विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 14 August 2020

कोरेगाव (सातारा ) चे ऐतिहासिक बर्गे घराणे -

 

कोरेगाव (सातारा ) चे ऐतिहासिक बर्गे घराणे -

बर्गे यांचे मुळ आडनाव निकम आहे .बर्गे सरदारांना लष्कराची फार मोठी परंपरा आहे ..मराठा बर्गे, उपनाव निकम हे एक सूर्यवंशी मराठा घराणे आहे. निकम ही मराठा कुळी निकुंभ राजवंशाची शाखा आहे. त्यांचे मूळ जयपुर परिसर राजस्थान येथील आहे.

बहमनी कालखंडात शिलेदारांना अथवा बारगीर वीर पुरुषांना बर्गे व नाइकवडी म्हणत. त्यापासून बर्गे म्हणजे लढाऊ वीर आशा अर्थाने निकमांना ही उपाधि मिळाली असावी. बर्गे या नावाचा उल्लेख जहांगीर बादशाह च्या काळातील मोगल पत्रात उल्लेख आढळतो. बर्गे हि पदवी आहे .दखन मधील घोडदलातील सरदार यांना बर्गे म्हटले जायचे. हे पुढे आदिलशाही दरबारातील मातब्बर असे सरदार असल्या चा उल्लेख सापडतो.

परंतु, बर्गे आडनाव कसे पडले याविषयी एक आख्यायिका आहे ती अशी कि निकम कुळातील योद्ध्यानी अनेकांचा एकाच वेळी प्रतिकार करू शकणारे वा हल्ला थोपवू शकणारे शस्त्र वापरले. ते शस्त्र म्हणजे बर्ग - म्हणूनच असे शस्त्र वापरणारे ते बर्गे. बर्गे यांच्या मूळ पुरुष यांना पाच मुले होती. त्यापैकी तीन मुले कोरेगावला ( जिल्हा सातारा ) व दोन मुले चिंचनेरला ( जिल्हा सातारा ) स्थायिक झाल्याने त्यांचा वंश वृक्ष फोफावला.

बर्गे कुळाचार:
• नाव : बर्गे
• कुली : निकम
• जात : ९६ कुळी क्षत्रिय मराठा
• मूळ गादी : आभरण ( अभानेर - हे अलवर, जयपुर या जवळ राजस्थान ), कर्नाटक.
• वंश : सूर्यवंश
• राजाचे नाव / पदवी : प्रभाकरवर्मा
• गोत्र : पराशर / मानव्य
• वेद : ऋग्वेद
• अश्व / वारू : पिवळा
• निशाण : ध्वजस्तंभी हनुमान
• मंत्र : गायत्री मंत्र
• कुल देवता : जोगेश्वरी
• देवक : उंबर, वेळु, सोन्याची रुद्राक्ष माळ किंवा कांद्याची माळ, कलंब
( निकुंभ हे राजे रघुवंशी असल्याचे दावा करतात व ते अयोध्येहुन राजस्थानला आले. धूंदू नावाच्या राक्षसला मारुन धुंधर उर्फ़ जयपुर वसवनारे ते राजस्थानच्या पहिल्या आर्य लोकांपैकी आहेत. मराठा निकम हे निकुंभ राजे वंशज असल्याने त्यांचे खानदेश वर तसेच राजस्थान येथील भागावर स्वामित्व होते. पुढे राजस्थान येथील राज्य त्यांनी गमावले. खानदेश वर मात्र निकुंभानी अनेक शतके राज्य केले ८ व्या शतकापासून ते अगदी आजपर्यंत बरेचसे लोक तेथे आहेत. अल्लशक्ति , वैरदेव, कृष्ण आदि महत्वाचे राजे या घराण्यातून झाले.)

