशावळ.

 


भोसले घराण्याची वंशावळ...
आनंद घोरपडे आपल्या पुस्तकात लिहितात " अल्लाउद्दीन खिअलजीने ज्यावेळी इ.स.१३०३ मध्ये चित्तोडवर स्वारी केली, तेव्हा झालेल्या लढाईत राणा लक्ष्मणसिंह ठार झाला. राणी पद्मिनीने इअतर राजस्त्रीयांसहीत आत्मत्याग केला.लक्ष्मणसिंहाचे सात मुलगे या लढाईत ठार झाले. आठवा मुलगा अजयसिंह चित्तोडच्या गादीवर आला. अजयसिंहाला सजनसिंह आणि क्षेमसिंह असे दोन मुलगे होते. एका लढाईत दोघांनाही आलेल्या अपयशामुळे रागावलेल्या अजयसिंहाने पुतण्या हमीरला गादीवर बसवले. त्यामुळे नाराज होऊन हे बंधू इ.स.१३२० च्या सुमारास मेवाड सोडुन दक्षिणेकडे आले. सजनसिंह आणि त्याचा पुत्र दिलिपसिंह यांनी बहामनी राज्याची स्थापना करणार्या हसन गंगू बहामनी यांच्याकडे नोकरी पत्करली. याच दिलिपसिंहापासूनच्या १२व्या पिढित (सन १५३३) बाबाजी यांचे पुत्र मालोजी हे जन्माला आले. मालोजी हे शहाजी राजांचा जन्म झाला. दिलिपसिंहाच्या नातवाचे नाव 'भोसाजी' असे होते. याच नावामुळे पुढे हा वंश भोसले म्हणुन ओळखला जाउ लागला असे काही जाणकार मानतात.
काही इतिहासकरांच्या मते भोसले हे नाव 'भूशल' पासुन पडलं अस्ल्याचं अधिक संभवनीय वाटतं. त्यांच्या मते 'भूशल' चा एक अर्थ 'भूतलावरील शस्त्रधारी' म्हणजेच 'क्षत्रिय योध्दा' असा आहे. त्यामुळे भूशलचे वंशज हे भौषल, भौसल, भोसल, भ्सला, भोसले अशी भोसले या शब्दाची परंपरासिद्ध, इतिहास सुसंगत व्युत्पत्ती ठरते.
पण हे भोसले घराणे चित्तोडच्या राजपुत सिसोदे वंशातील अस्ल्याची वंशावळ उपलब्ध आहे. तसेच खुपशा जुन्या कागदपत्रांमध्ये शहाजीराजे आणि शिवाजी राजांचा उल्लेख राजपुत म्हणुन केल्याची नोंदही मिळते.
हे झाले आनंद घोरपडे यांच्या पुस्तकाबाबत. प्रा. रा आ. कदम यांनी तर आपल्या पुस्तकात सजनसिंहापासुनची वंशावळच दिली आहे. तीच सर्वापर्यंत पोहोचवण्यासाठी हा खटातोप मी केला आहे.
_____________________________
वंशावळ
१. सजनसिंघ
२. दिलिपसिंघ
३. सिंघजी
४. 'भोसाजी'
५. देवराज
६. इंद्रसेन
७. शुभकृष्ण
८. रुपसिंघ
९. भुमिंद्र
१०. धापजी
११. बरहटजी
१२. खेलोजी
१३. कर्णसिंघ
१४. संभाजी
१५. बाबाजी
१६. मालोजी
१७. साहजी
१८. शिवाजी राजे
१९. संभाजी राजे
संदर्भ - सिद्धांत विजयः पृष्ट ८४-८५)
साभार- Golden history of marathas

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...