राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी
१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्रांतात आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली होती. राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्या एकत्रित हालचालींमुळे शत्रूवर मोठा वचक बसला होता. या दोन सरदारांनी मिळून केलेल्या एका मोहिमेचा उल्लेख पिलाजी जाधवराव यांनी चिमाजी अप्पांना पाठवलेल्या पत्रात येतो.
बडवाई प्रांतात शिंदे आणि होळकर यांनी शत्रूला चहुबाजूंनी घेरून त्यांना जेर केले. शत्रूला नमवल्यानंतर तिथून मराठा दौलतीसाठी खंडणी वसूल करण्यात आली. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, या सरदारांनी तिथे मोर्चे लावून शत्रूवर दबाव निर्माण केला होता, ज्यामुळे शत्रूला शरणागती पत्करावी लागली.
पेशवे दप्तर नोंद-
"राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री सिंदे याजकडील वर्तमान आले कीं बडवाई प्रांत मालवा येथे मोर्चे देऊन जेर करून खंडणी घेतली म्हणऊन आले."
संदर्भ-
१. पेशवे दप्तर भाग ३०, पत्र क्रमांक ६१.



No comments:
Post a Comment