प्रसिद्ध मराठा सरदार बर्गे मंडळीची नावे :

हरजी बर्गे- आदिलशहचे मातब्बर सरदार - शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे समकालीन

येसाजी बर्गे -शिवाजी महाराज याँचे सरदार

-सामजी , तुळाजी,सिदोजी ,शंकराजी ,मानाजी बर्गे- पांडव गडची लढाई मध्ये पराक्रम - शाहू महाराजांकङुन कोरेगाव चा इनाम - १७११ तसेच कोकण मोहिमेत महत्वाची कामगिरी

-खंडेराव बर्गे - १८ मार्च १७७३ मध्ये रायगड किल्ला स्वराज्यात आणला

-आनंदराव बर्गे - कोकणातील बंडखोर सरदारांना शिकस्त दिली

-आपाजी बर्गे-
-गणपतराव बर्गे
-नायकजी बर्गे -सातारा महाराज यांचे खास विश्वासू सरदार

-बळवंतराव बर्गे- पानिपत मध्ये बलिदान

-गिरजोजी बर्गे- खर्ड्याच्या लढाई मध्ये पराक्रम

-बहिर्जी बर्गे - बीड ची लढाई मध्ये पराक्रम व अस्तनपूरचा इनाम चे मानकरी

-सरदार सेखोजीराव बर्गे- जिंजी मध्ये राजाराम महाराज यांना मदत.सेनापती संताजी घोरपडे चे विश्वासू सरदार

त्रिंबकजी बर्गे- १८१८ मध्ये सालपेच्या घाटात दुसरे बाजीराव करीता बलिदान -


• सरदार क्षेत्रोजीराव बर्गे

-सरदार बाजीराव बर्गे

• सरदार राणोजीराव बर्गे
• सरदार सखाराम बर्गे
• सरदार बालोजीराव बर्गे
• सरदार हैबतराव बर्गे
• सरदार येसाजीराव बर्गे

• सरदार साबाजीराव बर्गे
• सरदार जानोजीराव बर्गे

ही वरील उल्लेखि नावे केवळ उंच शिखरांची आहेत आणि खरे पहु गेले असता यापेक्षा अनेक बर्गे सरदार व त्यांचे घराणे कर्तबगार असूनही त्यांच्याविषयी फारच कमी लिहिले, ऐकले व बोलले गेले. मराठा सरदार बर्गे यांचा इतिहास कागदोपत्री बंदिस्त आहे. तो समजल्यास मराठेशाही इतिहासात मौलिक भर पडेल.

ऐतिहासिक बर्गे घराणे व त्यांचा संक्षिप्त इतिहास :

बर्गे हे बहमनी आमदनी पासून मशहूर असे पराक्रमी घराणे होय. यांनी दख्खनची सुल्तानशाही ज्यात आदिलशाही, निज़ामशाही राजवटीत शौर्य गाजवून वैभव, इनाम वतने व लौकिक मिळवला. बर्गे यांचे कोरेगाव हे प्रान्त वाईतील महत्वाचे ठिकाण होते. संमत कोरेगाव, तालुका कोरेगाव, तसेच प्रांत कोरेगाव अशा आशयाचे संदर्भ सापडतात. विविध राजवटीत कोरेगाव तसेच चिंचनेरचे वंश परंपरागत पाटिलकि हक्क, अनेक दुर्मिळ किताब, मान मरातब, जहागिरी, सरंजामी हक्क त्यांना होते. सुल्तानशाही, शिवशाही, मराठा स्वातंत्र्य युद्ध , शाहू काळ, पेशवाई , संस्थानी राजवटी अशा अनेक कालखंड पराक्रमा ने गाजवणारया प्रमुख मराठा घराण्यात त्यांचे मानाचे स्थान आहे. बर्गे घराण्याने अनेक युद्धांत मराठा साम्राज्याची सेवा केली त्यात प्रामुख्याने मराठा स्वातंत्र्य युद्ध, जंजिरा मोहीम, पानिपत, खर्डा इत्यादी महत्वाच्या घटना होत. अनेक पोवाड्यात बर्गे वीरांचे गुणगान आढळते. एकंदर इतिहासावरून बर्गे घराण्याला पाटील, सरदार, इनामदार, जहागीरदार, सरंजाम वतनदार, खासबरदार अशा दुर्मिळ पदव्यांनी गौरवलेले दिसते.

माहिती द्वारा -(copy right with ) Adv विशाल बर्गे.बारामती
शब्दांकन -राहुल भोईटे.
कृपया माहिती वरील नावासहित share करावी .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...