इतिहासाच्या साधनांमधील शिवकालीन पत्रव्यवहार अभ्यासत असताना अस्सल मोडीतील पत्रांमधून बहुतांश शब्द हे तत्कालीन भाषेनुसार कधी संस्कृतप्रचूर तर कधी अरबी व फारसीमिश्रीत आढळतात. किंबहुना प्राचीन देवनागरी-मोडी पत्रांमध्येही असे अनेक शब्द आलेले आढळून येतात. त्याकाळी पत्रलेखनात शब्दांची संक्षिप्त रूपे वापरण्याची पद्धत असल्याने बऱ्याचदा त्यातील कठीण शब्दांचा अर्थ लक्षात येत नाही व पानांचा योग्य अभ्यास करता येत नाही, यासाठी शिवकालीनपानांतील कठीण शब्दांचे अर्थ व संक्षिप्त शब्दांची पूर्ण रूपे याबाबत पुढीलप्रमाणे माहिती देता येईल.
★१) संक्षिप्त शब्दांची पूर्ण रूपे:★
१)रा। :- राजमान्य,राजेश्री.रवाना,रसानगी,रक्कम.
२) रु।। :- रूपये,रूके,रुजुवात.
३) सा। किंवा सो। :- साहेब,सरकार,साल,साष्टांग,सन,
४) बि।। :- बितपशील,बिधे,बिन,
५) बा। :- बावत,बरहुकूम,बहाल.
६) मो। :- मोकादम,मोहोर,मोर्तब मोकासा,मोईन,
७) वि। :-विनंती, विज्ञापना, विशेष,विदीत.
८) ई।। :- इलाका,ईस्तकबाल,इनाम, इनायत,इसवीसन.
९) सु।। :- सुहूर,सुरू,सुभा,सुद.
१०) का।:- कर्यात,कबिला,कमाविस, कदीम,कसबे.
११) हा :- हाली अथवा हाल,हवाला,हाजिर,हक्क,हकीकत.
१२) पाा :- परगणा,परवानगी,पत्र,पातशाही,पाटील,पावती,पासून,पावेतो.
१३) त॥ :- तालुका,तह,ताविज,तर्फ ताबा,तारिख,तनखा,तक्रार.
१४) मा। :- महाल,मामला,मामलेदार,मामलत,महसूल,माल.
१५) प्राा :- प्रांत,प्रधान,प्रगणे अथवा घरगणे,प्रसन्न,प्रमाण,प्रकार.
१६) दा। :- दस्तक,दस्तखत.
१७) हु॥!- हुजूर,हुन्नर,हुकूम.
१८) खु। :-खुर्द,खुलासा,सर, खुशाली.
१९) नि।। :-निशाणी,निसबत, निवाडा.
२०) प्रां। मा। र :- प्रांतमजकूर.
२१)रा। रा।:- राजमान्य राजेखी.
२२) मा। नईले :- मशारनिल्ले.
२३) मा। अनलाम :- मशहुरुल अनाम.
२४) छ. :- मुसलमानी महिन्यातील दिवस चांद्रमानावर आधारित असल्याने छ हे अक्षर चंद्र कितवा आहे हे दर्शवते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment