विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 24 August 2020

सरलष्कर शहाजी महाराजांचा लोकसंघटनाचा गुण

 

सरलष्कर शहाजी महाराजांचा लोकसंघटनाचा गुण
शहाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना त्यांंचा राजकीय मुस्तद्दीपणा, बुद्धीचातुर्य, धाडस, लढवय्येपणा तसेच अनेक पैलू त्यांनी केलेल्या अनेक पराक्रमातून आपल्या समोर येतात, याशिवाय शहाजी महाराजांचा महत्वाचा पैलू म्हणजे लोकसंघटन..

महाबली शहाजी महाराजांच्या लोकसंघटन या पैलूबद्दल समकालीन कवी जयराम पिंडये आपल्या राधामाधवविलासचंपू या महत्वाच्या साधनात लिहतो -

" मनुष्यमात्र म्हटले म्हणजे त्याला काही तरी त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम व्यसन असते. तसे शहाजीला सेनेचे व्यसन होते. सर्व काही गमावील, प्रसंगी प्राणही गमावतील पण सैन्य म्हणून कधीही हातचे जाऊ देणार नाही. शहाजी आपल्या सैन्याची व सैनिकांची इतकी पराकाष्टेची काळजी घेई की संकटसमयी इतर सर्व बाबींना गौणत्व देऊन,सैन्याच्या जोपासनेला व मशागतिला तो अनन्य प्राधान्य देई. शहाजीचा जसा सैन्यावर लोभ त्या प्रमाणेच सैनिकांचा शहाजीवर लोभ असे "

शहाजी महाराजांची कारकीर्द पाहिली तर ते अनेकदा या शाहीतुन त्या शाहीत कार्यरत होते ही खांदेपालट करत असताना त्यांचे प्रत्येक ठिकाणी योग्य स्वागत आणि गौरवच केलेला दिसतो तो त्यांच्या अतुलनीय पराक्रम आणि महाबली शहाजी महाराजांच्या जवळ असलेल्या या लोकसंघटन केलेल्या सैन्यदळामुळे. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांनी तीन वेळा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला तेंव्हाही हे सैन्य त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे होते. शहाजी महाराजांनी लोकसंग्रहित केलेल्या काही मंडळींचा छत्रपती शिवाजी महाराजांना देखील स्वराज्य स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात उपयोग झालेला आपणास दिसतो..

सरलष्कर शहाजी महाराजांचा हाच लोकसंघटनाचा गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी देखील आपल्याला दिसून येतो..

महाराजसाहेब

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...