🚩खेळोजी भोसले 🚩
POSTSAAMBHAR::
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
खेळोजी भोसले हे मालोजी भोसले यांचे धाकटे बंधू .विठोजी भोसले यांचे थोरला
सुपुत्र हे आपल्या काका प्रमाणे अहमदनगर येथील निजामशाही मध्ये प्रसिद्धीस
येऊन त्यांना मनसबदारी मिळाली होती. खेळोजी मोठे पराक्रमी सरदार
होते.इ.स. 16 29 च्या सुमारास ज्यावेळी शहाजीराजांनी निजामशाहीचा पक्ष
सोडला त्यावेळी खेळोजी, मालोजी व परसोजी ह्या दोन नावासह मोगलांना जाऊन
मिळाले. तेथे त्यांना " पंच हजारी"म्हणजेच पाच हजारी"स्वारांची मनसब
मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी मोगलांच्या बाजूने पुष्कळ शौर्याची कामे केली.
परंतु इ.स. 1633 मध्ये ज्यावेळी मोगलांनी दौलताबादच्या किल्ल्याला वेढा
घालून तो हस्तगत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काही कारणावरून खेळोजी
भोसले मोगलांचा पक्ष सोडून विजापूरला गेले. आणि विजापूरकरांच्या वतीने
त्यांनी मोगलांशी वारंवार लढाया केल्या.
खेळोजी हे
महाप्रतापी व रणझुंजार वीर असल्यामुळे मोगलांना ते फारच शिरजोर वाटू लागले.
तेव्हा त्यांनी दुसऱ्या एका मार्गाने खेळोजीला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न
केला.खेळोजीची बायको गोदावरी काठी काही परवणीनिमित्त गंगास्नानस गेली
होती. तिला तेथील मोगल सुभेदाराने पकडून कैदेत ठेवले.खेळोजीची बायको
महापतिव्रता असून तिच्यावर खेळोजीचे विषेश प्रेम होते .हे जाणून, त्या
सुभेदाराने खेळोजीस विनम्र करण्यासाठी, बायकोचे पातिव्रत्य भंग करण्याची
भीती घातली. त्यांनी असा निरोप पाठवला की ," बायकोची अब्रू राखण्यासाठी
त्याच्या द्रव्याची किंमत,तू जर मला चार लाख रुपये खंडणी देशील ,तर मी
तुझ्या बायकोला काडीमात्र उपसर्ग न लाविता तिची सुटका करेल. रुपये न देशील
तर तिची अब्रू राहणार नाही. हे ऐकून खेळोजींनी निरुपायास्तव चार लाख
रुपये त्या मोगल सुभेदाराला देऊन आपल्या प्रिय पत्नीची सुटका करविली.
त्यानंतर लौकरच विजापूरचा बादशहा व मोगल बादशहा शहाजहान यांच्यात तह
झाला.त्यामुळे खेळोजी भोसले यांना आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला.
अर्थात खेळोजीने आपल्या पराक्रमाची अनेक प्रसंगी शर्थ करून दाखवली
.त्याच्या पाणीदार स्वभावाप्रमाणे त्याचा यथायोग्य गौरव कोठे होईना.
वेळोवेळी मोगल लोकांच्या हातून खेळोजीचा अपमान व मानहानी होऊन अनेक
प्रकारचे नुकसान झाले. तेव्हा ते त्रस्त होऊन आपल्या गावी वेरूळ येथे आले व
तेथे स्वतंत्र सैन्य जमवून आसपासच्या मुलकात पुंडावा व दंगेधोपे करून
राहू लागले .ही बातमी औरंगजेबास कळताच त्यांनी मलीक हुसेन नामक
सरदाराबरोबर काही सैन्य देऊन, त्यास खेळोजीच्या बंदोबस्तास पाठवले. त्याने
खेळोजी वर छापा घालून त्यास इ.स.1639 च्या ऑक्टोबर महिन्यात धारातीर्थी
पाठवले. अशाप्रकारे शहाजीराजांचा चुलत भाऊ खेळोजी भोसले यांचा अंत झाला.
" खेळोजी भोसले यांना आमचा मानाचा मुजरा "
🙏जय जिजाऊ🙏
🙏जय शिवरायांचं 🙏
No comments:
Post a Comment