विनोद जाधव एक संग्राहक

Friday 14 August 2020

सरदार रनवरे उर्फ रणनवरे

 





सरदार रनवरे उर्फ रणनवरे

ऐतिहासिक गाव -निमसाखर,
ता इंदापूर, जी पुणे
या गावाचे ऐतिहासिक महत्व फार मोठे आहे . नीरा नदी तीरावर , साधारणपणे 1000 वर्षांपूर्वीची वास्तू म्हणजेच, मोठया भुईकोट किल्ल्या सारखे दोन भव्य दिव्य ऐतिहासिक वाडे . दोन राज्यकर्ते सरदार रनवरे बंधु यांचा ते इतिहास सांगत आजही उभे आहेत .
यां वाड्याची नावे देखील ऐतिहासिक आहेत, पहिला वाडा हा राजवाडा आणि त्यालाच थोरला वाडा देखील म्हणतात.दुसरा वाडा हा सरदार वाडा त्याला विहीर वाडा म्हणतात .
तसे रनवरे चे मुळ गाव फलटण जवळ चे जिंती आहे

यातील राजवाडा ची जे प्रवेश द्वार आहे ते फार मोठे आहे ,हा वाडा बांधणाऱ्या मालकाला या वाड्यात प्रवेश करण्यासाठी हत्तीच्या अंबारीवर बसून आत जाण्याऐवढे उंच प्रवेशद्वार बांधले होते , तशी त्यांची इच्छा होती , या वाड्याच्या भिंती 10 ते 15 फूट रुंदीच्या आहेत , यातून एक भुयार सरदार वाड्यात निघते ,याच बरोबर नदीकडे देखील एक भुयार जात असावे .पण राजवाडा चे काम अर्धवट राहिले आहे .
सरदार वाड्याचे काम पूर्ण झाले होते .यात विहीर आहे व घरे आहेत , तीचे पाणी पूर्वी गाव पित असे म्हणून त्यास विहीर वाडा म्हणतात ,आजही या वाड्यात त्यांचे वंशज राहणेस आहेत .
राजवाडा अर्धवट राहिला कारण वाडा बांधण्यासाठी साहित्य वा रसद आणण्यासाठी जे राजे गेले ते परत आलेच नाहीत , तिथून संपत्ती, धन घोड्यावरून लादून आणताना त्यांचा तिथेच घात झाला असावा ,असे गावातील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत आप्पा , वकील रणवरे, लोकमतचे पत्रकार रणवरे हे त्यांचे वंशज सांगतात पण या थोर महापुरुषांचा हा इतिहास सूर्यकांत आप्प्पा आजही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सांगताना त्यांना फार आनंद होतो .

आजही हे वाडे एका प्रेरक व मोठ्या ऐतिहासिक पर्वाचे मूक साक्ष देत उभे आहेत .
माहिती संकलन:
adv श्रीकांत रामचंद्र करे

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...